Pune News : भोंदूगिरी करणाऱ्या बुवा-बाबांचं काऊंटडाऊन सुरू; अंनिस मोठ्या तयारीत, महासंचालकांची घेतली भेट

अशोक खरात याच्या निमित्ताने राज्यभरात पसरत चाललेल्या बुवाबाजी अन् भोंदूगिरीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News : भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या भोंदूबाबांना सरकारी आणि राजकारण्यांचा वरदहस्त असल्याचं अनेक प्रकरणांमुळे समोर आलं आहे. याबाबत अंधश्रद्धा निर्मुलन समिती मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. अशोक खरात हे प्रकरण नाशिकमधून समोर आलं आहे. मात्र राज्यातील कित्येक जिल्ह्यात अशा प्रकारचे भोंदूबाबा असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा शोषणकारी भोंदूबाबाची यादी आणि शक्य असेल तर तेथे यासंदर्भातील पुरावे असलेला पेन ड्राइव्ह अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे देणार असल्याची माहिती आहे. 

भोंदूबाबांची यादी पोलीस अधीक्षकांकडून देणार...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अशा प्रकरणाचा नि:पक्षपाती तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे.  अनेकदा सामान्य नागरिकांकडून अशा बुवा-बाबांकडून फसवणूक होते. दरम्यान अशा जिल्ह्यातील भोंदूबाबांची यादी अंनिसचे कार्यकर्ते जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे देणार आहेत. याबाबत अंनिसचे राज्य कार्यकारी समितीचे सदस्य मुक्ता दाभोलकर, राजीव देशपांडे, गणेश चिंचोले यांनी सोमवारी २३ मार्च रोजी राज्याचे महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली.

Advertisement

नक्की वाचा - अहिल्यानगरची लेक भोंदूबाबाचा काळ ठरणार; 'खरात'चा छडा लावणाऱ्या IPS तेजस्वी सातपुतेंचा जबरदस्त इतिहास


जिल्ह्यांची भोंदूबाबांची करा तक्रार...

नागरिकांनी आपआपल्या भागातील भोंदू बाबांबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करावी. यासाठी अंनिसकडून हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. अंनिसने 9922048832, 8087876809 या क्रमांकवर हेल्पलाइन सुरू केली आहे. याशिवाय जे ज्योतिषी, भोंदूबाबा महिलांचे शोषण करत असतील तर त्यांनी 9422305929 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.