Ladki bhain scheme : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. २४ फेब्रुवारी उजाडला तरी अद्याप लाडकी बहीण योजनेचा हफ्ता आला नसल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. दरम्यान लाडक्या बहिणींसाठी मोठी माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा झाला आहे. जानेवारी महिन्याचा हफ्ता जमा झाला आहे. पुढील 2-3 दिवसांत सगळ्या लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
आदिती तटकरेंचं ट्वीट...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा जानेवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया २३ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जानेवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) February 24, 2026
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया २३ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३… pic.twitter.com/mycGTG3Bk0
महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असं आदिती तटकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world