त्रिशरण मोहगावकर, लातूर: लातूर जिल्ह्यातील खलंग्री गावातुन एक अजब घटना समोर येत आहे. मुलाच्या गाडीवरून पडून वडील गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या मुलाने गाडी चालवणाऱ्या आपल्या भावा विरोधात पोलीसात फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? वाचा सविस्तर..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूरच्या रेणापूर तालुक्यातील खलंग्री गावातील बालाजी शिंदे हे 6/ 08/ 2025 रोजी बाजारात खरेदीसाठी किनगावला गेले होते. खरेदी नंतर वाहन नसल्याने मुलगा ऋषीकेश याला फोन करून मोटरसायकल घेऊन येण्यास सांगितले असता दुसरा मुलगा शुभम घरची मोटारसायकल ( MH 24 CB 1588 ) घेऊन वडिलांना आणण्यासाठी 12 किलोमीटर अंतरावरील किनगावला गेला.
अनोळखी मुलांना काकूंनी पाणी दिलं; मात्र त्यानंतर जे घडलं ते पाहून थरकाप उडेल, पाहा VIDEO
वडिलांना पाठीमागे बसवुन आणताना किनगाव खलंग्री दरम्यान असलेल्या सताळा पाटीजवळ मागे बसलेले वडील गाडीवरून पडले आणि डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली. बालाजी शिंदे यांना उपचारासाठी किनगाव प्राथमीक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र दुखापत गंभीर असल्याने डॉक्टरांनी प्राथमीक उपचार करून अंबेजोगाई येथे पुढील उपचारासाठी रेफर केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोस्टमॉर्टेम नंतर मृतदेह ताब्यात घेऊन खलंग्री येथे 9 तारखेला अंत्यविधी करण्यात आला. मृत्यु पश्चात हिंदू संस्कृतीनुसार इतर विधी कार्यक्रम पार पडले. त्यानंतर बालाजी शिंदे यांचा मुलगा ऋषीकेश शिंदे याने भाऊ शुभमने निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा दाखवत खड्डयांची काळजी न करता गाडी चालवल्याने वडिलांचा मृत्यू झाल्याची तक्रार दिली आहे. दि. 10 / 09/ 2025 रोजी किनगाव पोलीसात दिल्यावरून BNS 281 व 106 अन्वये शुभम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास किनगाव पोलीस करत आहेत.