जाहिरात

उदयनराजे भोसलेंच्या रॅलीत चोरांचा सुळसुळाट, 10 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

उदयनराजे भोसले यांच्या विजयी मिरवणुकीमध्ये चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केल्याची माहिती समोर आली आहे.

उदयनराजे भोसलेंच्या रॅलीत चोरांचा सुळसुळाट, 10 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

- सुजित आंबेकर, सातारा

लोकसभा निवडणूक 2024मध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये भव्यदिव्य विजयी मिरवणूक काढली. एकीकडे नेता जिंकून आल्याचा उत्साह स्थानिकांमध्ये पाहायला मिळाला.तर दुसरीकडे या मिरवणुकीमध्ये सहभागी होणे, काही जणांना महागात पडले. कारण मिरवणुकीत चोरट्यांनी तब्बल 10 तोळे सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला. दोन घटनांमध्ये तब्बल साडेपाच लाख रुपयांचा ऐवजही लुटल्याची चर्चा आहे. या संदर्भात पोलीस स्थानकात उदयनराजे भोसले समर्थकांच्या तक्रारी दाखल होत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 

(नक्की वाचा: विजयानंतर राजेंना अश्रू अनावर, दमयंती राजेंनी तेव्हा काय केलं?)

पोलिसात तक्रार दाखल 

सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये दोन तक्रारी दाखल झालेल्या आहेत. उदयनराजे भोसले यांच्या विजयानंतर समर्थकांनी जलमंदिर ते पोवई नाका आणि तेथून वखार महामंडळाच्या मतमोजणी केंद्रापर्यंत रॅली काढली होती. या रॅलीमध्ये पाच हजारांपेक्षा अधिक समर्थकांचा समावेश होता.  गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन जणांची आठ तोळे वजनाची सोन्याची साखळी लांबवल्याची माहिती समोर आली आहे.

(नक्की वाचा: 'आमच्याकडे आकडा आहे' संजय राऊतांनी प्लॅन सांगितला)

कोडोली येथील रहिवासी अमर संजय जाधव (वय 27 वर्ष) हे देगाव फाटा चौक येथे रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची सोन्याची साखळी चोरट्यांनी लांबलीय. हा प्रकार देगाव फाटा चौक परिसरात दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडला. रॅली संपल्यानंतर आपल्या गळ्यात सोन्याची साखळी नसल्याचे जाधव यांच्या लक्षात आले. तर दुसर्‍या घटनेमध्ये शिवाजी सर्कल पोवई नाका येथे नरेश सीताराम अग्रवाल ( वय 47 वर्ष) यांच्या गळ्यातील साडेचार तोळे वजनाची सोन्याची साखळीही चोरण्यात आली. या दोन्ही घटनांची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

(नक्की वाचा: तुमच्या मतदारसंघातून कोण जिंकले, कितीचे मताधिक्य? पाहा एका क्लिकवर)

यासारख्याच आणखी दोन-चार घटना घडल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र याबाबत अद्यापही तक्रार दाखल करण्यात आलेल्या नाहीत. या घटनांची दखल घेत सातारा पोलीस सक्रिय झाले आहे. उदयनराजे भोसले यांच्या रॅलीचे सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येत आहेत. 

Udayn Raje | लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर उदयन राजे यांची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
'बदलापूरच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या' कोणी केली मागणी?
उदयनराजे भोसलेंच्या रॅलीत चोरांचा सुळसुळाट, 10 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला
Dharmaraobaba Atram daughter bhagyashree-atram-joins-ncp-sharad-pawar-faction
Next Article
'बाबा वाघ तर मी वाघीण, वाघीण जास्त घातक' धर्मरावबाबांच्या लेकीचं पहिलचं भाषण गाजलं