Latur News: टेकऑफचे 2 प्रयत्न फसले, आणखी एका मंत्र्याचे विमान उड्डाण रद्द, शेवटी कारने प्रवास

मंत्र्यांचा कारने परतीचा प्रवास आणि रद्द झालेल्या उड्डाणामुळे लातूर जिल्ह्यात विमानात विमानात बिघाड झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

त्रिशरण मोहगावकर, लातूर

Minister Gulabrao Patil Plane technical Issue: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांच्या विमान प्रवासाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशातच लातूरमध्ये शिवसेना नेत्याच्या विमानात बिघाड झाल्याने उड्डाण रद्द करण्यात आले आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत हा प्रकार घडला. 

मंत्री गुलाबराव पाटलांच्या विमानात बिघाड

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी शिवसेना नेते, मंत्री गुलाबराव पाटील सध्या सभा घेत आहेत. अशातच लातूर दौऱ्यावर असलेले गुलाबराव पाटील यांच्या विमानात बिघाड झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. गुलाबराव पाटील यांच्या परतीची निर्धारीत वेळ 4.30 ची होती.

Dharashiv Election: 'अर्चना पाटील यांच्या विजयासाठी ओमराजेंचं प्लॅनिंग', धाराशिवमध्ये राजकारण रंगलं!

मात्र त्यांना विमानतळावर यायला 15 मिनीटे उशीर झाला. टेक ऑफ करण्याचा दोन वेळा प्रयत्न पायलटकडून करण्यात आला. मात्र दृष्यमानता कमी असल्याने उड्डान रद्द करण्यात आले. त्यामुळे गुलाबराव पाटलांना कारने परत जावे लागले. मंत्र्यांचा कारने परतीचा प्रवास आणि रद्द झालेल्या उड्डाणामुळे लातूर जिल्ह्यात विमानात विमानात बिघाड झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

पंकजा मुंडेंचाही झाला होता खोळंबा...

दरम्यान, याआधी दोन दिवसांपूर्वी मंत्री पंकजा मुंडे यांच्याही हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता. मंगळवारी पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगरमधून लातूरकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधीच बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचा प्रवास खोळंबला. अखेर दुसऱ्या हेलिकॉप्टरने त्या लातूरकडे रवाना झाल्या. 

Advertisement

VIDEO: 'दादांची आठवण उडत उडत पायाजवळ', तरुणीला घटनास्थळी सापडला 'असा' कागद; 80 लाख लोकांनी पाहिला व्हिडिओ

Topics mentioned in this article