पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... 

Lok Sabha Election 2024 Result: बीड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

Dhananjay Munde : बीड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या (Lok Sabha Election 2024 Result) उमेदवार पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी सूचक आवाहन केले आहे. बीडमध्ये आमचा निसटता पराभव झाला, तो मान्य! जनतेने दिलेला कौल स्वीकारून पुढे जाऊ, असे आशयाचे पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केले आहे. 

(नक्की वाचा: उदयनराजे भोसलेंच्या रॅलीत चोरांचा सुळसुळाट, 10 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला)

धनंजय मुंडे यांचे सोशल मीडियावरील पोस्ट - 

"राज्यात महायुतीच्या उमेदवारांना महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या मतदानरुपी आशीर्वादाबद्दल सर्व जनतेचे आभार.
बीड मध्ये आमचा निसटता पराभव झाला, तो मान्य! जनतेने दिलेला कौल स्वीकारून पुढे जाऊ.
स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब व स्व.पंडित अण्णा यांनी आम्हाला जनसेवेचे बाळकडू दिलेले आहे. जय-पराजय होत राहतील, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कायम तत्पर आहोत व पुढेही राहू! 
पंकजाताईच्या या लढाईत 6 लाख 77 हजार पेक्षा अधिक मतदानरुपी आशीर्वाद दिलेल्या माय बाप जनतेचे तसेच अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या बीड जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, मान्यवर नेत्यांचे तसेच सर्व जिवलग सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार...!
एका विजयाने हुरळून किंवा एका पराभवाने नाउमेद व्हायचे नसते.
उष:काल होता होता, काळरात्र झाली;
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली!
विजयी उमेदवारांचे अभिनंदन!"

(नक्की वाचा: विजयानंतर राजेंना अश्रू अनावर, दमयंती राजेंनी तेव्हा काय केलं?)

बीड लोकसभा मतदारसंघामध्ये (Beed Lok Sabha Election 2024) महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाला. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. बीडमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. दरम्यान बीडमधील पराभव भाजपसाठी धक्का मानला जात आहे.

Devendra Fadnavis | 'मला मोकळं करा', फडणवीसांचं खळबळजनक वक्तव्य महायुतीसाठी धोक्याची घंटा?