12 hours ago

Latest News Update : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे पाचवी आणि आठवीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केलं जाणार नाही. आतापर्यंत पाचवी आणि आठवीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करीत पुढच्या वर्गात प्रमोट केलं जात होतं. मात्र आता या निर्णयात मोठा बदल करण्यात आला आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दोन महिन्याच्या आत पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. मात्र यानंतरही विद्यार्थी नापास झाला तर त्याला प्रमोट केलं जाणार नाही. 

Dec 24, 2024 22:11 (IST)

Live Update : श्रीकांत शिंदेनी पत्नीसह लुटला वॉटर स्पोर्ट्सचा आनंद

Dec 24, 2024 21:12 (IST)

Live Update : हिंगोलीत गळ्याभोवती रुमाल गुंडाळलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह

हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी शिवारात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. मृत तरुणीच्या गळ्याभोवती रुमाल गुंडाळलेला असल्याने हा खूनच असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर मृतदेहाच्या बाजूला एक बॅग आढळली असून हा मृतदेह बॅगेमध्ये भरून आणला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. औढा नागनाथ पोलीस घटनेचा तपास करीत आहे. घटनास्थळी श्वानपथक देखील पाचारण करण्यात आलं आहे. तर मयत तरुणीची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे..

Dec 24, 2024 20:01 (IST)

Live Update : जम्मू काश्मीरमधील लष्कराच्या गाडीला अपघात, 300 फूट खोल दरीत कोसळला ट्रक; 5 जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील लष्कराच्या गाडीला अपघात, 300 फूट खोल दरीत कोसळला ट्रक; 5 जवान शहीद 

Dec 24, 2024 19:35 (IST)

Live Update : हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.

कैलास फड याचा हा व्हिडिओ असून शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता. हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे. याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फड याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय.

शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना विधानसभा निवडणुक मतदाना दरम्यान याच कैलास फड याने मारहाण केली होती. 

Advertisement
Dec 24, 2024 18:58 (IST)

Live Update : नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त अशोक करंजकर यांची बदली

नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त अशोक करंजकर यांची बदली 

- राहुल कर्डीले आता नाशिकचे नवे महानगरपालिका आयुक्त

- राहुल कर्डीले यांच्याकडे होता वर्ध्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार

- मावळते आयुक्त अशोक करंजकर नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत

- राहुल कर्डीले हे अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपुत्र 

- 2015 च्या बॅचचे आयएएस अधिकारी

Dec 24, 2024 18:29 (IST)

Live Update : अमेरिकन एअरलाइन्सची सेवा कोलमडली, सर्व उड्डाणं रद्द

अमेरिकन एअरलाइन्सची सेवा कोलमडली, सर्व उड्डाणं रद्द

Advertisement
Dec 24, 2024 18:14 (IST)

Live Update : कराड दक्षिणमधील अनेक नेते माझ्या संपर्कात; आमदार डॉ. अतुल भोसले यांचा मोठा गौप्यस्फोट

राज्यात महायुतीचं वादळ आहे, हे आपल्याला गेल्या निवडणुकीत बघायला मिळालं. ज्याला भविष्याचे वेध आहेत, ज्याला भविष्य दिसतंय ते सगळे लोक माझ्या संपर्कात आहेत, असे सांगत कराड दक्षिणचे आमदार जायंट किलर डॉ.अतुल भोसले यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सध्या कराड दक्षिण मध्ये भारतीय जनता पक्षात मोठी इनकमिंग सुरू असून देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ताकदीमुळे डॉ. अतुल भोसले यांचे वजन चांगलेच वाढले आहे. अतुल भोसले यांची वाढलेली ताकद याचा कराड दक्षिण मधील जनतेला चांगला फायदा होणार आहे.

Dec 24, 2024 17:59 (IST)

Live Update : चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर, 'या' तारखेला होणार भारत-पाक सामना

पाकिस्तान आणि दुबईत होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक आयसीसीनं जाहीर केलंय. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज लढत 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसार होत आहे. त्यामुळे भारताचे सर्व सामने दुबईत होतील. 19 फेब्रुवारी ते 10 मार्च 2025 दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

Advertisement
Dec 24, 2024 17:32 (IST)

Live Update : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक नियमात केंद्र सरकारने केलेल्या शिफारशीनंतर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड सर्व सामान्य लोक मागवू शकत नाहीत, असा नियम करण्यात आला आहे. या कायद्याच्या विरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केंद्रीय कायदा मंत्रालयाने निवडणूक नियम, 1961 च्या नियम 93(2)(ए) मध्ये सुधारणा केली आहे. यापुढे निवडणूक आयोगाचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड सर्व सामान्यांसह उमेदवारांना देखील उपलब्ध नसतील. या नवीन नियमांच्या विरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. 

Dec 24, 2024 17:22 (IST)

Live Update : परळीतील ऊसतोड मजुराचा दगडाने ठेचून खून

बीडच्या परळी तालुक्यातून ऊस तोडणीसाठी गेलेल्या मजुराची दगडाने ठेचून खून केल्याची घटना कर्नाटकात उघडकीस आली आहे. परळी तालुक्यातील अस्वलंबा येथील विकास जोगदंड हा ऊसतोड करण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याच्या मुकादमाची प्रकृती खराब असल्याने त्याने मुकादमाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. याचवेळी रुग्णालया बाहेर झोपेत असताना मुकादम श्रीकृष्ण ढाकणे याने विकास जोगदंड याच्या डोक्यात दगड घालून ठार केले. 

इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने जोगदंड याच्या छातीवर बसून दगडाने ठेचून त्याचा निर्दयी खून केला. ही बाब रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाला दिसताच त्याने ढाकणे याला पोलिसांच्या ताब्यात दिले. विकास जोगदंड यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीकृष्ण ढाकणे याच्याविरोधात कर्नाटकातील घटप्रभा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Dec 24, 2024 16:16 (IST)

Live Update : पालक आणि शिक्षक म्हणतात, निर्णय स्वागतार्ह!

केंद्र सरकारने पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णयात बदल केल्यानंतर पालक आणि शिक्षक या निर्णयाचं स्वागत करत आहेत. पालकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत हा निर्णय योग्यच असल्याचे एनडीटीव्ही मराठीशी बोलताना सांगितले तर दादर येथील राजा शिवाजी मराठी माध्यमाच्या प्राचार्य मानसी धारप यांनी देखील हा निर्णय योग्यच असल्याचे मत व्यक्त केले. 

Dec 24, 2024 15:33 (IST)

Live Update : वसईत नाताळ सणाच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक एकोपा जपण्याचा प्रयत्न

वसई विरार परिसरात सध्या नाताळ सणाच्या उत्साहाला सुरवात झालीय. नाताळ सणानिमित्त वसईतल्या वेगवेळ्या भागात ख्रिसमस कार्निवल अर्थात शोभयात्रा काढून नाताळ जल्लोष सुरू आहे. पारंपारिक वेशभूषा आणि पेहराव परिधान करून ख्रिस्ती बांधव या  ख्रिसमस कार्निवलमध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होत जल्लोष साजरा केला.

Dec 24, 2024 15:32 (IST)

Live Update : डोंबिवली स्टेशन परिसरातील धक्कादायक घटना, चोरट्यांचा 9-10 दुकानांवर डल्ला..लाखोंचा मुद्देमाल लंपास

डोंबिवली स्टेशन परिसरात काल रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी नऊ ते दहा दुकाने फोडली या दुकानांमधून लाखो रुपयांचा मुद्देमाल कंपास केलाय . सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन चोरटे मध्यरात्री दुकानांचे शटर उघडून चोरी करताना दिसत आहेत. डोंबिवली रामनगर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही चोरीची घटना घडली . डोंबिवली पूर्वेकडे स्टेशन परिसरातील सात दुकाने तर पश्चिमेकडील दोन दुकाने असल्याचे प्राथमिक माहिती आहे. व्यापाऱ्यांनी सुरक्षा डोअर आणि शटर लॉक लावले तरी चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे .

Dec 24, 2024 14:36 (IST)

लाडकी बहीण योजनेचे पैसे आजपासून मिळणार, अदिती तटकरेंची माहिती

लाडकी बहीण योजनेचे पैसे आजपासून मिळणार, अदिती तटकरेंची माहिती

Dec 24, 2024 14:19 (IST)

कल्याणमधून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा सापडला मृतदेह

कल्याणमधून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा सापडला मृतदेह 

कल्याणजवळ बापगाव परिसरात सापडला मृतदेह

अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती 

24 तासांपासून कल्याण पूर्व चक्की नाका परिसरातून बेपत्ता होती मुलगी

कल्याण कोळशेवाडी पोलीस आणि पडघा पोलिसांनी सुरू केला तपास

Dec 24, 2024 14:17 (IST)

पुण्यात बनावट नोटांसह एकाला अटक, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रस्ता पेठेत बनावट नोटा बाळगणाऱ्या आरोपीला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे.  गौरव रामप्रताप सविता असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा गुजरातमधील जामनगरचा आहे. आरोपीकडून 500 रुपये दराच्या 142 आणि शंभर रुपयांच्या 61 अशा 79750 रुपयांच्या बनावट आणि हुबेहूब दिसणाऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बनावट नोटा बनवणाऱ्यांचं मोठं रॅकेट असण्याची शक्यता असून आधिक तपास सुरू आहे.

Dec 24, 2024 13:13 (IST)

नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी साईमंदिर 31 डिसेंबर रोजी रात्रभर खुलं राहणार

 नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी साईमंदिर 31 डिसेंबर रोजी रात्रभर राहणार खुलं

साईबाबा संस्‍थानच्यावतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाची तयारी पूर्ण

यानिमित्‍ताने 29 डिसेंबर 2024 ते 01 जानेवारी 2025 अखेर 4 दिवस विविध सांस्‍कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

साई दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. संस्‍थानकडे शिर्डी महोत्‍सवाकरीता वेगवगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या 89 पालख्‍यांनी नोंदणी केलीली आहे

Dec 24, 2024 12:39 (IST)

Ambadas Danve : विरोधकांमध्ये सर्व काही आलबेल नाही, अंबादास दानवेंचं मोठं वक्तव्य

ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं मोठं वक्तव्य 

विरोधकांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं अंबादास दानवेंचं वक्तव्य 

जिथे राज्याचं हित आहे तिथे सोबत,  जिथे नाही तिथे सोबत नाही , असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं.

Dec 24, 2024 11:34 (IST)

जालन्यात एसटी बस उलटली, 15 ते 17 प्रवासी जखमी

जालन्यातील जाफ्राबादहून चिखलीकडे जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे.जाफ्राबाद-चिखली रोडवरील कोळेगाव फाट्याजवळ हा अपघात झाला. कोळेगाव फाट्याजवळील घाट चढताना बस 20  ते 25 फूट खड्ड्यात जाऊन जाऊन झाली उलटी झाली. या अपघातात 15 ते 17 प्रवासी जखमी झाले आहे. या जखमींना बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

Dec 24, 2024 11:28 (IST)

पालघरमध्ये तलाठ्याला धक्काबुक्की करत मारहाण, बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पालघरमध्ये अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर करवाई केल्याच्या रागातून एका तलाठ्याला ट्रक मालकाने कॉलर पकडून धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली आहे. बोईसर पूर्वेच्या गुंदले सजाचे तलाठी हितेश राऊत यांना ही धक्काबुक्की, मारहाण केल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर राऊत यांनी तत्काळ पोलिसांच्या मदतीने 3 ट्रक ताब्यात घेतले. याप्रकरणी ट्रक मलकाविरोधत बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी ट्रक मालक धीरज भंडारी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Dec 24, 2024 11:24 (IST)

भाजप पदाधिकारी हेमंत परांजपे मारहाण प्रकरण, बाजारपेठ पोलिसांकडून दोन आरोपींना अटक

भाजप पदाधिकारी हेमंत परांजपे मारहाण प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.  संदीप महाले आणि सुरज भालेराव या दोघांना अटक केली. आणखी तीन आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. मारहाणीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

Dec 24, 2024 11:04 (IST)

जालन्यातील अंबड शहरात रात्रीच्या सुमारास गोळीबार, एकजण गंभीर जखमी

जालना : अंबड शहरात रात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाचोड रोड दरम्यान फायरिंग झाल्याची माहिती. दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून एका माजी सैनिकांनी विनापरवाना पिस्तुलने दोन गोळ्या फायर केल्याची माहिती आहे. फायरिंगमध्ये मांडीत गोळी लागल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

Dec 24, 2024 09:59 (IST)

नाशिकमध्ये ट्रॅक्टर अंगावर गेल्याने युवा शेतकऱ्याचा मृत्यू

उभा असलेला ट्रॅक्टर अचानक सुरू होऊन ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने सार्थक बंडू देवडे हा 18 वर्षीय युवा शेतकरी जागीच ठार झाला. नाशिकच्या येवला तालुक्यातील बदापूरमध्ये घडली. 

Dec 24, 2024 09:50 (IST)

पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरुच, पुन्हा गाड्यांची तोडफोड

पुण्यात कोयता गँगचा  धुमाकूळ सुरुच. पुणे शहरात पुन्हा गाड्यांची तोडफोड. पुण्यातील लोहगाव येथील साठे वस्ती परिसरात  कोयता आणि दगडाने अनेक वाहनांची तोडफोड करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न. दोन तरुणांनी या परिसरातील गाडी दुकाने आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कोयत्याने केली तोडफोड.  कोयता टोळीच्या दहशतीने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. पुणे पोलिसांकडून दोन आरोपींचा शोध सुरू.

Dec 24, 2024 09:03 (IST)

पुणेकरांसाठी गुड न्यूज! आजपासून नव्या टर्मिनलवरुन आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु होणार

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून नव्या टर्मिनलवरुन आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु होणार आहेत.  पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलवरुन होणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवीन टर्मिनलवरुन होणार.

नवीन टर्मिनलवरुन उड्डाणे सुरु करण्यासाठीच्या सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्याची  केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची महिती. गेल्या काही दिवसांत पुणे विमानतळावरून प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळत आहे,, त्यातच आंतरराष्ट्रीय विमानाचया उड्डानात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे नवीन टर्मिनल वरून ही सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

Dec 24, 2024 08:36 (IST)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आज सर्व सचिवांची बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आज सर्व सचिवांची बैठक 

राज्यातील सर्व महत्वाचे खात्यांचा आढावा 

सद्यस्थिती, पुढील काळात करावयाचे काम याची चर्चा आजच्या बैठकीत

Dec 24, 2024 07:20 (IST)

अमरावतीच्या पालकमंत्रिपदाबाबत आमदार रवी राणा यांचं मोठं विधान

अमरावतीच्या पालकमंत्रिपदाबाबत आमदार रवी राणा यांचं मोठं विधान

चंद्रशेखर बावनकुळे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर सर्वांना न्याय मिळेल, असं रवी राणा यांनी म्हटलं 

अमरावती जिल्ह्याला चंद्रशेखर बावनकुळे  हे पालकमंत्री मिळावे - रवी राणा 

 चंद्रशेखर बावनकुळे  यांना अमरावती जिल्ह्याचा चांगला अभ्यास आहे - रवी राणाल

Dec 24, 2024 06:52 (IST)

"सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीतील हत्या नाहीच", गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा दावा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनी केली असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी याप्रकरणावर मोठं वक्तव्य केले आहे. ही पोलीस कोठडीतील हत्या नाहीच, असं त्यांनी सांगितले.

Dec 24, 2024 06:48 (IST)

कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करा", केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहानांकडे खासदार ओमराजे निंबाळकरांची मागणी

केंद्र सरकारकडून कांदा पिकावर 20 टक्के निर्यात शुल्क आकारल्यामुळे भारतातून होणारी कांद्याची निर्यात मंदावली आहे. त्यामुळे कांदा निर्यातीवरील निर्यात शुल्क कमी करुन निर्यात सुरू करावी अशी मागणी धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी  केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चव्हाण व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Topics mentioned in this article