आरक्षणासाठी तिन आत्महत्या झाल्याचे लातूर जिल्ह्यात समोर आले होते. एका मागून एक झालेल्या या आत्महत्यांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, या आत्महत्येमागचं नक्की कारण काय याचा शोध पोलीसांच्यावतीने घेतला गेला. त्या तपासात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहे. त्यामुळे सर्वच जण आवाक झाले आहे. यासाठी ज्या युक्त्या अवलंबल्या गेल्या त्याचा परदाफाश ही पोलीसांनी आपल्या तपासात केला आहे. त्यामुळे या आत्महत्यांना आता वेगळेच वळण लागले आहे.
लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये आत्महत्या झाल्या होत्या. या आत्महत्या मागे आरक्षणाचे कारण असल्याचे दाखवण्यात आले होते. आत्महत्या केलेल्यांच्या मृतदेहा जवळ चिठ्ठ्या सापडल्या होत्या. त्यात ते आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे लिहीले होते. या चिठ्ठ्यांचा पोलीस प्रशासनाने तपास केला. या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. तीन प्रकरणांमध्ये या चिठ्ठ्या इतर कोणीतरी लिहून त्यांच्या मृतदेहा शेजारी ठेवल्या होत्या. हे सर्व तपासात उघड झाले आहे.
नक्की वाचा - Akola News: अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दिवसाढवळ्या अश्लील चाळे, Video viral
अहमदपूर तालुक्यातील बळीराम मुळे या तरुणांने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्याजवळ चिठ्ठी सापडली होती. ती चिठ्ठी त्याने न लिहिता धनाजी मुळे नावाच्या व्यक्तीने लिहिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या धनाजी मुळेवर अहमदपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रकरणात निलंगा तालुक्यातील शिवाजी मेळळे या व्यक्तीने आत्महत्या केली होती. त्याच्या खिशात ही आत्महत्येची चिठ्ठी सापडली होती. महादेव कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही असा उल्लेख चिठ्ठीमध्ये होता. या चिठ्ठीचा ही पोलीसांनी तपास केला.
त्यावेळी ती चिठ्ठी खोटी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तर तिसऱ्या प्रकरणात साकुर तालुक्यातील अनिल राठोड या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सादर केलेली चिठ्ठी तपासात खोटी सिद्ध झाली आहे. ही चिठ्ठी शिवाजी जाधव या व्यक्तीने लिहिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तीनही प्रकरणात अहमदपूर निलंगा आणि चाकूर या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतर आत्महत्यांच्या प्रकरणांचा तपास पोलीस करत आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.