जाहिरात

Ladki Bahin Yojana E-KYC : E KYC ची मुदत लवकर संपणार, लाडक्या बहिणींकडे शेवटचे किती दिवस शिल्लक?

e-KYC करण्यासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप e-KYC केली नसेल त्यांनी तातडीने करून घ्यावी.

Ladki Bahin Yojana E-KYC : E KYC ची मुदत लवकर संपणार, लाडक्या बहिणींकडे शेवटचे किती दिवस शिल्लक?

Ladki Bahin Yojana E-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला e-KYC करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांकडून लाभ घेतला जात असून नियमांची पायमल्ली केली जात असल्याचं समोर आलं आहे. प्रक्रिया अधिक कडक करीत प्रत्येक लाभार्थी महिलेला e-KYC अनिवार्य करण्यात आलं आहे. यासाठी दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. अखेर दिलेला अवधी लवकरच संपणार आहे. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून महिलांना आवाहन केलं आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. मात्र या योजनेत अनेक अपात्र महिलांकडून लाभ घेतला जात असल्याचं समोर आल्यानंतर ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात याबाबत अधिसूचना काढण्यात आली होती. याशिवाय २१ सप्टेंबरला मंत्री आदिती तटकरे यांनी चार्टफ्लो शेअर करीत e-KYC करण्याची प्रत्येक स्टेप सविस्तरपणे सांगितली होती. मात्र यानंतरही अनेक महिलांना अडचणीचा सामना करावा लागत होता. 

दरम्यान तटकरे यांनी आणखी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय, दिनांक १८ सप्टेंबर २०२५ पासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर e-KYC सुविधा उपलब्ध आहे. यासाठी २ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनीही १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com