जाहिरात

Gautami Patil: गौतमी पाटीलला अटक होणार? ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं ठिय्या आंदोलन, पुणे पोलिसांनी धाडली नोटीस

Gautami Patil Latest News : महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला होता. गौतमीच्या कारने रस्त्यावर असलेल्या एका रिक्षाला धडक दिली होती.

Gautami Patil: गौतमी पाटीलला अटक होणार? ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं ठिय्या आंदोलन, पुणे पोलिसांनी धाडली नोटीस
Gautami Patil Car Accident Update
मुंबई:

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

Gautami Patil Latest News : महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला होता. गौतमीच्या कारने रस्त्यावर असलेल्या एका रिक्षाला धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालकासह 2 प्रवाशांना दुखापत झाली होती. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी गौतमी पाटीलच्या चालकाला अटक केली. दरम्यान, या अपघात प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी पोलिसांनी गौतमी पाटीलला नोटीस बजावली आहे. या अपघात प्रकरणात चौकशी करण्यासाठी हजर राहण्याचे आदेश गौतमीला बजावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. सामाजी विठ्ठल मरगळे असं जखमी झालेल्या रिक्षाचालकाचं नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  या अपघातात जो रिक्षाचालक जखमी झाला होता, त्याच्या मुलीने माध्यमांशी बोलताना मोठा खुलासा केला आहे. मुलीनं म्हटलं आहे की,  फिर्यादी बदलण्यात आला आहे. जो आरोपी अटक केला आहे, तो मुख्य आरोपी नाही.आम्हाला फक्त एक सीसीटीव्ही दाखवला. पण त्यात स्पष्ट काही दिसत नाहीय. गौतमी पाटील कारमध्ये उपस्थित होत्या. त्या सेलिब्रिटी आहेत म्हणून हे प्रकरण दाबण्याचा प्रकार चालू आहे का? दोनदा नोटीस पाठवून पण गौतमी पाटील का आल्या नाहीत? इतकं कमकुवत आहे का आपल पोलीस प्रशासन? पंचनामा न करता गाडी तिकडून कशी काय हलवली? असे प्रश्न या मुलीनं उपस्थित केले आहेत.  पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशन समोर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गौतमी पाटील विरोधात आंदोलन केलं आहे.  गौतमी पाटीलचे राज्यातील शो बंद करण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. 

गौतमी पाटीलच्या कारला पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात मंगळवारी पहाटे घडला होता.त्यावेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती. गौतमीच्या चालकाने एका हॉटेलसमोर असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली होती. त्यामुळे रिक्षाचं मोठं नुकसान झालं होतं. या अपघातात जे दोन प्रवासी जखमी झाले होते, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. 

त्या दिवशी काय घडलं होतं? 

गौतमी पाटीलच्या कारला अपघात झाल्याची बातमी समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पण अपघातावेळी गौतमी पाटील कारमध्ये नसल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. सिंहगड पोलिसांकडून या अपघात प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, अपघात नेमका कशामुळे घडला होता, याचाही तपास पोलीस करत आहेत. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता, पण सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी 30 वर्षीय कारचालकाला अटक केली. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com