Gautami Patil Car Accident: अपघातावेळी गौतमी पाटील कारमध्ये होती की नव्हती? अखेर पुणे पोलिसांचा रिपोर्ट आला

Pune Gautami Patil Car Accident Latest Update: या अपघातावेळी गौतमी पाटीलही गाडीमध्ये होती, मात्र तिला वाचवण्यात येत आहे, असा आरोप जखमींच्या कुटुंबियांनी केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अविनाश पवार, प्रतिनिधी: 

Pune Gautami Patil Car Accident News:  गेल्या काही दिवसांपासून लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. गौतमी पाटीलच्या गाडीने धडक दिल्याने एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. या अपघातावेळी गौतमी पाटीलही गाडीमध्ये होती, मात्र तिला वाचवण्यात येत आहे, असा आरोप जखमींच्या कुटुंबियांनी केला आहे. याबाबतच आता पोलिसांचा एक महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे. (Lavani Dancer Gautami Patil Car Accident Latest Update)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अलीकडेच घडलेल्या अपघातप्रकरणात नृत्यकलावंत गौतमी पाटील यांच्यावर झालेल्या आरोपांवर आता पूर्णविराम लागला आहे. पुणे पोलिसांच्या तपासातून गौतमी पाटील निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना अधिकृतरीत्या “क्लीन चिट” देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करताना १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली. या सर्व पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गौतमी पाटील अपघातावेळी गाडीत नव्हती असा निष्कर्ष काढला आहे.

Gautami Patil: गौतमी पाटीलला अटक होणार? ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं ठिय्या आंदोलन, पुणे पोलिसांनी धाडली नोटीस

या निष्कर्षानंतर या घटनेतील सर्व तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे. पोलिसांच्या मते, पुढील कारवाई आता केवळ चालकाच्या निष्काळजीपणाबाबत केली जाणार आहे. तब्बल १०० हून अधिक सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणावरुन होत असलेल्या गंभीर आरोपांतून गौतमी पाटीलला क्लिन चिट मिळाली आहे. 

Topics mentioned in this article