17 minutes ago

Maharashtra Assembly Monsoon Sessions LIVE Updates: राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात विविध मुद्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान सुरु आहे.  विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस आहे.

Jul 04, 2025 17:14 (IST)

Live Update : कुणाल कामरा आणि सुषमा अंधारें विरोधात हक्कभंग मंजूर

कुणाल कामरा आणि सुषमा अंधारें विरोधात हक्कभंग मंजूर 

कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंना सोमवारी नोटीस काढली जाणार 

कामरा आणि अंधारेंच्या अडचणी वाढल्या 

कुणाल कामराकडून झालेल्या स्टॅंडअप कॉमेडी शोमध्ये एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या कवितेसंदर्भात हक्कभंग 

सोबतच, त्या व्हीडिओचे सुषमा अंधारेंकडून देखील समर्थन केल्याप्रकरणी हक्कभंग दाखल

Jul 04, 2025 15:41 (IST)

नाशिक जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

- नाशिक जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ 

- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांनी घेरण्याचा केला प्रयत्न, अनेक शेतकऱ्यांकडून कर्जमाफी करण्याची मागणी

- मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून शेतकऱ्यांना करण्यात आले शांततेचे आवाहन 

- सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने काम करत आहे मंत्री कोकाटे यांच्याकडून आश्वासन

Jul 04, 2025 15:40 (IST)

Live Update : कोंढवा अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला 42 तासानंतर अटक

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोंढवा बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला अटक केली आहे.  त्याला पुण्यातील बाणेर परिसरातून अटक करण्यात आली आहे.  तब्बल ४२ तासानंतर पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले आहे. 

Jul 04, 2025 14:41 (IST)

Live Update : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

परभणीतील तरुण सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत. उच्च न्यायालयानं हे आदेश दिले आहेत. 

Advertisement
Jul 04, 2025 13:47 (IST)

Live Update : नाशिकच्या मनसे कार्यालयात ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी पोहोचले

नाशिकच्या मनसे कार्यालयात ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी पोहोचले

- उद्या नाशिकहून दोन्ही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईला सोबत जाणार 

- उद्याच्या नियोजनाबाबत मनसे कार्यालयात बैठक सुरू

- मनसे आणि शिवसेना  कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह

Jul 04, 2025 12:50 (IST)

Live Update : बाजीरावांच्या पुतळ्यासाठी एनडीएपेक्षा दुसरी चांगली जागा नाही - मुख्यमंत्री फडणवीस

छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची ज्योत पेटवली, त्या काळात संपूर्ण भारतात एक प्रकारे परकीय आक्रमकांना आम्ही स्वीकारलेले आहे अशी परिस्थिती होती. भारतातील अनेक राजे त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते. आई जिजाऊंच्या प्रेरणेने शिवरायांनी सामान्य माणसातील विजिगीषू वृत्ती चेतवली आणि आक्रमकांना सळो की पळो करू सोडलं आणि स्वराज्याची स्थापना केली. दुर्दैवाने महाराज फार काळ जगू शकले नाही, मात्र त्यांनी सामान्य मराठी माणसाच्या रक्तात जो अंगार चेतवला होता त्यामुळे महाराजांनंतरची ही क्रांती शांत झाली नाही.  थोरल्या बाजीरावांचा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य साम्राज्याचा विस्तार करण्याचा इतिहास पाहायला मिळतो. 

19-20 व्या वर्षी पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घ्यायची आणि 20-21 वर्षे नुसते लढत राहायचे. 41 लढायांमध्ये एकदाही पराभव नाही. शत्रूंना नामोहरम करण्याचे काम त्यांनी केले. पश्चिमेमध्ये बोलबाला होताच दक्षिणेमध्येही साम्राज्याचा विस्तार झाला.अखंड भारतात हिंदवी स्वराज्याची आणि मराठा साम्राज्याचा विस्तार करण्याचे काम थोरल्या बाजीरावांनी केले.

मोगलांची सेवा 8-10 किमी प्रवास करायची, तर बाजीरावांची सेवा 60-80 किलोमीटरचा प्रवास तासाला करायची. दुसऱ्या महायुद्धाचे नायक माँटेगोमेरी यांनी जगातील योद्धांबाबत पुस्तक लिहिले, त्यात त्यांनी पालखेडच्या लढाईचा उल्लेख केला आहे. धोरणात्मकरित्या सर्वोत्तम लढाई असं म्हणताना त्यांनी थोरल्या बाजीरावांताही उल्लेख केला आहे. 

इंग्रजांनी आणि त्यानंतर काही प्रमाणात स्वकीयांनी इतिहासातील अनेक नायकांवर अन्याय केला.  किंबहुना आपल्या हिंदवी स्वराज्याचा आणि  मराठी साम्राज्याचा इतिहास आपल्या इतिहासातून डिलीटच करून टाकला. आपल्याला असं वाटू लागलं की मोगलांनंतर इंग्रजच आले आणि त्यांनीच आपल्यावर राज्य केले, यामुळे अनेक महानायकांचा आपल्याला विसर पडला. आज देशात पुन्हा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात आमच्या नायक, योद्धे आणि स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास आपल्या पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहीजे असा प्रयत्न सुरू आहे. 

बाजीरावांच्या पुतळ्यासाठी एनडीएपेक्षा दुसरी चांगली जागा असूच शकत नाही. सैनिकी बाण्याची निर्मिती ज्या संस्थेत केली जाते, तिथे हा पुतळा लागणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Advertisement
Jul 04, 2025 12:48 (IST)

Live Update : पहिल्या बाजीराव पेशव्याच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी अमित शाह काय म्हणाले?

पुण्याच्या भूमीवर मी उभा आहे. गुलामीच्या काळरात्रीमध्ये आशेचा किरण निर्माण केला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. युद्धाची कलेचे काही नियम हे कधीही बदलत नाही. युद्धात व्यूहरचनेचे महत्त्व, त्वरेचे महत्त्व गरजेचे असते , समर्पण आणि देशभक्ती आणि सगळ्या महत्त्वाचे म्हणजे बलिदानासाठीची  भावनाच विजय मिळवून देते. हे सगळे गुणांचे उत्कृष्ट उदाहरण शोधायचे असेल तर ते केवळ बाजीराव पेशव्यांमध्येच मिळेल.

Jul 04, 2025 12:21 (IST)

Live Update : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे अनावरण Live सोहळा

Advertisement
Jul 04, 2025 12:20 (IST)

Live Update : शक्तिपीठ रद्द करण्याच्या मागणीसाठी परभणीत सलग तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा विरोध!

सलग तिसऱ्या दिवशी देखील शक्तिपीठ महामार्गला शेतकऱ्यांन तर्फे विरोध दर्शवीला जात आहे, परभणीच्या आंबेटाकळी येथील शक्तिपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीस शेयकऱ्यांनी वारंवार विरोध दर्शवला आहे, आंबेटाकळी येथील शेतकऱ्यांनी निवेदन द्वारे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणबाजी करत हा निषेध नोंदवला आहे, आम्ही भूमि अधीग्रहण करू देणार नाहीत यां निर्णयावर शेतकरी ठाम असून तात्काळ हा महामार्ग वापस घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे

Jul 04, 2025 12:20 (IST)

Live Update : रत्नागिरी जिल्ह्यातून ४५ एस.टी. बस उद्या पंढरपूरला होणार रवाना

आषाढी वारीसाठी जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने भाविक, वारकरी पंढरपुरात जात असतात. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातीलही भाविक, वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणार असून हजारो भक्तांनी एसटीचं बुकींग केलं आहे. ५ जुलै रोजी सकाळी ६ वाजता रत्नागिरी बसस्थानक व विविध आगारातून तब्बल ४५ एसटी बसेस पंढरपूरला रवाना होणार आहेत. आतापर्यंत ४५ गाड्या बुकींग झाल्या आहेत. वारकऱ्यांची संख्या वाढल्यास आणखी काही बसेस बुकींग होण्याची शक्यता आहे. ९५ चालक-वाहक, एसटीचे एक पथक पंढरपुरात सेवा बजावणार असल्याचं रत्नागिरी एसटी विभागाकडून सांगण्यात आलं आहे..

Jul 04, 2025 12:19 (IST)

Live Update :थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह पुण्यात

थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह पुण्यात 

Jul 04, 2025 12:16 (IST)

Live Update : ठाकरेंच्या मराठी विषयाच्या मोर्चावर विधान परिषदेत परिणय फुके यांची उपरोधिक कविता

विधान परिषदेत परिणय फुके यांची उपरोधिक कविता 

घरात आईला म्हणणार मम्मी 

मोर्चामध्ये जाणार आम्ही 

कॉन्व्हेंटमध्ये घेणार शिक्षण

मराठीचं करणार रक्षण 

सुट्टीसाठी आहे युरोप 

दुसऱ्यांवर करणार आरोप 

सत्तेसाठी वेगळे झालो 

आता सत्तेसाठी एकत्र आलो 

लाथाडले जनतेने 

आता काय करतील कोण जाणे 

हिंदुत्वाचे कधी दुकान
कधी प्यारे टिपू सुलतान 

कास मराठीची धरली
निवडणुकीत केम छो वरळी 

धारावीत दाखवला रुबाब
लुंगी बहादूर छोटे नवाब 

भारत भर भाराबर चिंध्या 

एक ना धड अस्तित्वाची धडपड 

बुडाखालून गेल्या खुर्च्या म्हणून मराठीचा मोर्चा 

मोडीत काढला ठाकरे ब्रँड आता चहू बाजूने वाजला बँड

Jul 04, 2025 12:04 (IST)

Live Update : पुण्याच्या कोंडवा परिसरात मनसेचे आंदोलन..

पुण्याच्या कोंडवा परिसरात मनसेचे आंदोलन..

महिलेवर झालेल्या बलात्काराविरोधात मनसैनिकांचा संताप

Jul 04, 2025 12:04 (IST)

Live Update : पुण्याच्या कोंडवा परिसरात मनसेचे आंदोलन..

पुण्याच्या कोंडवा परिसरात मनसेचे आंदोलन..

महिलेवर झालेल्या बलात्काराविरोधात मनसैनिकांचा संताप

Jul 04, 2025 11:53 (IST)

Live Update : विधानसभेत वनमंत्र्यांची महत्त्वाची माहिती, 2022 ते 2024 कालावधीत 107 वाघांचा मृत्यू

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू

जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात 21 जणांचा मृत्यू

2022 ते 2024 या कालावधीत 107 वाघांचा मृत्यू

तर मागील चार महिन्यांत २२ वाघ, ४० बिबट्यांचा मृत्यू

वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती

Jul 04, 2025 11:41 (IST)

Live Update : गोदावरी नदी पात्रात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

गोदावरी नदी पात्रात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह

- दसक घाटावरील गोदावरी नदीपात्रातील महिलेचा मृतदेह रेस्क्यू ऑपरेशनने काढला बाहेर

- नदी पात्रात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली 

- मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम नाशिकरोड पोलिसांकडून सुरू

- मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्याकरिता अग्निशामक दलाने केले रेस्क्यू

- महिलेचा मृत्यू घात की अपघात याबाबतचा तपास नाशिक रोड पोलिसांकडून सुरू

Jul 04, 2025 10:55 (IST)

Live Update : नाशिकमध्ये यंदा पावसाने दमदार सलामी दिल्याने जिल्ह्याचा धरणसाठा 61 टक्क्यांवर

नाशिकमध्ये यंदा पावसाने दमदार सलामी दिल्याने जिल्ह्याचा धरणसाठा 61 टक्क्यांवर गेला आहे. इगतपुरी तालुक्यातील भावली धरण ओव्हरफ्लो झाले आहे तर जिल्ह्यातील 5 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे विशेष म्हणजे नाशिकच्या पावसामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला असून पाण्यावरून होणारा नाशिक विरुद्ध मराठवाडा संघर्षही यंदा मिटण्याची चिन्ह आहेत. कारण नाशिकहून 1 जूनपासून ते आजपावेतो नांदूरमध्यमेश्वर बंधारा आणि अहिल्यानगर मार्गे 14.152 टीएमसी पाणी जायकवाडी धरणाकडे झेपावले आहे, यामुळे जायकवाडी धरणाचा पाणीसाठी 45.56 टक्के झाला असून गेल्यावर्षी तो केवळ 4.40 टक्के इतका होता.. 

Jul 04, 2025 10:14 (IST)

Live Update : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

Jul 04, 2025 10:13 (IST)

Live Update : पुण्यातील धायरी फाट्याजवळ ट्रॅफिक जाम

पुण्यातील धायरी फाट्याजवळ ट्रॅफिक जाम 

गेल्या १ ते दिड तासापासून पूर्णपणे ट्रॅफिक जाम 

पुण्यातील केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले होते त्यामुळे झाल्याच प्राथमिक माहिती 

एक रुग्णवाहिका देखील या वाहतुककोंडीत अडकली

Jul 04, 2025 10:13 (IST)

Live Update : पुण्यातील धायरी फाट्याजवळ ट्रॅफिक जाम

पुण्यातील धायरी फाट्याजवळ ट्रॅफिक जाम 

गेल्या १ ते दिड तासापासून पूर्णपणे ट्रॅफिक जाम 

पुण्यातील केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले होते त्यामुळे झाल्याच प्राथमिक माहिती 

एक रुग्णवाहिका देखील या वाहतुककोंडीत अडकली

Jul 04, 2025 10:09 (IST)

Live Update : विधानसभेच्या विशेष बैठकीला काही मंत्री आणि काही सदस्य उपस्थित नसल्याने लक्षवेधी पुढे ढकलण्याची वेळ

विधानसभेच्या विशेष बैठकीला काही मंत्री आणि काही सदस्य उपस्थित नसल्याने लक्षवेधी पुढे ढकलण्याची वेळ

पणनमंत्री जयकुमार रावल सभागृहात उपस्थित नसल्याने भाजपचे आमदार कृष्णा खोपडेंनी व्यक्त केली नाराजी

पहाटे लवकर उठून लक्षवेधी मांडण्यासाठी आलो,पण मंत्री उपस्थित नसल्याने व्यक्त केली नाराजी

तर दुसरीकडे लक्षवेधी मांडणारा सदस्य उपस्थित नसल्याने समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनीही व्यक्त केली नाराजी

रात्री उशिरा समजले की स्पेशल सिटींग आहे, त्यासाठी लवकर उठून आलो,परंतु सदस्यच उपस्थित नाहीय. त्यामुळं अधिका-यांसह सर्वांचा वेळ वाया जात असल्याचे शिरसाट यांनी सांगत नाराजी व्यक्त केली

Jul 04, 2025 08:45 (IST)

Live Update : राजस्थानमधून पुण्यात ड्रग्स तस्करी

राजस्थानमधून पुण्यात ड्रग्स तस्करी 

राजस्थानच्या जोधपूरमधून अमली पदार्थ आणून पुण्यात विक्री करणाऱ्या तरुणाला पुणे पोलिसांकडून अटक 

पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई 

13 लाख रुपयांचे मेफेड्रॉन पुणे पोलिसांनी केले जप्त 

सुनील बीश्राराम चौधरी असं अटक केलेल्या परप्रांतीय तरुणाचं नाव

पुण्यातील खडीमशीन चौकात असणाऱ्या एका गॅस गोडाऊनमध्ये तरुण करत होता काम

Jul 04, 2025 08:44 (IST)

Live Update : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 2 जणाचा जागीच मृत्यू तर उपचारादरम्यान आणखी दोन जण दगावले

समृद्धी महामार्गावर वाशिमच्या वनोजा कारंजा दरम्यान चॅनल क्रमांक 215 वर पुण्यावरून नागपूरच्या उमरेडला जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झालाय.. नागपूर कॉरिडॉरवर वाहन चालकाचे आर्टीगा कारवरील नियंत्रण  सुटल्याने   गाडी डिव्हायडरला धडकून अपघात झालाय. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, वाहनातील 1 जन गंभीर जखमी झाले आहेत. यात वैदीही जयस्वाल आणि माधुरी जयस्वाल यांचा जागीच मृत्यू झाला तर संगीता जयस्वाल राधेश्याम जयस्वाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे  चेतन जयस्वाल हे 1 जण गंभीर जखमी  आहेत.जखमींना वाशिम इथं उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Jul 04, 2025 08:43 (IST)

Live Update : बारावीच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

12 वीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लातूर शहरातील बार्शी रोडवरील कोर्ट कॉलनी येथे घडल्याचे समोर आले आहे.  निलंगा तालुक्यातील तुपडी गावचा गोवर्धन जाधव ( वय 17) लातूरच्या महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकत होता. त्याने कोर्ट कॉलनीतील भाडयाच्या खोलीत छताला असलेल्या कडीला गळफास लावून आत्महत्या केली आहे. एमआयडीसी घटना स्थळी हजर होत फास काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी गोवर्धनचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले. त्याला निलंग्याला शिकायचे होते मात्र वडिलांचा अट्टहास लातूरला शिक असा होता. अशी माहिती पोलीसांकडून मिळत आहे.