2 months ago

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आजा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिवाय हर्षवर्धन पाटील हे पुढची राजकीय भूमीका आजच जाहीर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्या पार्श्वभूमीवर कॅबिनेटची बैठक होत आहे. शिवाय शरद पवार हे सांगलीत आहेत. त्यामुळे आजचा दिवस हा राजकीय घडामोडींचा दिवस आहे.
 

Oct 04, 2024 19:45 (IST)

छत्तीसगडमध्ये 36 नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि नारायपूर जिल्ह्यातील सीमेवर अबूझमाडमध्ये सुरक्षा दलानं केलेल्या मोठ्या कारवाईत 36 नक्षलवादी मारले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनास्थळी मोठा शस्त्रसाठी जप्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. 

Oct 04, 2024 19:29 (IST)

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सुमारे 14 लाख ग्राहकांचा डेटा गायब, सूत्रांची माहिती

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सुमारे 14 लाख ग्राहकांचा डाटा गायब झाल्याची सूत्रांची माहिती. काल सकाळी 11 वाजेपासून आतापर्यंतही बँकेचे सर्व व्यवहार ठप्प

शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी पिकविम्याचे 28 कोटी रक्कम देखील अडकली 

सॉफ्टवेअर सदोष असल्याचं परिणाम 

प्रतिदिन 10 कोटी तर वार्षिक 1500 कोटींची होते उलाढाल

Oct 04, 2024 17:34 (IST)

राहुल गांधी यांचा आजचा दौरा रद्द, उद्या सकाळी 8.30 वाजता कोल्हापुरात दाखल होणार

राहुल गांधी यांचा आजचा दौरा रद्द, उद्या सकाळी 8.30 वाजता कोल्हापुरात दाखल होणार 

Oct 04, 2024 17:34 (IST)

राहुल गांधी यांचा आजचा दौरा रद्द, उद्या सकाळी 8.30 वाजता कोल्हापुरात दाखल होणार

राहुल गांधी यांचा आजचा दौरा रद्द, उद्या सकाळी 8.30 वाजता कोल्हापुरात दाखल होणार 

Advertisement
Oct 04, 2024 17:34 (IST)

राहुल गांधी यांचा आजचा दौरा रद्द, उद्या सकाळी 8.30 वाजता कोल्हापुरात दाखल होणार

राहुल गांधी यांचा आजचा दौरा रद्द, उद्या सकाळी 8.30 वाजता कोल्हापुरात दाखल होणार 

Oct 04, 2024 17:04 (IST)

अहमदनगर जिल्ह्याचे नाव आता अहिल्यानगर! केंद्र सरकारची मंजुरी

अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

Advertisement
Oct 04, 2024 16:52 (IST)

राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ

राज्यातील अकृषिक कर आकारणीचा जनतेवर पडत असलेला बोजा पूर्णपणे काढण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सध्या गावातील गावठाणांमध्ये असणाऱ्या जमिनीवरील अकृषिक कर कायमस्वरुपी माफ आहे. मात्र गावठाणाबाहेर रहिवासी घरांची संख्या वाढत असल्याने आणि शहरी भागात बहूमजली इमारती वाढत असल्याने अशा इमारतींखालील जमिनींचा संपूर्ण अकृषिक कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे वाणिज्य आणि औद्योगिक वापराखालील जमिनीवरील अकृषिक कर रद्द करण्यात येईल.

Oct 04, 2024 15:34 (IST)

आणखी एका आमदाराने अजित पवारांची साथ सोडली, लेकासाठी शरद पवारांकडे उमेदवारी मागितली

राज्यातला चर्चेत असणाऱ्या माढा मतदारसंघातून आता थेट अजित पवारांना धक्का बसला आहे. अजित पवार समर्थक आमदार बबन शिंदे यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे. त्यांनी थेट आपल्या मुलासाठी शरद पवारांकडे उमेदवारीची मागणी केली आहे. जर शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही तर आपण मुलाला अपक्ष उभे करू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे माढ्याचे राजकीय गणित आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे.  

Advertisement
Oct 04, 2024 12:45 (IST)

नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या

आदिवासी आरक्षणात होणाऱ्या घुसखोरी विरोधात आदिवासी आमदारांनी मंत्रालयात आंदोलन केले. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह इतर आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील जाळीवर उड्या मारत हे आंदोलन केले. त्या आधीच आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर या लोकप्रतिनिधींनी या उड्या मारल्या. त्यानंतर मंत्रालयातच या आमदारांनी ठिय्या आंदोलन केले. 

Oct 04, 2024 12:32 (IST)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल बाहेर 29 वर्षीय महिलेवर अत्याचार

पीडीत महिला CSMT स्थानकाबाहेर 22 सप्टेंबरच्या रात्री एकटीच होती. दोन अज्ञात व्यक्ती तिथे आले. यातील एकाने महिला आरडा ओरड करेल म्हणून तिचे तोंड धरले. CSMT स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टॅडच्या पाठीमागे तिलाते घेऊन गेले. त्यानंतर दोघांनी आळीपाळीने महिलेला धमकावून तिच्यावर अत्याचार केले. असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

Oct 04, 2024 12:07 (IST)

हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला रामराम

हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला रामराम केला आहे. इंदापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची पाटील यांनी घोषणा केली आहे. शिवाय  शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा ही त्यांनी यावेळी केली.  मी आणि माझे कार्यकर्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा इंदापूर इथं घेतला त्यावेळी ते बोलत होते.

Oct 04, 2024 11:58 (IST)

मला राजकीय जीवनातून संपवू नका- अशोक चव्हाण

मला राजकारणातून संपवू नका , मी संपलो तर तूम्ही कसं रहाल, असं वक्तव्य खासदार अशोक चव्हाण यांनी विरोधकांना उद्देशून केलं आहे. नांदेड मधील त्यांच्या भोकर मतदार संघातील शेलगाव येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. भोकर मधून  त्यांची कन्या श्रीजया चव्हाण विधानसभा लढणार आहे . श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारार्थ अशोक चव्हाण मतदार संघ पिंजून काढत आहेत . 

Oct 04, 2024 11:02 (IST)

आरक्षणाची मर्यादा 75% पर्यंत वाढवा, शरद पवारांची मागणी

आरक्षणाची मर्यादा 75% पर्यंत वाढवावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. ते म्हणाले  माझे स्पष्ट मत आहे की, यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यायला हवा. संसदेमध्ये दुरुस्ती आणावी, आम्ही सगळे लोक जे आमचे  खासदार आहेत. आम्ही सरकारच्या बाजूने मतदान करू, त्यांना साथ देऊ, अशी स्पष्ट भूमिका शरद पवारांनी मांडली.

Oct 04, 2024 10:06 (IST)

मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा अपघात, एअरबॅगमुळे राठोड बचावले

वाशीम जिल्ह्याच्या पोहरादेवी वरून यवतमाळकडे जात असताना पालकमंत्री संजय राठोड यांच्या  वाहनाचा अपघात झाला आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनाला मागून धडक दिली. त्यामुळे त्याची गाडी जागीच उलटली. त्यातील वाहन चालक गंभीर जखमी झाला. जखमी वाहन चालकाला राठोड यांनी यवतमाळ येथे उपचारासाठी लगेच दाखल केले आहे. 

Oct 04, 2024 09:34 (IST)

पाचोरा येथे दांडिया खेळताना चक्कर येऊन 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी पाचोरा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरात नवरात्रोत्सवात दांडिया खेळताना चक्कर येऊन एक 28 वर्षीय तरुण कोसळला. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लखन वाधवाणी असे मृत्यू झालेल्या तरुणाची नाव आहे. 

Oct 04, 2024 08:54 (IST)

पुण्यातल्या बोपदेव घाटामध्ये 21 वर्षीय तरुणीवर गँग रेप

पुण्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होत असताना दिसत आहे. गुरूवारी रात्री 11 च्या सुमारास बोपदेव घाटामध्ये 21 वर्षीय तरुणीवर गँग रेप झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ती तिच्या मित्रा सोबत बोपदेव घाटात गेलेली असताना 3 अज्ञात व्यक्तींने तिच्यावर गँग रेप केला. त्यानंतर आरोपी फरार झाले आहेत.  

Oct 04, 2024 08:34 (IST)

राज्यातील 29 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास 29 हजार 443 सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार अ वर्गातील 42, ब वर्गातील 1716 , क वर्गातील 12250, आणि ड वर्गातील 15435 ऐवढ्या  संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पुणे जिल्ह्यात आणि शहरात मिळून 3048 सहकारी संस्था आहेत. 

Oct 04, 2024 08:29 (IST)

पुणे ते बंगळुरू विमान पुणे विमानतळावर 5 तास थांबून

पुण्याहून बंगळुरूला जाणारे विमान पुणे विमानतळावर पाच तास उभेच होते. पायलटच्या गोंधळामुळे विमानाला उड्डाण घ्यायला तब्बल पाच तास उशीर झाला. माझ्या कामाचे तास पूर्ण झाले आहेत. त्यामुळे मी आता विमान उडवणार नाही, असे त्याने सांगितले. त्यामुळे पायलट आणि प्रवाशी यांच्यात वादही झाला. त्यामुळे पुणे विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा झाला. 

Oct 04, 2024 07:53 (IST)

पंतप्रधानांच्या दौऱ्यावरुन महायुतीत नाराजीनाट्य, CM शिंदेंना झुकते माप का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबरला मुंबईत येत आहेत. यावेळी ठाण्यात मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे. मात्र यावरून भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरू असल्याचे समजत आहे. मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुंबईत होणे गरजेचे होते. असे असताना ते ठाण्यात का? असा प्रश्न भाजप कार्यकर्ते विचारत आहेत. यातून शिंदे आपले शक्तीप्रदर्शन करणार आहेत.  

Oct 04, 2024 07:48 (IST)

पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात मोठी आग

पुणे रेल्वे-स्टेशन समोरील विल्सन गार्डन येथे अग्रवाल जनरल स्टोअर्सला आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची पुणे अग्निशमन दलाची प्राथमिक माहिती आहे. आगीत कुणीही जखमी नाही. आगीवर अग्निशमनलाकडून पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आज पहाटे चारच्या सुमारास ही आग लागली. 

Oct 04, 2024 07:45 (IST)

राज्यमंत्रीमंडळाची आज बैठक, कोणते निर्णय होणार याकडे लक्ष

राज्यमंत्रीमंडळाची आज बैठक होत आहे. या बैठकीत राज्य सरकार कोणते निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुका कधीही जाहीर होवू शकतात. त्या आधीची ही शेवटची कॅबिनेट असू शकते अशीही चर्चा आहे.  

Oct 04, 2024 07:39 (IST)

हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार?

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर ते आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी जाण्याबाबत निर्णय घेणार आहेत. ते शरद पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.