जाहिरात

Mumbai Goa Highway: कोकणात जाताय तर आधी टोल भरा! 'या' ठिकाणी पुन्हा टोलधाड सुरु होणार

येत्‍या २४ एप्रिल रोजी या निविदा उघडल्‍या जाणार आहेत. त्यानंतर ठेकेदार निश्‍चित केला जाणार आहे. तर मे महिन्यापासून टोल वसुली सुरू होण्याची शक्‍यता आहे.

Mumbai Goa Highway: कोकणात जाताय तर आधी टोल भरा! 'या' ठिकाणी पुन्हा टोलधाड सुरु होणार

गुरु दळवी, सिंधुदुर्ग:

Sindhudurg Osargaon Toll Plaza:  मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोलनाका लवकरच पुन्हा सुरु होणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आधी टोल भरुनच पुढील प्रवास करावा लागणार आहे. याआधी राजकीय पक्षांच्या विरोधामुळे हा टोलनाका बंद झाला होता, आता पुन्हा नव्याने हा टोलनाका सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

ओसरगाव येथील टोलनाका पुन्हा सुरु होणार! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महामार्ग चौपदरीकरण पूर्णत्‍वास जात असताना कणकवलीमधील ओसरगाव टोल नाक्‍यावरून लवकरच टोल वसुली सुरू होणार आहे. या टोल नाक्‍यासाठी केंद्र शासनाने निविदा मागविल्‍या आहेत. उद्या या निविदा भरण्याची शेवटची मुदत असून, येत्‍या २४ एप्रिल रोजी या निविदा उघडल्‍या जाणार आहेत. त्यानंतर ठेकेदार निश्‍चित केला जाणार आहे. तर मे महिन्यापासून टोल वसुली सुरू होण्याची शक्‍यता आहे.

Mumbai News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक तात्पुरत्या काळासाठी बंद; 2 दिवस प्रवासाचं नियोजन करा!

ओसरगाव टोल नाक्‍यावरून टोल वसुलीसाठी यापूर्वी तीन एजन्सी नियुक्‍त झाल्‍या होत्या. मात्र या एजन्सीकडून टोल वसुली सुरू होताच टोल विरोधी कृती समिती आणि सर्वच राजकीय पक्षांनी जाेरदार आंदोलने सुरू केली. त्‍यामुळे ओसरगाव टोल नाक्‍यावरील टोल वसुली बंद करण्यात आली आहे. यापूर्वी १४ जून २०२३ रोजी टोल नाक्‍यावरून टोल वसुली सुरू करण्यात आली होती. मात्र आंदोलनानंतर ही टोल वसुली बंद करण्यात आली. त्‍यानंतर गेली तीन वर्षे टोल नाका सुरू होण्याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही कार्यवाही झाली नव्हती.

लवकरच एजन्सी निश्चित केली जाणार

राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने ओसरगाव टोल नाक्‍यावरून टोल वसुली सुरू करण्यासाठी १७ एप्रिल रोजी ऑनलाईन निविदा प्रसिद्ध केल्‍या आहेत. यात जानवली पूल ते पत्रादेवी या ६० किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी दुचाकी आणि तीन आसनी वाहने वगळता उर्वरित सर्व वाहनांसाठी टोल वसुलीसाठी एजन्सी निश्‍चित केली जाणार आहे. 

नक्की वाचा - Weather Alert : 4 दिवस धोक्याचे! यात्रा, धार्मिक-सार्वजनिक कार्यक्रम स्थगित करा; हवामान विभागाकडून अलर्ट

यात दरवर्षी वाहनांकडून ५७.८८ कोटींचा टोल वसूल होईल अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात आली आहे. २३ एप्रिल रोजी ऑनलाईन निविदा सादर करण्याची अंतिम तारीख आहे. तर २४ एप्रिल रोजी नवी दिल्‍ली येथील महामार्ग विभागाच्या कार्यालयात निविदा उघडल्‍या जाणार असून त्‍याच दिवशी ठेकेदार निश्‍चित होणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com