सुरज कसबे, लोणावळा:
Lonavala News: लोणावळ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. मुंबईत एल.एल.बी.चे शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय श्रेया नरेंद्र पटी हिने लोणावळ्यातील टायगर पॉईंट येथून सुमारे चारशे फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी तब्बल 10 तासांच्या प्रयत्नानंतर या तरुणीचा मृतदेह शोधला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लोणावळ्यात तरुणीची आत्महत्या
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईतील नामांकित महाविद्यालयात एल.एल.बी.चे शिक्षण घेणारी श्रेया पटी ही ३१ जानेवारी रोजी लोणावळ्याला ट्रेकिंगसाठी जात आहे' असे सांगून घरातून बाहेर पडली होती. लोणावळ्यात पोहोचल्यानंतर तिने आधी ड्युक्स नोज येथे भेट दिली आणि त्यानंतर रिक्षाने टायगर पॉईंट गाठला. टायगर पॉईंट येथील एका स्नॅक्स सेंटरच्या पाठीमागे तिने आपली बॅग ठेवली होती.
सायंकाळपर्यंत श्रेया घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तिचा मोबाईल बंद लागला. दरम्यान, बेवारस बॅग आढळल्यानंतर दुकानदाराने बॅगेतील ओळखपत्राच्या आधारे कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनी तात्काळ लोणावळा गाठलं. पोलिसांनी तात्काळ शोधकार्य सुरू केले.
तब्बल 36 तासांनी सापडला मृतदेह
१ फेब्रुवारी ड्रोन, डॉग स्क्वॉड आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली आणि अखेर टायगर पॉईंट येथील चारशे फूट खोल तब्बल ३६ तासांच्या शोधमोहीमेनंतर ड्रोनच्या साहाय्याने तिचा मृतदेह आढळून आला. लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू टीमने अत्यंत कठीण परिस्थितीत मृतदेह वर काढला. पोलीस तपासात श्रेयाने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Nandurbar News: नगरपरिषदेचे खोटे शिक्के, बोगस सही.. कॅफेत सुरु होता गोरखधंदा; 5 अटकेत
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world