Latur News: 11 तरुण, 11 सायकल अन् 1200 किमीचा प्रवास! 'या' 3 गोष्टीच्या प्रचारासाठी थेट अयोध्या गाठणार

दररोज सरासरी १५० कि.मी. सायकल चालवून हे 'योद्धे' प्रभू रामाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पोहोचणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

त्रिशरण मोहगावकर, लातूर

Ahmedpur News:  ओठात रामनाम, पायात जिद्द आणि मनात मानवतेची एकता..." याच भावनेतून अहमदपूर येथील ११ सायकलपटू शुक्रवारी अयोध्येकडे झेपावणार आहेत. अहमदपूर सायकलिस्ट क्लब आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा उपक्रम केवळ एक प्रवास नसून तो जागतिक शांतता, पर्यावरण संवर्धन आणि जातीय सलोख्याचा एक महामार्ग ठरणार आहे.

अहमदपूर ते अयोध्या...

अहमदपूर ते अयोध्या हे १२५१ कि.मी.चे अंतर सायकलने पार करण्याचा संकल्प या टीमने केला आहे. आज २६ डिसेंबर रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा प्रवास सुरू झाला. दररोज सरासरी १५० कि.मी. सायकल चालवून हे 'योद्धे' प्रभू रामाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पोहोचणार आहेत.

Pune Crime: कोंडव्यातील काकडे वस्तीत धाड.. घबाड पाहून पोलिसही हादरले; 70 लिटर दारु अन्....

या प्रवासाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात सहभागी असलेले लुल्ला शेख. जि. प. शिक्षक असलेले शेख हे मुस्लीम धर्मीय असूनही 'माणुसकी' हाच श्रेष्ठ धर्म मानून या अयोध्यावारीमध्ये हिरहिरीने सहभागी झाले आहेत. जिथे समाज धर्माच्या भिंती उभ्या करत आहे, तिथे लुल्लाभाई आणि त्यांचे मित्र सायकलच्या चाकांतून सलोख्याचा संदेश देत 'हृदय ते हृदय' जोडणारा सेतू बांधत आहेत. हा प्रवास संविधानातील बंधुतेचा आणि भारतीयत्वाच्या आत्म्याचा प्रवास मानला जात आहे.

हे आहेत अयोध्येला जाणारे ११ 'सायकल वीर':

नवनाथ हंडे (वय ४०, ज्वेलर्स व्यापारी)
धनंजय तोकले (वय ५५, शिक्षक)
भरत ईगे (वय ४८, ज्वेलर्स)
सूर्यकांत साकोळे (वय ४०, जि. प. शिक्षक)
कल्पक भोसले (वय २६, सॉफ्टवेअर इंजिनिअर)
अजबसिंग यदुवंशी (वय ४२)
लुल्ला शेख (वय ४०, जि. प. शिक्षक)
तुकाराम उगीले (वय ३६, शिक्षक)
कृष्णा काळे (वय ३५, ज्वेलर्स)
नामदेव बरुरे (वय ५०, व्यापारी/शिक्षक)
सतीश गुरमे (वय ४०, पोलीस)

Advertisement

नक्की वाचा: प्रवासाला निघण्यापूर्वी ही बातमी वाचा! 26 डिसेंबरपासून रेल्वे तिकीटाचे दर वाढणार, वाचा सविस्तर

रोटरी क्लब आणि सायकलिस्ट क्लबच्या या उपक्रमातून हे 3 संदेश दिले जाणार: 
पर्यावरण बचाव: इंधनाचा वापर टाळून सायकल चालवण्याचा प्रचार.
जागतिक शांतता: सर्व धर्म समभाव आणि सलोखा जोपासणे.
निरोगी जीवन: सायकलिंगद्वारे आरोग्याप्रती जागरूकता निर्माण करणे.

दरम्यान, "हा प्रवास केवळ श्रद्धेचा नाही, तर तो विचारांचा आणि मूल्यांचा सन्मान करणारा आहे. अहमदपूरच्या मातीतील ही मैत्री आणि एकता संपूर्ण देशासमोर एक आदर्श निर्माण करेल. सध्या अहमदपूर शहरातून या सर्व सायकलवीरांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या या साहसी आणि प्रेरणादायी प्रवासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement
Topics mentioned in this article