Ladki Bahin Yojana E- KYC Last Date: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. लाडकी बहीण योजनेसाठी ईकेवायसी अनिर्वाय करण्यात आली आहे. यासाठी आता अवघा एक दिवस उरला आहे. उद्या म्हणजेच 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही ईकेवायसी न केल्यास तुमचा पुढील महिन्याचा हप्ता येणार नाही. त्यामुळे सर्व लाभार्थी भगिनींनीही 18 नोव्हेंबर पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन मंत्री अदिती तटकरेंनी केले आहे.
ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण कराल? (How to Complete e-KYC Know Step By Step Process
- लाभार्थींनी त्यांच्या मोबाईल अथवा संगणकावर ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी.
- पोर्टलवर लॉगिन केल्यावर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासंबंधीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर आपला आधार क्रमांक आणि Captcha Code योग्य ठिकाणी टाका.
- आधार प्रमाणिकरणासाठी परवानगी देऊन 'Send OTP' या पर्यायावर क्लिक करा.
- आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाईप करा.
- यानंतर, पती/वडिलांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड नमूद करून त्यांची OTP प्रक्रिया पूर्ण करा.
- लाभार्थी भगिनीचा जात प्रवर्ग निवडा.
- आवश्यक प्रमाणित घोषणापत्रावर क्लिक करून संपूर्ण माहितीची एकदा पडताळणी करावी आणि 'Submit' बटण क्लिक करावे.
- 'e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली' असा संदेश स्क्रीनवर दिसल्यास प्रक्रिया पूर्ण झाली समजावी.
ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents For E- KYC):
- लाभार्थी महिलेचे आधार कार्ड आणि फोटो.
- रेशन कार्ड आणि उत्पन्नाची माहिती.
- डोमासाईल किंवा १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करावे लागेल.
- महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास, पतीचे वरीलपैकी कोणतेही (१५ वर्षांपूर्वीचे) अधिवास सिद्ध करणारे कागदपत्र लागेल.
- वार्षिक उत्पन्न: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. शुभ्र शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे लागेल.
- बँक खाते तपशील (Bank Account Details) आणि लाभार्थी महिलेचे हमीपत्र.
Topics mentioned in this article
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world