5 months ago
मुंबई:

विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Election 2024) आज शेवटचा रविवार आहे. आज राज्यात मोठ्या प्रमाणात सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असून आज प्रचाराचा शेवटचा रविवार सुपर संडे ठरणार आहे. आज केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी अशी राष्ट्रीय राजकारणातील दिग्गज मंडळी विदर्भात प्रचार करणार आहेत. देवेंद्र फडणवीस त्यांच्या मतदारसंघात आज सकाळी तिसरा रोड शो करणार आहेत.  

Nov 17, 2024 15:49 (IST)

Live Update : अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाजाचा काँग्रेसला पाठिंबा

अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाजाचा काँग्रेसला पाठिंबा

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला वातावरण अनुकूल असून काँग्रेस पक्षाला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाजाने काँग्रेसला पाठिंबा दिला असून या संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अनिल चौगुले यांनी पाठिंब्याचे पत्र मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांना दिले आहे.

Nov 17, 2024 15:17 (IST)

Live Update : ही माझी शेवटची निवडणूक - दीपक केसरकर

ही माझी शेवटची निवडणूक- दीपक केसरकर 

माझा राजकीय वारसदार मुलगी सोनाली नाही

लवकरच माझा वारसदार ठरेल

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत सर्वात मोठी घोषणा

Nov 17, 2024 15:16 (IST)

Live Update : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हिंगोलीत दाखल..

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हिंगोलीत दाखल..

प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत असलेल्या बॅगांची हेलीपॅड वर निवडणूक विभागाकडून तपासणी.

Nov 17, 2024 14:05 (IST)

Live Update : मविआची आज बीकेसीत सांगता सभा, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंसह इतर नेते लावणार हजेरी

मविआची आज बीकेसीत सांगता सभा, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंसह इतर नेते लावणार हजेरी 

आज संध्याकाळी 5.30 वाजता बीकेसी येथे महाविकास आघाडीची सभा

Advertisement
Nov 17, 2024 13:59 (IST)

Live Update : गोविंददेवगिरी महाराजांची उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका

गोविंददेवगिरी महाराजांची उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका

मला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपार आदर आहे, त्याच्या वंशात जन्म घेतलेल्या, बाबरी बद्दल आपली भूमिका मांडणारे बाळासाहेब कुठे आहेत? जय श्रीराम म्हणणारे बाळासाहेब कुठे अन् शिरकुरमा खाणारे, जय श्रीराम म्हटल्यावर मुंडक छाटू म्हणणारे आणि औरंगजेबाला भाऊ म्हणणारे कुठे...

Nov 17, 2024 13:56 (IST)

Live Update : माढा मतदारसंघात शरद पवार यांची जाहीर सभा...

माढा विधानसभा मतदारसंघ : माढा मतदारसंघात शरद पवार यांची जाहीर सभा...

अभिजीत पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार माढा मतदारसंघात...

सभा स्थळी शरद पवार यांचे आगमन..

थोड्याच वेळात शरद पवार करणार सभेला संबोधित

Advertisement
Nov 17, 2024 12:33 (IST)

Live Update : कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी घेतली कोल्हापूरच्या पैलवानांची भेट

कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी घेतली कोल्हापूरच्या पैलवानांची भेट

गंगावेस तालमीला भेट देऊन पैलवानांना पुनीयांच मार्गदर्शन 

तालमीतल्या वस्तादांनी पूनियाचा केला सत्कार

कोल्हापुरात कुस्तीला पोषक वातावरण मात्र सुविधांची कमतरता आहे : पुनिया

Nov 17, 2024 11:54 (IST)

Live Update : एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम निवडणुक विभाग व पोलिसांकडून जप्त...

जप्त केलेल्या रकमेचे चेक पोस्टवर  मोजमाप सुरू..

 हिंगोली नांदेड राज्य महामार्गावर निवडणूक विभाग व पोलीस पथकाकडून मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. हट्टा पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये असलेल्या चिखली फाटा येथे ही रक्कम ताब्यात घेण्यात आली असून मुंबईवरून नांदेड कडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्समधून ही रक्कम नेण्यात येत होती. दरम्यान एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्याची प्राथमिक माहिती निवडणूक विभागाच्या पथकाने दिली असून सध्या हट्टा पोलीस व निवडणूक विभागाचे अधिकारी या रकमेचे मोजमाप करत आहेत.. 

Advertisement
Nov 17, 2024 11:52 (IST)

Live Update : अमित शाह यांच्या 4 सभांपैकी 2 स्मृती इराणी करणार तर 2 शिवराजसिंह चौहान करणार

अमित शाह यांच्या 4 सभांपैकी 2 स्मृती इराणी करणार तर 2 शिवराजसिंह चौहान करणार. तुर्तास कोणतीही सभा रद्द झालेली नाही

Nov 17, 2024 11:51 (IST)

Live Update : अजित पवार यांची जाहिरात निवडणूक आयोगाने फेटाळली

अजित पवार यांची जाहिरात निवडणूक आयोगाने फेटाळली

निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादीच्या जाहिरातीला पूर्व-प्रमाणपत्र देण्यास नकार

‘राष्ट्रवादीला मत नाही तर जेवण नाही’, नवरा बायकोच्या विनोदी संभाषणावर निवडणूक आयोगाचा आक्षेप

राष्ट्रवादीला मत देण्यासाठी बायको नवऱ्याला धमकावत असल्याचं आयोगाचं निरीक्षण

Nov 17, 2024 11:50 (IST)

Live Update : गडचिरोली : Mi 17 द्वारे निवडणूक पथकांचे हेली ड्रॉपींग सुरू

आज सकाळपासून दक्षिण गडचिरोली येथे मतदानाच्या तयारीसाठी वायुसेनेच्या विमानाव्दारे निवडणूक अधिकारी आणि त्यांच्या चमू पोहचू लागल्या आहेत..

आज सकाळपासून भारतीय वायुसेनेच्या Mi-17 हेलिकॉप्टरद्वारे अहेरी विधानसभा मतदारसंघाच्या ७६ मतदान केंद्रांवरील मतदान कर्मचाऱ्यांचे हेलीड्रॉपिंग अहेरी येथून सुरू झाले. 

EVM (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) आणि सर्व मतदान कर्मचारी पोलिस ठाण्यांवरील १४ बेस कँप्सवर ड्रॉप केले जात आहेत, जेथे पुढील हालचालींसाठी तयारी केली जाईल. १९ तारखेपर्यंत गडचिरोलीमध्ये EVM आणि मतदान कर्मचाऱ्यांचे हेलीड्रॉपिंग चालू राहील.

Nov 17, 2024 10:39 (IST)

Live Update : अमित शाहांच्या आजच्या सभा रद्द, नागपूरातून तातडीने दिल्लीला रवाना

अमित शाहांच्या आजच्या सभा रद्द, नागपूरातून तातडीने दिल्लीला रवाना

Nov 17, 2024 09:36 (IST)

Live Update : मनोज जरांगे यांनी बीडमध्ये कोणालाही पाठिंबा दिलेला नाही - ज्योती मेटे

मनोज जरांगे यांनी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. मराठा आरक्षणाची चळवळ मेटे साहेबांनी उभी केलेली आहे, त्यांच्याविरुद्ध जरांगे कुणाला पाठिंबा देतील असं वाटत नाही. फडणवीस यांच्या सांगण्यावरून मी निवडणूक लढतेय. या माजी मंत्री सुरेश नवले यांच्या आरोपाला कुठलाही आधार नसल्याचा शिवसंग्रामच्या उमेदवार ज्योती मेटे म्हणाल्या आहेत 

Nov 17, 2024 08:22 (IST)

Live Update : मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पहाटे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे स्मृतीस्थळी अभिवादन केले

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पहाटे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे स्मृतीस्थळी अभिवादन केले...

Nov 17, 2024 08:11 (IST)

Live Update : मतदानादिवशी मासेमारी बंद ठेवण्याच्या सूचना

विधानसभा निवडणूक 20नोव्हेंबर रोजी होत असल्याने 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 ते 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व मच्छीमार नौका बंदरामध्ये ठेवण्याबाबत व मच्छीमारी संबंधित कोणतंही कामकाज न करण्याबाबत सर्व मच्छिमार सहकारी संस्थांमार्फत मच्छिमार नौका मालक यांना कळविण्यात आलं आहे, अशी माहिती सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय आनंद पालव यांनी दिली.

Nov 17, 2024 08:10 (IST)

Live Update : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 12 वा स्मृतीदिन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 12 वा स्मृतीदिन आहे. आजच्या दिवशी राज्यभरातून हजारो शिवसैनिक बाळासाहेबांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी येत असतात. स्मृतीस्थळावर तशी आज तयारी करण्यात आलेली आहे. संपूर्ण स्मृतिस्थळाचा परिसर फुलांनी सजवण्यात आलेला असून राज्यभरातून येणाऱ्या शिवसैनिकांना व्यवस्थितपणे अभिवादन करता याव यासाठी बॅरिगेटिंग करून रांगेत येण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दरवर्षीप्रमाणे अनेक मोठे नेते आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी येणार आहेत.