सातारा लोकसभा मतदार संघातून भाजप उमेदवार उदयन राजे भोसले यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शशिकांत शिंदे यांचा जवळपास 32 हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर उदयन राजे यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर अनेक कार्यकर्तेहे राजेंच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी मोठ्या संख्येने जमले. तिथे गुलाल उधळला गेला. एकच जल्लोष केला गेला. कार्यकर्त्यांचे हे प्रेम पाहून उदयन राजेंनाही अश्रू अनावर झाले. त्यांनी कार्यकर्त्यांसमोरच आपल्या अश्रूंना वाट करून दिली. त्यावेळी त्यांच्या बरोबर त्यांची पत्नी दमयंती राजे होत्या. राजेंचे अश्रू येत असताना दमयंती राजेंची एक कृती सर्वांची मने जिंकून गेली.
हेही वाचा - ठाकरें पेक्षा कमी जागा जिंकल्या तरही शिंदे सरस, काय आहे कारण?
4 जूला सकाळी मतमोजणीला सुरूवात झाली. सुरूवातीच्या कला नुसार उदयन राजे भोसले हे पिछाडीवर होते. शशिकांत शिंदे यांनी आघाडी घेतली होती. शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी तर विजयाचा जल्लोषही सुरू केली होता. मात्र वारं फिरलं. शिंदेंची आघाडी तोडत उदयन राजे यांनी आघाडी घेतली. ही आघाडी त्यांनी शेवटपर्यंत टिकवली. शेवटी विजयही त्यांनी नोंदवला. त्यानंतर सुरू झाला तो कार्यकर्त्यांचा जल्लोष. हा जल्लोष अगदी राजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये ही झाला. यावेळी उदयन राजेंना अश्रू अनावर झाले. त्यावेळी दमयंती राजे यांनी उदयन राजे यांना धीर दिला. त्यावेळी राजे थोडे सावरले. त्यांनी मग जल्लोषात सहभाग नोंदवत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.
हेही वाचा - सत्तास्थापनेसाठी रस्सीखेच सुरू, चंद्रबाबू नायडूंनी ठेवल्या दोन अटी, भाजप मान्य करणार?
विजयानंतर उदयन राजे यांनी आनंद व्यक्त केला. मी काय कमावलं असा विचार मनात येतो. निवडणूक जिंकली ते ठिक आहे. पण निवडणुकीत जनता कशाकडे बघून मतं देते हे समजायला मार्ग नाही असे वक्तव्य त्यांनी केले. भ्रष्टाचार करायचाय तर भ्रष्टाचार कर अशा चिटुरकीतून पोच पावती मिळत असेल काय करायचं असा प्रश्न उपस्थित करत शिंदेंना मिळालेल्या मतांबाबत नाराजी व्यक्त केली. शिवाय त्यांना जे मताधिक्य मिळाले त्याबाबत आपण समाधानी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र या मतदार संघात महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्याचे त्यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world