Assembly Election 2024 : 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज बरेच उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. अद्यापही महाविकास आघाडी आणि महायुतीचा जागेचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे आज सर्वच पक्षांना जागा जाहीर कराव्या लागणार आहेत. महाविकास आघाडीत अनेक जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.
भायखळा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी
भायखळा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी
भायखळा येथे ठाकरे गट आणि काँग्रेस दोन्हीकडून उमेदवारी अर्ज दाखल.
मधुकर चव्हाण यांनी काँग्रेसकडून तर मनोज जामसुतकर यांनी ठाकरे गटाकडून अर्ज केला दाखल
अमित ठाकरेंना विधानपरिषदेवर घेऊन मंत्री करणार, सूत्रांची माहिती
अमित ठाकरेंना विधानपरिषदेवर घेऊन मंत्री करूया, शिवसेनेकडून चाचपणी आणि भाजपकडे प्रस्ताव. यावर लवकरच भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची चर्चा होणार, सूत्रांची माहिती
भाजपनं मित्रपक्षांची यादी जाहीर केली. 4 जागा मित्रपक्षांना दिल्या
भाजपनं मित्रपक्षांची यादी जाहीर केली. 4 जागा मित्रपक्षांना दिल्या.
- बडनेरा- युवा स्वाभिमान पार्टी
- गंगाखेड - राष्ट्रीय समाज पक्ष
- कलिना - आरपीआय आठवले
- शाहुवाडी - जन सुराज्य शक्ती पार्टी
मालेगाव शहरात ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यावर हल्ला
मालेगाव शहरात ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यावर हल्ला झाल्याची पोलिसात तक्रार.
अद्वय हिरे यांच्यावर सोयगाव भागात हल्ला झाल्याची पोलिसांना माहिती..
मालेगावातील एका कार्यकर्त्याच्या घरी गेले असता बाहेरून काही गुंडांनी दगडफेक आणि धमकावल्याची तक्रार
मालेगाव कॅम्प पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू
पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन एसटी बसचा समोरासमोर भीषण अपघात
पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील वरवंड गावच्या हद्दीत दोन एसटी बसचा समोरासमोर भीषण अपघात. अपघातात 40 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती. घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत तातडीने मदतकार्य सुरू केले. वरवंडमधील कवटीचा मळा परिसरात ही घटना घडली आहे.
गुहागरमध्ये भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव यांनीही भरला उमेदवारी अर्ज
गुहागरमध्ये भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव यांनीही भरला उमेदवारी अर्ज.
विक्रांत जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा.
डमी उमेदवारी अर्ज सादर केल्याचा विक्रांत जाधव यांचा निर्वाळा.
गुहागरच्या बदलत्या राजकीय समीकरणामुळे नवा ट्विस्ट
माढा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला
माढा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला. शरद पवारांनी अभिजीत पाटलांना उमेदवारी केली जाहीर. अभिजीत पाटील यांना माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा एबी फॉर्म. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अभिषेक पाटलांना दिला पक्षाचा एबी फॉर्म. शरद पवारांनी आमदार बबन शिंदे यांचा केला पत्ता कट...
Live Update : माळशिरस मतदार संघातून राम सातपुते यांना भाजपची उमेदवारी
माळशिरस मतदार संघातून राम सातपुते यांना भाजपची उमेदवारी
आमदार राम सातपुते यांना दुसऱ्यांदा भाजपची उमेदवारी
राम सातपुते यांनी सोलापूर मतदार संघातून लढवली होती लोकसभा निवडणूक
राम सातपुते पुन्हा आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात...
धाराशिव विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून कैलास पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
धाराशिव विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून कैलास पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरांमध्ये मोठे शक्तिप्रदर्शनही केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी विजयाचा विश्वासही व्यक्त केला आहे. दोन्ही शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे धाराशिव मतदारसंघामध्ये ठाकरे गटालाच फायदा होईल असेही कैलास पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे उमेदवारही नसल्याने त्यांना भाजपमधून माणूस आयात करावा लागत आहे असे ते म्हणाले.
Live Update : मनसेचे नाशिकमधील तीनही नेते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल
मनसेचे नाशिकमधील तीनही नेते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. मनसेचे नाशिक पूर्वचे उमेदवार प्रसाद सानप, नाशिक मध्यचे उमेदवार अंकुश पवार आणि नाशिक पश्चिमचे दिनकर पाटील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल
-मनसेचे तीनही उमेदवार एकत्र भरतायत उमेदवारी अर्ज
Live Update : महाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे शक्तिप्रदर्शन...
महाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे शक्तिप्रदर्शन...
ठाकरे गटाच्या महाआघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महाडमध्ये सभा होणार असून महाड शहरात रॅली काढत स्नेहल जगताप यांचे शक्तिप्रदर्शन.
Live Update : शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचा आज उमेदवारी अर्ज
शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. यासाठी छत्रपती संभाजी नगरच्या क्रांती चौकातून शिरसाठ यांनी शक्तिप्रदर्शन करत भव्य रॅली काढली आहे. संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे देखील या रॅलीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Live Update : अजित पवारांनी बारामतीमधून उमेदवारी अर्ज भरला...
अजित पवारांनी बारामतीमधून उमेदवारी अर्ज भरला...
Live Update : माढा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच बंडखोरी...
माढा मतदार संघात उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच बंडखोरी...
काँग्रेस नेत्या मीनल साठे यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज
माढा शहराच्या नगराध्यक्ष आहेत मिनल साठे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे साठे यांनी मागितली होती उमेदवारी
उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच साठे मैदानात...
Live Update : महायुतीचे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल
महायुतीचे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोणतंही शक्तिप्रदर्शन न करता अगदी मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निलेश राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत खासदार नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, नितेश राणे उपस्थित आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी कुडाळचे ग्रामदैवत कुडाळेश्वर मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले.
नांदगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बंडखोर माजी खासदार, छगन भुजबळांचे लाडके पुतणे समीर भुजबळांचं जोरदार शक्तिप्रदर्शन
नांदगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बंडखोर माजी खासदार आणि छगन भुजबळांचे लाडके पुतणे समीर भुजबळ जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत. दरम्यान नांदगाव मधून त्यांच्या राहिलेल्या थोड्याच वेळात सुरुवात होणार असून कार्यकर्ते आणि समर्थक हजारोंच्या संख्येने येथे उपस्थित आहेत. विशेष म्हणजे नांदगावमध्ये लावण्यात आलेल्या समीर भुजबळांच्या होर्डींग्सवरून छगन भुजबळ यांचा फोटो गायब असून गोपीनाथ मुंडे मात्र यावर दिसून येत असल्याने वंजारी मत आपल्याकडे आकर्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या हातात भयमुक्त नांदगाव, प्रगत नांदगाव असे होर्डींग्स दिसून येतायत.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी एकनाथ शिंदेंनी आनंद आश्रमात धर्मवीर आनंद दिघेंना केले अभिवादन
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रमात शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघेंना केले अभिवादन.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे उमेदवारी अर्ज भरणार
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे उमेदवारी अर्ज भरणार
मागील पाच वर्षात शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अनेक विकास काम केलेली आहेत त्या चोरावर यावेळी निवडणुकीला सामोरे जात आहे
मागील पाच वर्षात मी मतदार संघात मोठा जनसंपर्क ठेवला आहे
शिवाजीनगर गावठाणातील रोकडोबा मंदिरापासून सिद्धार्थ शिरोळे यांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ची रॅली निघणार
घोले रस्त्यावरील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार
Live Update : कळवा मुंब्रा विधासभेत मनसेचे उमेदवार सुशांत सूर्यराव यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन..
कळवा मुंब्रा विधासभेत मनसेचे उमेदवार सुशांत सूर्यराव यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन..
असंख्य कार्यकर्त्यांसमवेत व मतदारांसोबत मनसेचे उमेदवार सुशांत सूर्यवंशी यांनी काढली रॅली...
मनसेचे कळवा मुंब्रा उमेदवार सुशांत सूर्यराव करणार आज उमेदवारी अर्ज दाखल..
राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढतीत मनसेचे सुशांत सूर्यराव ठरू शकणार कळवा मुंब्रा विधानसभेमध्ये नागरिकांचा पर्याय..
जोरदार शक्ती प्रदर्शन करत मनसेचे उमेदवार सुशांत सूर्यराव मनसे नेते अविनाश जाधव व अभिजीत पानसे यांच्या उपस्थितीत भरणार उमेदवारी अर्ज
Live Update : काटोल येथून महाविकास आघाडीत बेबनाव, शिवसेना उबाठा उमेदवारी अर्ज दाखल करणार
काटोल मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवार यादीत अनिल देशमुख यांचे नाव असले तरी त्यांचा मुलगा सलील देशमुख आज नामांकन अर्ज दाखल करणार आहे. तिकडे याच मतदारसंघातून महाराष्ट्र विकास आघाडीत बेबनाव झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून माजी जिल्हाप्रमुख राजू हरणे उद्या काटोल येथून उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत. त्यासंबंधात उबाठा शिवसेनेच्या स्थानिय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
Live Update : पुण्यात रवींद्र धंगेकर आज भरणार आपला उमेदवारी अर्ज
पुण्यात रवींद्र धंगेकर आज भरणार आपला उमेदवारी अर्ज
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कसब्यात धंगेकरांच मोठ शक्तिप्रदर्शन
रविंद्र धंगेकर यांच्याकडून सपत्नीक कसबा गणपतीची आरती
महाविकास आघाडीतील सर्व स्थानिक नेते रवींद्र धंगेकर यांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित
रॅली काढत रवींद्र धंगेकर भरणार उमेदवारी अर्ज
महाराष्ट्र सुखी ठेव गणपती कडे साकडं
यंदाही कसबा आम्हीच जिंकणार जिंकणार
माझ्या विरोधात ताकद वापरत आहेत पण जनता माझ्या बाजूने
विरोधक अपप्रचार करत आहेत
कसबा हा कुणाचाच गड नाही तर कसबा हा केवळ जनतेचा गड
Live Update : पुण्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार बापू पठारे भरणार अर्ज
Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाणे कोपरी पाचपाखडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाणे कोपरी पाचपाखडी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यानिमित्ताने आज वागळे इस्टेट ते किसान नगर अशी भव्य मिरवणूक करण्यात येणार आहे.. या मिरवणुकीत अनेक महिला या मुख्यमंत्र्यांचे औक्षण करतील त्यासोबतच महाराष्ट्रातील साधुसंतांचे वंशज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना शुभ आशीर्वाद देणार आहेत.. त्यामुळे ही जरी नामांकन रॅली असली तरी आम्ही त्याला विजयी मेळावा मानत असल्याचे शिवसेना अध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले.
Live Update : युगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Live Update : शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवारांकडून बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल
शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शरद पवार सोबत आहेत.
माहिममध्ये अमित ठाकरेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन, मात्र सदा सरवणकर उमेदवारी अर्ज भरण्यावर ठाम
माहिममध्ये अमित ठाकरेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन, मात्र सदा सरवणकर उमेदवारी अर्ज भरण्यावर ठाम