Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी अखेरची संधी! 4 दिवसात 'हे' काम करा अन्यथा 1500 रुपये कायमचे बंद

२६ लाख महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. आत्तापर्यंत सरकारने महिलांना ३० एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची संधी दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ladki Bahin Yojana e- KYC Deadline:  एप्रिल महिन्याचे 1500 रुपये कधी येणार? याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची अन् टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसी प्रक्रियेसाठी आत्ता फक्त चार दिवस उरले असून अद्याप 26 लाख 34 हजार महिलांनी ही प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे येत्या चार दिवसात ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास १५०० रुपये कायमचे बंद होऊ शकतात. 

Pune News: पुण्यातील नामांकित लॉ कॉलेजमध्ये रॅगिंग! 5 विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा, तरुणासोबत भयंकर प्रकार

लाडक्या बहिणींसाठी शेवटची संधी! 

सविस्तर माहिती अशी की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या कोट्यवधी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. राज्यात सध्या २ कोटी ४७ लाख लाभार्थी महिला आहेत, मात्र त्यापैकी २६ लाख महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. आत्तापर्यंत सरकारने महिलांना ३० एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची संधी दिली आहे.

Advertisement

जर ही दुरुस्ती वेळेत केली नाही, तर दरमहा मिळणारे १५०० रुपये कायमचे बंद होऊ शकतात. ​दुसरीकडे, योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकार सतर्क झाले आहे. चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्या पुरुषांवर आणि अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, ज्या महिलांनी अर्जात चुका केल्या आहेत, त्यांना अधिकृत वेबसाईटवर जाऊन दुरुस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेतून खऱ्या गरजू महिलांनाच लाभ मिळावा, हा सरकारचा उद्देश आहे. ज्या महिलांची कागदपत्रे अपूर्ण आहेत त्यांनी ३० एप्रिल रोजी बँक बंद होण्यापूर्वी आपली लिंक सक्रिय करून घेणे आवश्यक आहे.

नक्की वाचा >> HSC Result Update : बारावीचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार? डिजीलॉकरवर मोठी अपडेट, कसा पाहाल निकाल?