Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा हप्ता हवाय? मग 'हे' काम तातडीने पूर्ण करा; सरकारने वाढवली मुदत!

Ladki Bahin Yojana E- KYC:  राज्यातील लाखो महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Ladki Bahin Yojana E- KYC:  . महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रक्रियेला मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे.

Ladki Bahin Yojana E- KYC:  राज्यातील लाखो महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या भगिनींना भेडसावणारी ई-केवायसीची अडचण आता दूर होणार आहे. तांत्रिक कारणांमुळे किंवा इतर अडचणींमुळे ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांच्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रक्रियेला मुदतवाढ दिल्याची घोषणा केली असून, आता लाभार्थी महिलांना 30 एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण करता येणार आहे.

काय आहे सरकारचा नवा निर्णय?

लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्याची मुदत आता 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ज्या महिलांचे केवायसी अद्याप बाकी आहे, त्यांनी या शेवटच्या संधीचा त्वरित फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Advertisement

विशेष म्हणजे, ज्या लाभार्थी महिलांनी फॉर्म भरताना काही चुका केल्या असतील, त्यांना त्या चुका दुरुस्त करण्यासाठी देखील ही वाढीव मुदत अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेचे e-KYC करताना OTP येत नाही? ही सोपी पद्धत वापरा आणि लगेच समस्या सोडवा )
 

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची सोपी पद्धत

ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थी महिलांनी आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी. पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचा पर्याय निवडावा. तिथे आपला आधार क्रमांक आणि दिलेला कॅप्चा कोड योग्य ठिकाणी भरावा. 

त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी 'Send OTP' वर क्लिक करावे. आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर, पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक भरून त्यांचीही ओटीपी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर आपला जात प्रवर्ग निवडून सर्व माहितीची पडताळणी करावी आणि 'Submit' बटण दाबावे. स्क्रीनवर यशस्वीरीत्या प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेश आल्यास तुमचे काम पूर्ण झाले असे समजावे.

( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचा रिजेक्ट झालेला अर्ज पुन्हा होईल मंजूर; फक्त फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स )

ई-केवायसीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

या प्रक्रियेसाठी लाभार्थी महिलेचे आधार कार्ड, फोटो, रेशन कार्ड आणि उत्पन्नाची माहिती असणे आवश्यक आहे. रहिवासी पुराव्यासाठी डोमासाईल प्रमाणपत्र किंवा 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यांपैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करावे लागेल. 

Advertisement

महिलेचा जन्म परराज्यातील असेल, तर पतीचे 15 वर्षांपूर्वीचे अधिवास सिद्ध करणारे कागदपत्र आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाही, मात्र शुभ्र शिधापत्रिका असल्यास ते जोडावे लागेल. यासोबतच बँक खाते तपशील आणि हमीपत्र देणे अनिवार्य आहे.

Topics mentioned in this article