3 days ago

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session of the state legislature) सध्या मुंबईमध्ये सुरु आहे. अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्याचा आज तिसरा दिवस आहे. या अधिवेशनात शेतकरी प्रश्न, मराठी-हिंदी भाषा वादाबाबत राज्य सरकार आणि विरोधकांध्ये जोरदार घमासान सुरू आहे. दरम्यान (Maharashtra News) आज देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.  

Jul 09, 2025 20:59 (IST)

Live Update : मीरा रोडमधील पोलिस आयुक्तांची तडकाफडकी बदली

मीरा रोडमधील पोलिस आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मधुकर पांडे हे मीरा रोडचे पोलिस आयुक्त होते. मराठी भाषेसाठी निघालेल्या मोर्चानंतर त्यांची बदली करण्यात आली आहे.  

Jul 09, 2025 19:23 (IST)

Live Update : विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉ हेमलता ठाकरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉ हेमलता ठाकरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न...

औषधी गोळ्यांचा ओव्हरडोस घेतल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत खोलीत आढळल्या...

मुलाने वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने वाचला जीव, मात्र अजूनही ठाकरे शुद्धीत नाही...

संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपकुल सचिव पदावर ठाकरे या कार्यरत..

काही दिवसापूर्वीच विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर ठाकरे यांनी गंभीर आरोप केला होता. 

त्यांच्या खोलीत आढळली सुसाईड नोट, सुसाईड नोटमध्ये विद्यापीठाच्या दोन मोठ्या अधिकाऱ्यांचे नाव...

बदली झाल्यावर शिपाई दिला नसल्याने फाईलचे भले मोठे गठ्ठे डोक्यावर घेऊन नवीन कार्यालयात जात असल्याचा ठाकूर यांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता

Jul 09, 2025 19:13 (IST)

ण्यातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची बैठक

पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लवकरच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधींची विशेष बैठक आयोजित करून यामध्ये वाहतूक सुधारणा उपाययोजनांचा आढावा घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.

Jul 09, 2025 17:37 (IST)

ठाकरे गटाचे आमदार सुनिल प्रभू यांच्या भेटीला एकनाथ शिंदे

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली...

Advertisement
Jul 09, 2025 17:36 (IST)

Live Update : कोकणासाठी उद्धव ठाकरेंची "शिवबंधन परिक्रमा"

कोकणासाठी उद्धव ठाकरेंची "शिवबंधन परिक्रमा"

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ऑगस्ट महिन्यात  कोकण दौऱ्यावर 

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे उद्धव ठाकरेंचा दौरा 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा असणार 

16 ते 30 जुलै दरम्यान ऑगस्टमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार बाळ माने कोकण भागात दौरा करून नियोजन करणार 

 ऑगस्ट महिन्यात उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा

Jul 09, 2025 16:53 (IST)

केडीएमसी हद्दीत मे महिन्यापासून आत्तापर्यंत आढळून आले डेंगूचे ३५ रुग्ण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात साथीचे रोग वाढले आहे या अनुषंगाने केडीएमसीच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना केली जात आहे. याबाबत केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ला यांनी सांगितले की, डेंगूच्या संशयित रुग्ण म्हणून सॅम्पल घेतो. त्यांचे सॅम्पल घेऊन ठाण्यात त्याची एलायझा टेस्ट केली जाते. मे पासून आत्तापर्यंत केडीएमसी हद्दीत डेंगूचे ३५ रुग्ण आहेत. तसेच मलेरियाचे जून महिन्यात ४१ रुग्ण आढळून आले. जूलै महिन्यात १८ रुग्ण आढळून आले आहेत. 

Advertisement
Jul 09, 2025 16:52 (IST)

12 जहाल नक्षलवाद्यांनी केले छत्तीसगडच्या दंतेवाडा पोलिसांसमोर आत्मसमर्पण

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण सुरूच आहे.  दंतेवाडा येथे लोण वरातू (घरवापसी) मोहिमेअंतर्गत 12 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये 8 लाखांचे बक्षीस असलेली नक्षलवादी चंद्राणा आणि 3 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 1005 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यापैकी 205 बक्षीस असलेले नक्षलवादी आहेत. या सर्वांनी एसपी गौरव रॉय यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.

Jul 09, 2025 16:49 (IST)

Live Update : पुढील महिन्यात लोणावळ्यात काँग्रेस पक्षाचं एक दिवसीय अधिवेशन पार पडणार

पुढील महिन्यात लोणावळ्यात काँग्रेस पक्षाचं एक दिवसीय अधिवेशन पार पडणार

काँग्रेस पक्ष म्हणून एकजूट कशी दाखवायची, पक्षात कोणते बदल करणं अनिवार्य आहे या सगळ्यासाठी हे अधिवेशन महत्वाचं आहे

त्याचसोबत आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी संवाद साधला जाणार आहे

महत्वाचं म्हणजे आगामी महापालिका निवडणूकिसाठी काँग्रेस पक्ष कशी तयारी करेल आणि कशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे यावर देखील चर्चा केली जाणार

Advertisement
Jul 09, 2025 13:29 (IST)

Live Update : MSEB कंत्राटी विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलन..

ठाण्यातील वागळे विभागामध्ये असणारा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी याचा खाजगीकरण करण्याच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेला आहे. असंख्य कर्मचाऱ्यांनी संपूर्णपणे काम बंद आंदोलन करून रस्त्यावर उतरलेले आहे..

Jul 09, 2025 13:26 (IST)

Live Update : उद्धव ठाकरे यांच्याकडून दोन भाऊ एकत्र आलो याचा पुनरुच्चार

उद्धव ठाकरे आझाद मैदानातील शिक्षकांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी दोन भाऊ एकत्र आलो याचा पुनरुच्चार केला. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

आम्ही आमच्या राजकीय पोळ्या भाजू शकलो असतो.

मात्र आता मतभेद बाजूला ठेवून सोबत आलो आहे 

कारण आम्ही प्रबोधनकार ठाकरे यांची नातू आहोत. 

महाराष्ट्राचा आकडा आमच्या कुटुंबाने जवळून बघा

Jul 09, 2025 12:42 (IST)

Live Update : छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृह प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून दखल

संभाजीनगर बालसुधारगृह छळ प्रकरणात जिल्हाधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात येणार आहे. तीन पोलीस महिला निरीक्षकांची समिती स्थापन करण्यात आली. त्यांच्याकडून मुलींशी बोललं जात आहे. अनेक गंभीर बाबी समोर आल्यानंतर अधिक्षकांची चौकशी सुरू करण्यात येईल. संस्थेची मान्यता निश्चितपणे रद्द करण्यात येईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

Jul 09, 2025 12:32 (IST)

Live Update : आता पर्यटकांना 3 हजार फूट उंचावरून पाहता येणार चिखलदरा...

विदर्भाचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या चारही बाजूंनी हिरवेगार जंगल, खोल दरी आणि उंच पहाड हे चिखलदऱ्याचे अतिशय सुंदर दृश्य पक्ष्याप्रमाणे आता  पर्यटकांना जमिनीपासून 3 हजार फूट उंच आकाशातून पाहण्याचा आनंद घेता येणार आहे... चिखलदऱ्याचे हे  दृश्य पर्यटकांना अनुभवण्यासाठी पॅरोमोटरिंगची सुविधा करण्यात आली आहे. खोल दरीमध्ये उतरणे आणि उंच पहाड चढणे असे थरार अनुभव घेण्यासाठी साहसी पर्यटक नियमित चिखलदऱ्यासह मेळघाट्यात येतात, त्यामुळे पॅरोमोटरिंगमुळे आता साहसी पर्यटकांना भिमकुंड येथील खोलदरी, गाविलगड किल्ला, स्कायवाक पॉईंट, चिखलदरा शहर आणि येथील जंगल उंच आकाशातून पाहण्याची मजा लुटता येणार आहे, वन विभागामार्फत ही सुविधा करण्यात आली आहे...

Jul 09, 2025 12:31 (IST)

Live Update : रत्नागिरीतही बँक कर्मचाऱ्यांनी निदर्शनं

कामगार संघटनांनी आज देशव्यापी बंद पुकारला आहे. केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात रत्नागिरीतही बँक कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली. बँकांचं खासगीकरण थांबवावं, नोकर भरती करावी, कंत्राटी व आउटसोर्सिंग पद्धती थांबवा, नवीन पेन्शन योजना रद्द करावी, जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करावी. सर्वसामान्य ग्राहकांसाठी बँक सेवा शुल्क कमी करावी आदी मागण्या बँक कर्मचाऱ्यांच्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 26 बँका या संपात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे बँकांचे आर्थिक व्यवहार आज पूर्णपणे बंद आहेत. 

Jul 09, 2025 11:57 (IST)

Live Update : नंदुरबार सकाळपासून मुसळधार पाऊस....

नंदुरबार सकाळपासून मुसळधार पाऊस....

मुसळधार पावसामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला लागली गळती....

नंदुरबार शहरातील संत दगा महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पाणीच पाणी....

महाविद्यालयातील इलेक्ट्रिशन वर्कशॉप मध्ये पत्र्याचे पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांचे हाल....

मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्यामुळे मशिनरी खराब होण्याची शक्यता...

Jul 09, 2025 10:31 (IST)

Live Update : आझाद मैदानात शिक्षकांचा मोर्चा, शरद पवारांची उपस्थिती

आझाद मैदानात शिक्षकांचा मोर्चा, शरद पवारांची उपस्थिती

Jul 09, 2025 10:01 (IST)

Live Update : आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन

आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन

विविध मागण्यांसाठी शिक्षक आक्रमक

Jul 09, 2025 09:51 (IST)

Live Update : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनला सुरुवात...

Jul 09, 2025 09:05 (IST)

Live Update : दिल्लीकरांना मोठा दिलासा, जुन्या वाहनांवरील इंधन बंदी पुढे ढकलली

दिल्लीमध्ये जास्त वर्ष झालेल्या वाहनांवरील इंधन बंदी १ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली

एअर क्वालिटी कमिशन (CAQM) च्या बैठकीत वाहन चालकांना मोठा दिलासा

१० वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहन आणि १५ वर्षांपेक्षा जुनी पेट्रोल वाहन यांना EOL वाहन म्हटलं जात

केंद्र सरकारने आधी हा निर्णय १ जुलै पासून दिल्लीत लागू केला होता आता त्यात बदल करून त्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत सूट देण्यात आलीय

हा नियम गुरुग्राम, फरीदाबाद, नोएडा, गाझियाबाद आणि सोनीपतमध्ये देखील लागू होईल

दिल्ली सरकारने एअर क्वालिटी कमिशन (CAQM) ला पत्र लिहून जुन्या वाहनांमध्ये इंधन भरण्यावरील बंदी सध्या थांबवण्याचे आवाहन केलंय

Jul 09, 2025 08:56 (IST)

Live Update : गोव्यातून इचलकरंजीकडे निघालेल्या टेम्पोतील साडेतेरा लाखांची रोकड लंपास

गोव्यातून इचलकरंजीकडे निघालेल्या टेम्पोतील साडेतेरा लाखांची रोकड लंपास कारणाऱ्या दोघांसह साथीदाराला पोलिसांनी अटक केलीये. आजरा तालुक्यातील उत्तूर येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. टेम्पो चालकानेच साथीदारांच्या मदतीने ही रक्कम चोरल्याच पोलीस तपासात उघड झालं आहे. अधिक तपासासाठी या आरोपीचा ताबा आजरा पोलिसांकडे देण्यात आला.

Jul 09, 2025 07:52 (IST)

Live Update : मुंबईतील उड्डाण पुलाचे नाव आता 'सिंदूर'

मुंबईतील मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि' मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक पुलाचे नामांतर करण्यात आले असून आता सिंदूर हे नाव या पुलास देण्यात आले आहे.

Jul 09, 2025 07:51 (IST)

Live Update : पावसासाळी अधिवेशनात आज पुरवणी मागण्यांवर पुन्हा चर्चा...

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पुरवणी मागण्यावरती चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र काल मुख्य न्यायाधीश यांच्या कार्यक्रमामुळे ही चर्चा पुढे ढकलण्यात आली होती. पुरवणी मागण्यावर आज पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. यासोबतच आज विधिमंडळाचं अधिवेशन विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावरून तापणार आहे. विरोधी पक्षाकडून विधानसभा अध्यक्षांना विधानसभा विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात स्मरण पत्र देखील विरोधकांकडून दिलं जाईल. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 57 हजार कोटीहून अधिक रुपयाच्या पुरवणी मागण्या पटलावर ठेवण्यात आल्या होत्या. इतक्या मोठ्या संख्येच्या पुरवणी मागण्या सभागृहासमोर ठेवल्यामुळे विरोधक सरकारच्या तिजोरीच्या खडखडाटावरून सरकारविरोधात आक्रमक होतील

Jul 09, 2025 07:50 (IST)

Live Update : गिरणी कामगार घराच्या प्रश्नावरून मोर्चा काढणार

गिरणी कामगार घराच्या प्रश्नावरून मोर्चा काढणार आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातील 14 कामगार संघटनांच्या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने आज सकाळी 11 वाजता भायखळा-राणीबाग ते विधानभवन पर्यंत कामगारांचा धडक "लाँगमार्च' आयोजित करण्यात आला आहे. गिरणी कामगारांचा मोर्चा आझाद मैदानातच होईल सर्व गिरणी कामगार थेट आझाद मैदानातच मोर्चासाठी उपस्थित राहतील उद्धव ठाकरे दुपारी बारा वाजता या मोर्चात सहभागी होतील. मनसे नेते बाळा नांदगावकरही गिरणी कामगारांच्या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहेत