1 hour ago

Latest News Update : मागील दोन दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं. अखेर आज मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतील दादर , माहीम , वरळी , बांद्रा परिसरात जोरदार पाऊस बरसला. मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींमुळे मुंबईकरांचा शनिवार सकाळी पळापळा झाली.  

मात्र उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने आज मुंबईसाठी पावसाचा यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार आज पावसाने अनेक भागात जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबईतही काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.

May 17, 2025 17:46 (IST)

LIVE Updates: आमदार रमेश बोरणारे यांनी भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप

शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारे यांनी भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप 

वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल,मारहाणीचा दावा करणारा व्हिडिओ समोर 

कैलास पवार असे मारहाण झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव 

कैलास पवार यांनी त्यांच्या प्लॉटवरून रस्ता जात असल्याची केली होती तक्रार 

रस्ता करण्या अगोदर लेआउट पाहून काम करण्याची केली होती मागणी 

आमदार बोलणारे यांनी शिवीगाळ करून तुझा जुना हिशोब चुकता करायचा आहे असे म्हणत  मारहाण केल्याचा पवारांचा आरोप

संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणून गुन्हा दाखल करून दिल्याचा पवार यांचा आरोप 

May 17, 2025 17:44 (IST)

LIVE Updates: मुसळधार पावसात वीज कोसळून 10 जनावरे दगावली

काल मध्यरात्री अचानक झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसादरम्यान धानोरा तालुक्यातील खरगी येथील वाई शिवारातील एका झाडावर वीज पडली. याच झाडाखाली विश्रांती घेत असलेली  दहा जनावरे दगावली. 

ही घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे या पशुधन मालकांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.

May 17, 2025 15:52 (IST)

LIVE Updates: नांदगावमध्ये भीषण अपघात, 3 जण ठार, 15 जखमी

नांदगाव–चाळीसगाव रस्त्यावरील ' सानप ' खाजगी बाजार समितीसमोर शुक्रवारी सायंकाळी ईर्टिगा कार आणि मालवाहू वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत..अपघातातील तिघे मृत व्यक्ती हे निफाड तालुक्यातील जळगाव येथील असून, जखमींवर निफाड आणि नाशिक येथे उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे..नांदगाव तालुक्यातील कासारी येथील लग्नसोहळा उरकून परतत असतांना हा अपघात घडला..घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलिस करीत आहे..

May 17, 2025 15:09 (IST)

LIVE Updates: पुण्याचे काँग्रेस नेते दत्ता बहिरट यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

पुण्याचे काँग्रेस नेते दत्ता बहिरट यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट 

पुण्यात भेट घेत अजित पवारांसोबत दत्ता बहिरट यांनी केली चर्चा 

दत्ता बहिरट हे पुण्याचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार 

अजित पवारांच्या भेटीनंतर दत्ता बहिरट राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची पुण्यात चर्चा

Advertisement
May 17, 2025 14:14 (IST)

छगन भुजबळांकडे एक कोटींच्या खंडणीची मागणी, आरोपीला अटक

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याकडे एक कोटींच्या खंडणी मागणी करण्यात आली आहे. भुजबळ यांच्या मोबाईलवर फोन करून त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड आणि संशयित आरोपींमध्ये झाला होता संवाद. तुमच्या त्र्यंबकेश्वरच्या फार्म हाऊसवर माल ठेवला असून तिथे आयकर विभागाची धाड पडणार आहे, त्या पथकात मी देखील असून धाडीत मी सहकार्य करेल अशी दिली  होती बतावणी. आयकर विभागाच्या धाडीत मदत करण्यासाठी 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी मागणाऱ्याला नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत केली अटक. 

May 17, 2025 12:43 (IST)

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अॅम्बुलन्स क्रॅश

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अॅम्बुलन्स क्रॅश

हेलिकॉप्टरचा मागचा भाग तुटला

केदारनाथ हेलिपॅडजवळ दुर्घटना

पायलटच्या प्रसंगावधानामुले मोठी दुर्घटना टळली

दोन डॉक्टर थोडक्यात बचावले

Advertisement
May 17, 2025 12:36 (IST)

Jalgaon News : मुक्ताईनगरमध्ये आयशर ट्रकचा अपघात, 15 पेक्षा अधिक मजूर जखमी

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या बिलसवाडी गावाजवळ आयशर ट्रकचा अपघात झाला असून या अपघातात 15 पेक्षा अधिक मजूर जखमी झाले असून जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे . मुक्ताईनगर कडून रावेर कडे मजुरांना घेऊन जात असताना बिलसवाडी गावाजवळ आयशर ट्रक पलटी होऊन हा अपघात झाला असून अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांनी मदत कार्य करत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले आहे.

May 17, 2025 12:21 (IST)

जळगावात एरंडोल तालुक्यात वीज पडून तरुणाचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या खर्ची गावाजवळ वीज पडून तरुणाचा मृत्यू झाला असून शरद रामा भील असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सासरवाडी वरून आपल्या धरणगाव तालुक्यातील कमवतवाडी येथे जात असताना अचानक वीज पडल्याने या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.  

Advertisement
May 17, 2025 11:14 (IST)

पुण्यातील दौंडमध्ये साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झालाय. पुणे सोलापूर महामार्गावर कुरकुंभ परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी येथील नवनाथ चंद्रकांत रिठे या 27 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात दौंड पोलिसात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून दौंड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल आहे. 

May 17, 2025 10:21 (IST)

माजी आमदार अमित घोडा यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

पालघरचे माजी आमदार अमित घोडा यांनी शिवसेना मुख्य नेते, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. अमित घोडा यांच्यासोबत डहाणू तालुक्यातील मनसे, काँग्रेस आणि इतर पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही पक्षप्रवेश केला. यावेळी पालघर चे आमदार राजेंद्र गावित, जिल्हाध्यक्ष कुंदन संख्ये, जगदीश धोडी उपस्थित होते. 

May 17, 2025 10:20 (IST)

सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे युनायटेड नेशन्स सुरक्षा परिषदेसह प्रमुख भागीदार देशांच्या दौऱ्यावर जाणार

ऑपरेशन सिंदूर आणि सीमापार दहशतवादाविरोधातील भारताच्या सातत्यपूर्ण लढ्याच्या पार्श्वभूमीवर, सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे युनायटेड नेशन्स सुरक्षा परिषदेसह प्रमुख भागीदार देशांच्या दौऱ्यावर जाणार.

दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध भारताच्या शून्य-सहिष्णुतेचा ठाम संदेश या शिष्टमंडळाद्वारे जागतिक स्तरावर नेला जाणार.

सर्वपक्षीय शिष्टमंडळांमध्ये संसद सदस्य, प्रमुख राजकीय व्यक्ती आणि प्रतिष्ठित मुत्सद्दी सहभागी असतील.

सात शिष्टमंडळांचे नेतृत्व पुढील संसद सदस्य करतील.

1. काँग्रेस - शशी थरूर

2. भारतीय जनता पक्ष - रविशंकर प्रसाद

3. जनता दल युनायटेड - संजय कुमार झा

4. भारतीय जनता पक्ष - बैजयंत पांडा

5. द्रमुक - कनिमोळी करुणानिधी

6. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - सुप्रिया सुळे

7. शिवसेना - श्रीकांत एकनाथ शिंदे

May 17, 2025 09:38 (IST)

पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीच्या पूर रेषेमधील बंगल्यावर कारवाईला सुरुवात

पिंपरी चिंचवडमध्ये इंद्रायणी नदीच्या पूर रेषेमधील 29 बंगल्यावर आज महानगरपालिकेन पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात केली आहे.  पहाटेपासून बंगले जमीनदोस्त करण्याची कारवाई पालिकेने हाती घेतली. सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार सर्व बंगले आज पाडले जातायेत.

May 17, 2025 09:37 (IST)

वाडा येथील रोजगार हमी तांत्रिक सहाय्यकाला लाच घेतल्याप्रकरणी अटक

वाडा पंचायत समितीच्या  रोजगार हमी योजना विभागातील तांत्रिक सहाय्यकाला पाच हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. सुशील भिमराव कटारे (वय ३८) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. विहिरीच्या निधी मंजुरीसाठी त्याने ही लाच स्वीकारली आहे. या कारवाईमुळे पंचायत समितीमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. एका लाभार्थ्याला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील विहिरीकरिता पाच लाखांचा निधी मंजुरी देण्यासाठी या अधिकाऱ्याने स्वतःसाठी पाच हजार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना १५ हजार असे एकूण २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी स्वतःसाठी पाच हजार रुपये घेताना त्याला पकडले मात्र ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नवीन पंधरा हजार रुपयाची लाच मागितली तो नेमका कोण आहे याबाबत चर्चांना उधाण आले आहे. याप्रमाणे वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

May 17, 2025 08:51 (IST)

पुढच्या वर्षीच्या ‘यूपीएससी’ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २०२६ मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार नागरी सेवा परीक्षेतील पूर्वपरीक्षा २४ मे रोजी, तर मुख्य परीक्षा २१ ऑगस्ट रोजी होणार आहे.

‘यूपीएससी’तर्फे केंद्रीय स्तरावरील पदभरतीसाठीच्या विविध परीक्षा आयोजित करण्यात येतात. त्यात नागरी सेवा, अभियांत्रिकी सेवा, एनडीए भरती, वनसेवा अशा विविध परीक्षांचा समावेश आहे. देशभरातील लाखो उमेदवार या परीक्षा देतात. वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्यात आल्यामुळे वेळापत्रकानुसार उमेदवारांना परीक्षांची तयारी करणे शक्य होणार आहे.

May 17, 2025 08:41 (IST)

पुण्यात कोयता गँगचा पुन्हा हैदोस, बिबेवाडी पोलिसांकडून ८ जणांना अटक

पुण्यात कोयता गँगचा पुन्हा हैदोस 

कोयते नाचवले, गाड्या फोडल्या पुण्यात मध्यरात्री टोळक्यांचा राडा 

पुण्यातील अप्पर इंदिरानगरमधील घटना 

भर वस्तीतील गाड्या फोडत मोठमोठ्याने शिवीगाळ 

आरोपींकडून मित्राला मारहाण करत गाड्यांची तोडफोड

परिसरात दहशत पसरवण्यासाठी टोळक्याकडून धुडगूस

कोयते आणि दांडके नाचवत दहशत वाजवण्याचा प्रयत्न 

 बिबवेवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल 

बिबेवाडी पोलिसांकडून ८ जणांना अटक

May 17, 2025 08:40 (IST)

गुंड गज्या मारणे आणि टोळी 15 गाड्या जप्त; पुणे पोलिसांची कारवाई

गुंड गज्या मारणे आणि टोळीला पुणे पोलिसांचा पुन्हा दणका 

गज्या मारणे आणि टोळीच्या 15 गाड्या पुणे पोलिसांनी केल्या जप्त 

गज्या मारणेच्या 2 फॉर्च्युनर, थार, नेक्सानसह 15 अलिशान गाड्या पोलिसांकडून जप्त

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई 

मारणे टोळीचा प्रमुख गजा मारणेसह टोळीतील इतर सदस्यांच्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यामध्ये, दुचाकीसह अलिशान चारी चाकी गाड्यांचाही समावेश 

 2 टोयोटा फॉर्च्यूनर, एक महिंद्रा थार, एक टाटा नेक्सन यासह आणखी 4 चारचाकी गाड्या जप्त

May 17, 2025 08:39 (IST)

पुण्यातील धरणसाखळीक्षेत्रात ६.८५ टीएमसी पाणीसाठा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांमध्ये मिळून ६.८५ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचित जास्त आहे.

शहराला खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांतून पाणीपुरवठा केला जातो.

त्यांपैकी टेमघर धरणामध्ये ८.७६ टक्के, वरसगावमध्ये २५.४६ टक्के, पानशेतमध्ये २०.५६ टक्के, तर खडकवासला धरणामध्ये ५४.३९ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणसाखळी प्रकल्पात ६.६५ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. यंदा तो ६.८५ टीएमसी एवढा आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

May 17, 2025 08:39 (IST)

उपविभागीय अधिकाऱ्याच्या गाडी वाळूच्या ट्रकने उडवण्याचा प्रयत्न, छ. संभाजीनगरमधील घटना

उपविभागीय अधिकाऱ्याचा गाडीवर वाळूचा हायवा टाकण्याचा प्रयत्न, छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील घटना 

जीव मुठीत घेऊन महसूल विभागाचे अधिकारी पळत होते 

उपविभागीय अधिकारी अरुण जऱ्हाड थोडक्यात बचावले 

जीव वाचवण्यासाठी महसूल विभागाने पळवली गाडी 

पुढे अधिकाऱ्यांची गाडी, मागून वाळूचा हायवा

Topics mentioned in this article