जाहिरात

Accident News: पुणे हळहळलं! भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, मुलांच्या डोळ्यादेखत आई- वडिलांनी जीव सोडला

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Accident News: पुणे हळहळलं! भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, मुलांच्या डोळ्यादेखत आई- वडिलांनी जीव सोडला

अविनाश पवार, पुणे:

Pune- Nashik Highway Accident:  गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरु आहे. रविवारी पुणे- नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. लक्झरी बस आणि चारचाकी कारमध्ये झालेल्या या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

पुणे- नाशिक महामार्गावर अपघात 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे–नाशिक महामार्गावर मंचरजवळील एकलहरे येथे काल रात्री साडेअकराच्या सुमारास भीषण अपघात घडला. इंद्रप्रस्थ पेट्रोल पंपासमोर एका लक्झरी बस आणि चारचाकी कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत.

Pune News: 'महाराष्ट्र केसरी'चा किताब जिंकताच निवृत्ती! कुस्तीप्रेमी चक्रावले; हर्षवर्धन काय म्हणाला?

संबंधित लक्झरी बसही पुण्याहून धुळ्याकडे जात होती, तर चारचाकी कार नाशिकहून पिंपरी-चिंचवडकडे येत होती. याचदरम्यान दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. या अपघातात आरती मल्लिकार्जुन आंबेगावे (वय 42), मल्लिकार्जुन शिवराज आंबेगावे (वय 46) आणि लता बाळू तूपलोंडे (वय 63) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मृणाल मल्लिकार्जुन आंबेगावे (वय 16) आणि प्रेम मल्लिकार्जुन आंबेगावे (वय 20) हे दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

एकाच घरातील तिघांचा मृत्यू 

अपघातातील सर्वजण पिंपरी-चिंचवड येथील वाल्हेकर वाडी परिसरातील रहिवासी असून एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर येत आहे.  या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Pune News: मस्करी अंगलट आली! अल्पवयीन मुलावर पिस्तुल रोखलं, चुकून गोळी सुटली अन्... पुण्यात भयंकर घडलं!

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com