1 month ago
मुंबई:

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर भाजपनंतर मनसे आणि शिंदे गटाने (Eknath Shinde) उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिंदे गटाच्या उमेदवारांच्या यादीत घराणेशाहीचा आरोप केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत भाजप प्रमाणेच घराणेशाही पाहायला मिळत आहे. नेत्याच्या मुलाला, पत्नीला आणि भावाला उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी पहिली यादी जाहीर करत 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. सहा ठिकाणी नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचे दिसून येत आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिजीत यांना दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्याशिवाय संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांना पैठण येथून, जोगेश्वरी येथून रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकरांना, उदय सामंत यांचे बंधू किरण यांनाही राजापूर येथून, खानापूर येथून अनिल बाबर यांचे पुत्र सुहास तर माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आणि विद्यमान आमदार योगेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

Oct 23, 2024 13:26 (IST)

Live Update : माढा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारीचा सस्पेन्स

माढा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारीचा सस्पेन्स, राष्ट्रवादीच्या यादीत माढा मतदार संघातील उमेदवारीची घोषणा नाहीच

माढा मतदार संघात महायुती कुणाला देणार उमेदवारी? राष्ट्रवादी अजित पवार गटाला माढ्यात उमेदवार मिळत नाही. माढ्यातील सर्व उमेदवारांचा कल राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे असेल. अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार बबन शिंदेही तुतारीच्या प्रतीक्षेत आहे. 

Oct 23, 2024 12:56 (IST)

Live Update : अजित पवार गटाच्या 38 उमेदवारांची यादी जाहीर, कोण कोणत्या जागेवरुन लढणार?

अजित पवार गटाच्या 38 उमेदवारांची यादी जाहीर, कोण कोणत्या जागेवरुन निवडणूक लढवणार?


Oct 23, 2024 12:50 (IST)

राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर, अजित पवार बारामती तर भुजबळ येवल्यातून निवडणूक लढवणार!

राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर, अजित पवार बारामती आणि भुजबळ येवल्यातून निवडणूक लढवणार!

Oct 23, 2024 12:34 (IST)

Live Update : महाविकास आघाडीला धक्का, संभाजी ब्रिगेडने शिवसेने सोबतची युती तोडली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत गेल्या दोन ते अडीच वर्षांची युती तोडणार असल्याची घोषणा केला आहे. आज पुण्यात संभाजी ब्रिगेडकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडला योग्य मान मिळाला नसल्याचा आरोप मनोज आखरे आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला पाच ते सहा जागा देणार असल्याचं या आधी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. मात्र आम्हाला आता एकही जागा दिली जात नसल्याने आम्ही हा निर्णय घेतला असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड स्वतंत्रपणे 50 जागा लढणार असल्याची घोषणा मनोज आखरे यांनी पुण्यातून केली आहे... 

Advertisement
Oct 23, 2024 10:17 (IST)

Live Update : ऑक्सफर्ड विद्यापीठातील विद्यार्थी गिरवणार 'अ आ ई' चे धडे

विश्वविख्यात ऑक्सफर्ड विद्यापीठात पहिल्यांदाच मराठी भाषा शिकवली जाणार आहे. विद्यापीठातील आशियाई आणि मध्यपूर्व अभ्यास विभागाने मराठी भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकता येणार आहे. 

Oct 23, 2024 10:10 (IST)

Live Update : डॉ. अजित रानडे यांच्या हकालपट्टीचा आदेश मागे

डॉ. अजित रानडे यांच्या हकालपट्टीचा आदेश मागे घेण्यात आला असून त्यामुळे रानडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतील कुलगुरूपदावरुन रानडे यांना काही दिवसांपूर्वी हटवण्यात आलं होतं. अखेर हा आदेश मागे घेण्यात आला आहे.  

Advertisement
Oct 23, 2024 08:50 (IST)

अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे शिवसेना शिंदे गटात आनंदाचं वातावरण

अमरावतीच्या दर्यापूर मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे शिवसेना शिंदे गटात आनंदाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे भाजपा नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांचा अभिजीत अडसूळांच्या उमेदवारीला विरोध होता. 

Oct 23, 2024 08:44 (IST)

रत्नागिरीत महायुतीला खिंडार, माजी आमदार बाळ माने शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर

शिवसेना शिंदे गटाकडून रत्नागिरीतून उदय सामंत यांना उमेदवारी जाहीर, तर दुसरीकडे ठाकरे गटाचा उमेदवार देखील जवळपास निश्चित झाला आहे. रत्नागिरीतील भाजपचे माजी आमदार बाळ माने शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. आज सकाळी 11 वाजता मातोश्रीवर बाळ माने यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे रत्नागिरीत महायुतीला खिंडार पडणार आहे. भाजपचे बाळ माने कमळ सोडून मशाल हाती घेणार आहेत.