दिवाकर माने, परभणी
Parbhani News: खरीपाच्या तोंडावर परभणी जिल्ह्यात पुन्हा लम्पी त्वचा रोगाचा शिरकाव झाला आहे. पूर्णा तालुक्यातील वझुर येथील रावसाहेब लांडे यांच्या 7 महिन्याच्या वासराला लम्पी त्वचा रोगाची लागण झाली असून त्यावर पशुवैद्यकीय अधिकारी उपचार करीत आहेत. या आजारामुळे बाधित जनावरांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऐन खरीप पिकांच्या मशागतीचे काम चालू असताना शेतकऱ्याचे गोधन संकटात सापडल्याने शेयकऱ्याची चिंता वाढली आहे, हा शिरकाव थांबवण्यासाठी वैद्यकीय अधिकारी प्रयत्न करत आहेत.
लम्पीचा आजार टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अगोदर जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन वझूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी एन.एल. राठोड यांनी केले आहे. वझुर पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत येणाऱ्या गावांत जनावरांत लम्पीच्या आजारामुळे बहुतांश जनावरांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. शेतकऱ्यांनाही उपचारासाठी खर्च लागणार आहे.
(नक्की वाचा- Agriculture news: मराठवाड्यात पावसाने घेतली उसंत, शेतकऱ्यांची अडचण, दुबार पेरणीचं संकट गडद)
वझुरातील रावसाहेब लांडे यांच्या सहा-सात महिन्यांच्या वासराला लम्पीची लागण झाली असून त्याच्यावर चार दिवसांपासून उपचार सुरू आहेत. या गोऱ्ह्याला औषधोपचारासाठी पशवैद्यकीय अधिकाऱ्याकडे आणले होते. आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घेणे हाच एक पर्याय शेतकऱ्यांसमोर उरला आहे.
(नक्की वाचा- Pune Dam Water Level: पुणेकरांसाठी खूशखबर! शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांंच्या पाणीसाठी मोठी वाढ)
लम्पीचा एखाद्या पशुधनात शिरकाव झालाच तर उपचारासाठी जवळपास 5 ते 7 हजार रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागणार आहेत, या भीतीने अनेक शेतकरी आपल्या पशुधणासोबत लसीकरण करण्यासाठी पुढे येताना दिसून येत आहेत तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांना आव्हान केले आहे की पशुधन रोगमुक्त राहावे, यासाठी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.