5 hours ago

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे सिनेट निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. सिनेट निवडणुकीत युवासेनेने आखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे ABVP चा धुव्वा उडवला आहे.  सर्व जागा जिंकत मुसंडी मारली आहे. सिनेट निवडणुकीत युवासेनेचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध केला आहे. 2018 ची पुनरावृत्ती करत युवासेनेने 10 पैकी 10 जागांवर विजय मिळवला आहे. 

युवासेना सिनेट विजयी उमेदवार

  • प्रदीप सावंत 
  • मिलिंद साटम 
  • परम यादव 
  • अल्पेश भोईर 
  • किसन सावंत
  • स्नेहा गवळी
  • शीतल शेठ 
  • मयूर पांचाळ 
  • धनराज कोहचडे 
  • शशिकांत झोरे
Sep 28, 2024 15:40 (IST)

कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी भटाळे तलावा जवळील अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा

कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी भटाळे तलावा जवळील अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा

भटाळे तलावात भराव टाकून उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई

कारवाईला विरोध करत काही लोकांची घोषणाबाजी,  पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या लोकांना ताब्यात घेत सुरू केली कारवाई

Sep 28, 2024 14:00 (IST)

सन्मानपूर्वक जागा न भेटल्यास 288 जागा लढण्याची तयारी, महादेव जाणकरांचा महायुतीला इशारा

सन्मानपूर्वक जागा न भेटल्यास 288 जागांची आमची तयारी असल्याचा इशारा रासप नेते महादेव जानकर यांनी महायुतीला दिला आहे.  आमची 35 ते 40 जागांची  मागणी आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचेच अजून मिटेना, त्यामुळे आमच्यासोबत चर्चेचा प्रश्नच नाही, असं म्हणत जानकरांनी महायुतीच्या नेत्यांना चिमटा काढला. महादेव जानकरांच्या भूमिकेमुळे महायुतीत तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. 

Sep 28, 2024 12:18 (IST)

अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता सुरू, आज दिवसभर देवीचे दर्शन राहणार बंद

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील मुख्य गाभाऱ्याची स्वछता आज सुरु आहे. आज दिवसभर मुख्य मूर्तीच दर्शन बंद असणार आहे. मूर्तीवर इरलं पांघरलं आहे.  शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील स्वच्छता पूर्णत्वास येत आहे. आज गाभार्‍यातील स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर मूर्तीच पूजन होईल त्यानंतर देवीच दर्शन खुलं होईल.

Sep 28, 2024 11:40 (IST)

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील वकील घनश्याम उपाध्याय यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. एन्काऊंटरच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याची याचिकेत मागणी केली आहे. या एसआयटीकडून एन्काऊंटर प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी एन्काऊंटरवर मुंबई उच्च न्यायालयानेही उपस्थित केले होते सवाल. 

Advertisement
Sep 28, 2024 11:16 (IST)

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या नावाने बोगस फेसबुक खातं

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या नावाने एक बोगस फेसबुक खातं तयार करण्यात आलं आहे.  Devendra Singh IAS Ratnagiri Collectorate या नावाने हे बोगस फेसबुक खातं तयार करण्यात आलं आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांचं हे फेसबुक खातं नाही. त्यामुळे यावरुन आलेली फ्रेंड रिक्वेस्ट कोणीही स्वीकारु नये, असं आवाहन  जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.  

Sep 28, 2024 09:50 (IST)

मुसळधार पावसाचा भात शेतीला फटका, हजारो हेक्टरवरील पिकाचं नुकसान

पालघर जिल्ह्यात पावसामुळे भात शेतीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे . 90 दिवसांचं असलेलं हळवं भात पीक पूर्णपणे तयार झालं असतानाच पावसाने हाताशी आलेलं पीक जमीनदोस्त केलं आहे. पालघर जिल्ह्यात  75 हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली असून , यापैकी 25 हजार हेक्टर वरील हळवं भात पिक काढणी योग्य झालं असतानाच पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे.यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या सगळ्या नुकसानीचे पंचनामे करून सरकारने मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.

Advertisement
Sep 28, 2024 09:43 (IST)

महायुतीचं ठरलं! विधानसभेसाठीच्या उमेदवारांची यादी या दिवशी जाहीर होणार?

महायुतीची विधानसभेसाठीची उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता. 

घटस्थापनेचा मुहूर्त साधून 3 ऑक्टोबर रोजी महायुतीची पहिली यादी जाहीर होण्याचे संकेत.

Sep 28, 2024 09:12 (IST)

नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाचा मार्ग मोकळा

नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला खऱ्या अर्थाने जागतिक स्वरूप देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने कंत्राटासंदर्भातील दोन क्युरेटिव्ह याचिका निकालात काढल्याने जी एम आर एअरपोर्ट ही कंपनी आता या विमानतळाचा विकास करणार हे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकार आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र केंद्र सरकारची ही भूमिका नसल्याचे न्यायालयात स्पष्ट करण्यात आल्याने सदर याचिका रद्द करण्यात आल्या. आता दोन धावपट्टी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्गो विमानतळ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म x वर पोस्ट करून नागपुरातील जागतिक दर्जाचे ब्राऊन फिल्ड विमानतळ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Advertisement
Sep 28, 2024 08:42 (IST)

नायर रुग्णालयातील विनयभंग प्रकरण, आणखी 10 विद्यार्थिनींची निलंबित प्राध्यापकाविरोधात तक्रार

नायर रुग्णालयातील विनयभंग प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापकाविरोधात आणखी 10 विद्यार्थिनींनी चौकशी समितीसमोर तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी मुंबई महानगरपालिकेकडून सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राकडे सोपवण्यात आली आहे. त्यानुसार या केंद्राकडून गुरुवारी पीडित तरुणीसह अन्य विद्यार्थिनींना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.

Sep 28, 2024 08:06 (IST)

राज ठाकरे पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार

मनसे प्रमुख राज ठाकरे दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे विदर्भातील 11 जिल्ह्यांचा आढावा घेतातहेत. काल राज ठाकरेंनी पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यातील मनसैनिकांची बैठक घेतली. तसेच या जिल्ह्यातील मनसेची स्थिती ही त्यांनी जाणून घेतली. आज राज ठाकरे पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. बैठकीनंतर विदर्भातील विधानसभेची पहिली यादी ठाकरे घोषित करणार असल्याची शक्यता.