Ladki Bahin Yojana E- KYC Last Date: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. लाडकी बहीण योजनेसाठी ईकेवायसी अनिर्वाय करण्यात आली आहे. यासाठी आता अवघे पाच दिवस उरले आहेत. 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही ईकेवायसी न केल्यास तुमचा पुढील महिन्याचा हप्ता येणार नाही. त्यामुळे सर्व लाभार्थी भगिनींनीही 18 नोव्हेंबर पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन मंत्री अदिती तटकरेंनी केले आहे.
ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण कराल? (How to Complete e-KYC Know Step By Step Process
- लाभार्थींनी त्यांच्या मोबाईल अथवा संगणकावर ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी.
- पोर्टलवर लॉगिन केल्यावर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासंबंधीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर आपला आधार क्रमांक आणि Captcha Code योग्य ठिकाणी टाका.
- आधार प्रमाणिकरणासाठी परवानगी देऊन 'Send OTP' या पर्यायावर क्लिक करा.
- आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाईप करा.
- यानंतर, पती/वडिलांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड नमूद करून त्यांची OTP प्रक्रिया पूर्ण करा.
- लाभार्थी भगिनीचा जात प्रवर्ग निवडा.
- आवश्यक प्रमाणित घोषणापत्रावर क्लिक करून संपूर्ण माहितीची एकदा पडताळणी करावी आणि 'Submit' बटण क्लिक करावे.
- 'e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली' असा संदेश स्क्रीनवर दिसल्यास प्रक्रिया पूर्ण झाली समजावी.
ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents For E- KYC):
- लाभार्थी महिलेचे आधार कार्ड आणि फोटो.
- रेशन कार्ड आणि उत्पन्नाची माहिती.
- डोमासाईल किंवा १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करावे लागेल.
- महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास, पतीचे वरीलपैकी कोणतेही (१५ वर्षांपूर्वीचे) अधिवास सिद्ध करणारे कागदपत्र लागेल.
- वार्षिक उत्पन्न: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. शुभ्र शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे लागेल.
- बँक खाते तपशील (Bank Account Details) आणि लाभार्थी महिलेचे हमीपत्र.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world