सुरज कसबे, पिंपरी चिंचवड:
Lonavala Online villa Booking Scam: कडाक्याचा उन्हाळा अन् सुट्ट्यांचा हंगाम असल्याने पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. थंड हवेचं ठिकाण म्हटलं की सर्वांनाच पहिल्यांचा लोणावळा आठवतो. झाडांची सावली, खळखळणारे झरे पाहण्यासाठी पर्यटक लोणावळा सहलीचा प्लॅन करतात. मात्र लोणावळ्यात पर्यटकांची मोठी फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. ऑनलाइन व्हिला बुकिंगच्या माध्यमातून पर्यटकांची लुट होत असल्याचं समोर आले आहे. नेमका काय आहे हा फ्रॉड? वाचा...
Crime News: सायबर टोळीवर मकोका!11 कोटींची लुट, 3 राज्यांचं कनेक्शन.. पिंपरी चिंचवड पोलिसांचा दणका
सावधान! लोणावळ्यात व्हिलाच्या नावाखाली पर्यटकांची फसवणूक
याबाबत सविस्तर वृत्त असे की, थंड हवेचे ठिकाण आणि पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या लोणावळ्यात सध्या पर्यटकांची फसवणूक करणारा एक मोठा ऑनलाइन व्हिला बुकिंग स्कॅम उघडकीस आला आहे. सोशल मीडियाचा वापर करून पर्यटकांना जाळ्यात ओढले जात असून, प्रत्यक्षात व्हिला अस्तित्वातच नसल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.
भामटे सोशल मीडियावर आलिशान व्हिला आणि बंगल्यांचे आकर्षक फोटो शेअर करतात. पर्यटकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना गुगल मॅपचे लाईव्ह लोकेशन आणि बनावट पावतीही पाठवली जाते. बुकिंगच्या नावाखाली २० ते २५ हजार रुपयांची अँडव्हान्स रक्कम उकळली जाते. मात्र, पर्यटक जेव्हा प्रत्यक्ष लोकेशनवर पोहोचतात, तेव्हा तिथे असा कोणताही व्हिला नसल्याचे त्यांना समजते.
पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन
या स्कॅममुळे लोणावळ्याच्या पर्यटन व्यवसायावर मळभ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक व्यावसायिकांच्या मते, हे फसवणुकीचे रॅकेट लोणावळ्यातील नसून बाहेरील जिल्ह्यांतून चालवले जात आहे. दरम्यान लोणावळा पोलीस निरीक्षक राजेश रामघरे यांनी पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी ऑनलाइन व्यवहार करताना अधिकृत वेबसाइट्सचाच वापर करावा. शक्य असल्यास लोणावळ्यात आल्यावर प्रत्यक्ष पाहणी करूनच व्हिला किंवा रिसॉर्ट बुक करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Mumbai Goa Highway: कोकणात जाताय तर आधी टोल भरा! 'या' ठिकाणी पुन्हा टोलधाड सुरु होणार