जाहिरात

Crime News: सायबर टोळीवर मकोका!11 कोटींची लुट, 3 राज्यांचं कनेक्शन.. पिंपरी चिंचवड पोलिसांचा दणका

पोलिसांनी कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि राजस्थान येथून ९ अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. या टोळीने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेशातही आपले जाळे पसरवले होते.

Crime News:  सायबर टोळीवर मकोका!11 कोटींची लुट, 3 राज्यांचं कनेक्शन.. पिंपरी चिंचवड पोलिसांचा दणका

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad mcoca News:  गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारांविरुद्ध अशा प्रकारची ही आयुक्तालयातील पहिलीच कारवाई  ठरली आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि राजस्थान येथून ९ अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. या टोळीने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेशातही आपले जाळे पसरवले होते.

Mumbai Goa Highway: कोकणात जाताय तर आधी टोल भरा! 'या' ठिकाणी पुन्हा टोलधाड सुरु होणार

अटक केलेल्या ९ आरोपींमध्ये अभय पाटील , शिवतेज पोटे , युवराज मुदलीयार, रॉनी उर्फ पंकज गिरीगोस्वामी, प्रल्हाद गाडरी, उमेश भट्ट , महेश उडचणे, राहुल मौर्य आणि शेख अब्दुल रहिस  यांचा समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवणे. फसवणुकीची रक्कम USDT सारख्या आभासी चलनात Cryptocurrency वर्ग करून देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करणे.

सायबर चोरट्यांच्या टोळीवर मकोका

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात राहून संघटितपणे गुन्हे करणे. पोलिसांनी तपासादरम्यान विविध बँक खात्यांमधील २ कोटी ६५ लाख ७६ हजार रुपये गोठवले असून, ते तक्रारदाराला परत मिळवून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

नक्की वाचा - Weather Alert : 4 दिवस धोक्याचे! यात्रा, धार्मिक-सार्वजनिक कार्यक्रम स्थगित करा; हवामान विभागाकडून अलर्ट

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com