3 minutes ago

Maharashtra Assembly Monsoon Session LIVE: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. पहिल्यादिवशी कामकाज लवकर आटोपल्याने आजपासून अधिवेशनाचे नियमित कामकाज 11 वाजता सुरु  होणार आहे. आज अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा होईल. जितेंद्र आव्हाड मुंब्रा येथे धावत्या लोकांमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाला तो मुद्दा उपस्थित करणार आहेत. तसेच राज्यात इतर ठिकाणी अपघात होत आहेत त्यावर बोलतील. तसेच अजय चौधरी आणि भास्कर जाधव नागपूर मधील बोगस शिक्षक भरती मुद्दा उपस्थित करतील. मावळमधील पूल दुर्घटनेचा मुद्दा विधानसभेत रोहित पवार जितेंद्र आव्हाड मांडतील. तसेच आज भारतीय जनता पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा होईल. 

Jul 01, 2025 14:48 (IST)

LIVE updates: बोरीवलीमध्ये भीषण अपघात, दोन तरुणांचा मृत्यू,

गोराई परिसरातील वैराल तलावाजवळील हिल व्ह्यू हॉटेलजवळ आज सकाळी दुर्दैवी अपघात घडला असून यामध्ये दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून एक युवक गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार हे तीन युवक सायन-कोळीवाडा परिसरातील रहिवासी असून पिकनिकसाठी गोराई परिसरात आले होते. त्यांनी मद्यप्राशन केलेले असल्याची माहिती मिळाली असून, तिघेही ट्रिपल सीटने दुचाकीवरून प्रवास करत असताना त्यांची दुचाकी तलावाजवळील पाण्यामुळे घसरून अपघातग्रस्त झाली.

Jul 01, 2025 14:45 (IST)

LIVE Updates: नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापले, उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख आणि उपनेत्यांवर दरोडा, दंगा घडवणे अशा गंभीर कलमांअंतर्गत गुन्हे दाखल झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून हे सर्व राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी केला आहे. नाशिकमधील एका सामाजिक कार्यकर्त्याने भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनूसार उपनेते सुनिल बागुल यांच्या सांगण्यानूसार महानगरप्रमुख मामा राजवाडे आणि कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केली. फेसबुकवर सुनिल बागुल यांच्याविरोधात केलेल्या एका पोस्टमुळे हा सर्व वाद झाला होता.

Jul 01, 2025 14:44 (IST)

LIVE Updates: लक्षवेधी चर्चेदरम्यान अनिल परब यांनी संजय राठोड यांना दिले आव्हान

मृद व जलसंधारण विभागाकडे १६००० पदाची मंजुरी असताना फक्त ८००० पद आहे. मृदा व जलसंधारण मंत्र्यांवरती वित्त विभाग वरवंटा फिरवत आहे. 

यावरून मंत्र्यांची हतबलता दिसून येते. ज्यावेळी यांचे नेते मुख्यमंत्री होते त्यावेळी विठ्ठल भागाने का मान्यता दिली नाही. 

तुम्ही दररोज बाहेर कॅमेऱ्यावर स्वाभिमानाच्या गोष्टी सांगत असतात

 मंत्री जर इतके हदबल असेल. तर जर अतिरिक्त कर्मचारी बळ मिळत नसेल तर राजीनामा देण्याचा स्वाभिमान दाखवा.

Jul 01, 2025 14:39 (IST)

LIVE Updates: कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेस नेते कुणाल पाटील यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश होत आहे. रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. 

Advertisement
Jul 01, 2025 12:55 (IST)

Maharashtra Assembly Session LIVE: पिकनिक स्पॉटवरील अशा पुलांचे ऑडीट होणार का? शिवेंद्रराजे भोसलेंचे उत्तर

पर्यटक जातात तिथे जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट होणार का ?

पिकनिक स्पॉटवरील अशा पुलांचे ऑडीट होणार का ?

ऑडीटमध्ये पूल कमकुवत आढळले तर उपाययोजना करणार का ?

पिकनिक स्पॉटवर अपघात घडू नये यासाठी काय उपाययोजना करणार 

शिवेंद्रराजे भोसले-  हा लोखंडी पूल धोकादायक बनला होता. तो वापरू नये असे फलक लावले होते. मात्र तरीही पर्यटक या परीसरात येत होते.  पुलावर पर्यटक आल्याने पूल कोसळला. दुर्दैवाने 4 जणांचा त्यात मृत्यू झाला, ही बाब गंभीर आहे. 

पीडब्लूडीच्या अंतर्गत 16395 पूल आपल्याकडे आहेत. सद्यस्थितीत राज्यातील 4 पूल अत्यंत धोकादायक आहेत, त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे नियोजन सुरू आहे. 8 पुलांचे ऑडीट आमच्या हाती यायचे आहे, त्याबद्दलचा निर्णय अहवाल आल्यावर मिळेल. दुरुस्ती करणे अथवा नवा पूल बांधणे याबद्दलचे नियोजन केले जाईल.

Jul 01, 2025 11:59 (IST)

LIVE Updates: ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला

शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात शेतकरी आक्रमक

मोहोळ-पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला 

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांचे मोहोळ शहरात आंदोलन   

वारीच्या काळात अत्यंत महत्वपूर्ण असलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखल्याने वाहनांची मोठी गर्दी 

‘शेतकऱ्यांची मागणी नसताना शक्तीपीठ महामार्ग करण्याचा हट्ट का होतोय?‘ 

’राज्याची आर्थिक स्थिती नसताना हजारो कोटी रुपयांचा कशासाठी?’  

सोलापुरात शक्तिपीठ रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भूमिका

Advertisement
Jul 01, 2025 11:35 (IST)

LIVE Updates: शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध; औरंगाबाद-लातूर मार्ग ठप्प

बर्दापूर फाट्यावर संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत औरंगाबाद-लातूर महामार्ग बंद केला. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची जोरदार मागणी करत शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन छेडलं. या महामार्गामुळे आमच्या शेतजमिनी जाणार आहेत. यामुळे आमचे जीवन उद्ध्वस्त होईल, असा आरोप करत आंदोलक शेतकरी आक्रमक झाले. मोठ्या पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक ठप्प झाली आहे. शासनाने आमच्या मागणीकडे तातडीने लक्ष द्यावं, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

Jul 01, 2025 11:13 (IST)

LIVE Updates: महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यावर तीघांची सदस्य म्हणून नियुक्ती 

दिलीप भुजबळ , राजीव निवतकर, महेंद्र वारभुवन यांची सदस्य म्हणून नियुक्ती

Advertisement
Jul 01, 2025 10:05 (IST)

LIVE Update: गजनी सरकार, विसरभोळा कारभार.. रोहित पवार यांची पोस्टरबाजी

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.  गजनी सरकार, विसरभोळा कारभार  असे पोस्टर हातात घेऊन आमदार रोहित पवार विधान भवनात पोहोचले आहेत. 

Jul 01, 2025 08:58 (IST)

LIVE Updates: मुलीवरील लैंगिक छळ प्रकरण; दोन्ही आरोपींना आज पुन्हा न्यायालयात केले जाणार हजर

बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन प्राध्यापकांकडून लैंगिक छळ करण्यात आला होता. यामध्ये दोन्ही आरोपी अटक करण्यात आल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी आज संपत असल्याने आरोपींना दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडीत रवानगी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jul 01, 2025 08:47 (IST)

LIVE Updates: खडकवासला धरणातून विसर्गात मोठी वाढ, १४०० क्यूसेक्सने मुठा नदीत विसर्ग सुरू

खडकवासला धरणातून विसर्गात मोठी वाढ : 

सकाळपासून १४०० क्यूसेक्सने मुठा नदीत विसर्ग सुरू

खडकवासला धरणाच्या सांडव्यातून मुठा नदी पात्रात सुरू असणाऱ्या विसर्गात आज सकाळपासून मोठी वाढ करण्यात आली आहे. 

सकाळी ७.०० वाजल्यापासून विसर्गाचे प्रमाण ३४० क्यूसेक्सवरून थेट १४०० क्यूसेक्स इतके वाढवण्यात आले आहे.

पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या वहावावरून विसर्गात पुन्हा बदल होण्याची शक्यता असून, तो कमी किंवा अधिक होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ही माहिती मुठा कालवे पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता श्री. मोहन शां. भदाणे यांनी दिली आहे.

Jul 01, 2025 07:24 (IST)

LIVE Updates: माजी आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्यकर्त्यांची दोन खटल्यात निर्दोष मुक्तता

माजी आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्यकर्त्यांची दोन खटल्यात निर्दोष मुक्तता

करली नदीच्या पात्रात एका अनोळखी व्यक्तीने घेतली उडी पोलीस तपास सुरू

बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मालवण पोलीस निरीक्षकांची भेट

बांदा येथे स्मशानभूमीतील कचऱ्यामुळे रोगराई पसरण्याची भीती

आमदार दीपक केसरकर यांच्या इशाऱ्यानंतर सावंतवाडीत वीज यंत्रणा अलर्ट

कळणे दोडामार्ग येथील युवकाकडून पेडणेतील विद्यार्थ्यावर ऍसिड हल्ला

राज्य सरकारचा हिंदी सक्तीचा निर्णय रद्द बांदा शहरात मनसे ठाकरे सेनेकडून जल्लोष

Jul 01, 2025 06:24 (IST)

LIVE Updates: ठाणे स्टेशन परिसरात मराठी तरुणाला मारहाण

ठाणे स्टेशन परिसरात मराठी तरुणाला मारहाण

परप्रांतीयांकडून ही अमानुष मारहाण 

मोबाईल दुकानातील धक्कादायक प्रकार 

स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ अस

Jul 01, 2025 06:24 (IST)

LIVE Updates: पुणे सोलापूर महामार्गावर अमोनिया वाहतूक करणारा टँकर पलटला

इंदापूरच्या बाह्यवानावर सोलापूरच्या दिशेने निघालेला लिक्विड अमोनियम वाहतूक करणारा टँकरचा अपघात झालाय. पुणे सोलापूर महामार्गावरती व्यवहारे पेट्रोलियमच्या समोर हा अपघात झालाय.आज सकाळी पहाटे तीन वाजताच्या सुमारास  हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे... या घटनेत टँकर मधील एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत असून त्याला उपचार कामी इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. या अपघाताचं निश्चित कारण समोर आलं नाही.

Jul 01, 2025 06:23 (IST)

Maharashtra Live Updates: विधानसभा कामकाज 11 वाजता सुरु होणार

विधानसभा कामकाज 11 वाजता होणार आहे. 

महत्वाचे खालचे मुद्दे असतील 

जितेंद्र आव्हाड मुंब्रा येथे धावत्या लोकांमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाला तो मुद्दा उपस्थित करणार आहेत. तसेच राज्यात इतर ठिकाणी अपघात होत आहेत त्यावर बोलतील 

अजय चौधरी आणि भास्कर जाधव नागपूर मधील बोगस शिक्षक भरती मुद्दा उपस्थित करतील

मावळ मधील पूल दुर्घटनेचा मुद्दा विधानसभेत रोहित पवार जितेंद्र आव्हाड मांडतील