34 minutes ago

मुंबई-गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी बारा जिल्ह्यांमधील शेतकरी, शेतमजुर आणि ग्रामस्थांचा मोर्चा आज सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेच्या दरम्यान आझाद मैदान मुंबईमध्ये विधानसभा अधिवेशनाच्या दरम्यान होणार आहे. आंदोलनामध्ये विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी, आमदार आदित्य ठाकरे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, आमदार रोहित पाटील, आमदार जयंत आसगावकर, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.

Mar 12, 2025 19:48 (IST)

Live Update : पाकिस्तानमध्ये हायजॅक करण्यात आलेल्या रेल्वेची सुटका

पाकिस्तानमधील बलूचिस्तान प्रांतामध्ये हायजॅक करण्यात आलेल्या रेल्वेची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये सर्व अतिरेकी मारले गेले आहेत, अशी माहिती पाकिस्तान सैन्यातील सूत्रांनी दिली आहे. बलूचिस्तानमधील बोलन जिल्ह्याच्या जवळ जाफर एक्स्प्रेस ही रेल्वे बलोच लिबरेशन आर्मीनं (बीएलए) हायजॅक केली होती. या संघटनेनं या प्रकरणाची जबाबदारी घेतली होती. 

Mar 12, 2025 18:16 (IST)

Live Update : 150 कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी KDMC आक्रमक

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 150 कोटी मालमत्ता कर वसूल होणे बाकी आहे. यासाठी केडीएमसीकडून अभय योजनेची मुदत वाढविण्यात आली आहे. मात्र तरी काही लोक जे मालमत्ता कर भरत नाहीत. अशा लोकांच्या विरोधात केडीएमसीने कारवाई सुरु केली आहे. केडीएमसीच्या दहा प्रभागापैकी प्रत्येक प्रभागातील १०० ते १५० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत अशी माहिती केडीएमसीचे अतिरीक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी दिली आहे.

Mar 12, 2025 16:06 (IST)

Live Update : स्वारगेट प्रकरणातील आरोपीच्या कोठडीत वाढ

पुण्यातील स्वागरेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्याच्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी दत्ता गाडेच्या कोठडीत वाढ झाली आहे. गाडेला 26 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला आज पुण्यातील कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळी न्यायालयानं त्याच्या कोठडीत वाढ केली आहे. 

Mar 12, 2025 14:35 (IST)

Pune News: गजा मारणेची सांगली कारागृहात रवानगी

मोका अंतर्गत कारवाई झालेला पुण्याचा कुख्यात गुंड गजा म्हारने याचे सांगली कारागृहात रवानगी

चार दिवसापूर्वी गजा मारणे याची पुणे पोलिसांनी सांगली कारागृहात केली रवानगी

मोका लावल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव गजा मारणे यांना सांगली कारागृहात ठेवण्याचा निर्णय 

गजा मारणे सध्या सांगली कारागृहात

सुरक्षेच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रातील जेलपोलीस यंत्रणानाही जेलमध्ये तैनात

गजा मारणे सध्या सांगली कारागृहातील सेंट्रल बँरॅक मध्ये 

मारणे सांगली कारागृहात दाखल होताच सुरक्षा व्यवस्था ही वाढवली

Advertisement
Mar 12, 2025 13:35 (IST)

Solapur News: माळशिरसमधील तरुणाची नग्न करून क्रूर हत्या

बीड मधील मारहाणीच्या हत्येचा क्रूर पॅटर्न सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मध्ये येऊन पोहोचला आहे. माळशिरस मध्ये एका तरुणाला नग्न करून चटके देऊन त्याची निर्गुण हत्या झाल्याची घटना पुढे आली आहे. अनैतिक संबंधातून तरुणाची क्रूर हत्या झाल्याने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे. 

Mar 12, 2025 13:30 (IST)

Mumbai News: शक्तीपीठ महामार्गाविरोधात एल्गार, 12 जिल्ह्यातील शेतकरी आझाद मैदानात

शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणुन 12 जिल्हातील शेतकर्यांचा मोर्चा आझाद मैदानात. आमदार सतेज पाटील, राजू शेट्टी आंदोलन स्थळी दाखल. शक्तीपीठ महामार्ग हा शेतकर्यांच्या मुळावर उठणारा, त्यामुळे नहामार्ग रद्द झाला पाहिजे ही शेतकर्यांची मागणी

Advertisement
Mar 12, 2025 13:28 (IST)

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट

मागील काही दिवसांपासुन जिल्ह्याच्या तापमानात कमालीची वाढ झाली असून चंद्रपूर जिल्ह्यात आज आणि उद्या हवामान खात्याने उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून पुरेसे पाणी पिणे, शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखणे ,घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी टोपी -रुमाल -छत्रीचा वापर करणे व दुपारी बारा ते चार दरम्यान घराबाहेर जाणे टाळण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. परंतु दिवसभर सिग्नल वर आपल कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसानसाठी प्रशासनांकडून कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.

Mar 12, 2025 13:27 (IST)

Kopargaon Accident: कोपरगावमध्ये हिट अँड रन, स्कॉर्पिओने महिलेला चिरडले

कोपरगाव तालुक्यातील मुंबई-नागपूर महामार्गावर एका मद्यधुंद स्कॉर्पिओ चालकाने मोठा प्रताप केला असून त्याने भरधाव स्कॉर्पिओ चालवत एका मोटारसायकला जोराची धडक देत स्कॉर्पिओ एका स्टॉलमध्ये घुसवली आहे.  या झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील एक महिला मयत झाली असून दोन अन्य जण जखमी झाले आहे तर स्टॉलचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. सुनंदा सुदाम साबळे वय 63 वर्षे रा. संवत्सर ता. कोपरगाव असे मयत महिलेचे नाव असून हिराबाई वसंतराव साबळे व  सुदाम काशिनाथ साबळे दोन्ही रा. संवत्सर ता. कोपरगाव हे जखमी झाले आहे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Advertisement
Mar 12, 2025 13:25 (IST)

Latur Accident: लातुरमध्ये भीषण अपघात, पती- पत्नी जखमी

लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पाटी येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरील विश्वनाथ केशव काटे वय 55 वर्ष आणि त्यांच्या पत्नी सुनंदा विश्वनाथ काटे वय 45 वर्ष या शिवणखेड या गावावरून आष्टामोड कडे जात असताना नांदगाव पाटी इथ कारची दुचाकीला धडक लागल्याने दुचाकीवरील विश्वनाथ काटे याचा मृत्यू झाला आहे.. मृतदेह शवविच्छेदनासाठी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mar 12, 2025 11:19 (IST)

Pune News: पुण्यात हिट अँड रन.. भरधाव कारने दुचाकीसह 3 पदाधिकाऱ्यांना चिरडलं

राजगुरुनगर भिमाशंकर मार्गावर डॉक्टरकडुन हिट अँण्ड रन चा थरार..

भरधाव वेगाने आलेल्या कारने तीन दुचाकींसह पदचा-यांना चिरडलं..

चालक मद्यपान करुन कार लावलत असल्याचा स्थानिकांचा आरोप

पदचारी नागरिकांना धडक दिल्यानंतर तीन दुचाकींना कारची धडक 

पाच जण गंभीर जखमी जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

कार अपघातातील चालक दारुच्या नशेतील व्यक्ती डॉक्टर असल्याची प्राथमिक माहिती..

Mar 12, 2025 10:27 (IST)

Saswad Road Traffic: पुणे सासवड रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी

पुणे सासवड रस्त्यावर ट्रक बंद पडल्याने पुणे- सासवड रस्त्यावर चार किलोमीटरच्या लागल्या रांगा

सासवड रोड वर किरकोळ कारणामुळे झाल्याने ट्रॅफिक जाम

सासवड रस्त्यावरील एसपी इन्फोटेक कंपनीच्या समोर धान्याचा ट्रक पडला बंद 

बंद ट्रकमुळे सासवडला जाणाऱ्या वाहनांची मोठी वाहतूक कोंडी

चार किलोमीटर लागल्या वाहनाच्या रांगा

गेल्या दोन तासापासून भर रस्त्यात ट्रक बंद पडल्याने प्रवाशांचे मोठे हाल

Mar 12, 2025 10:26 (IST)

Pune News: विज बिल न भरणाऱ्या ग्राहकांना दणका! 51 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत

पुण्यातील विज बिल न भरणाऱ्या ग्राहकांना दणका

पुणे महावितरणकडून 51 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत 

महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे 310 कोटी 84 लाख रुपयांची थकबाकी 

थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून एका महिन्यात 51 हजार 735 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे

तर यामध्ये थकबाकीदार विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरोधातही भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135/138 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही महवितरणकडून कळविण्यात आले

Mar 12, 2025 10:24 (IST)

Swargate News: ऐन मध्यरात्री स्वारगेट बस स्थानकातील वीज गायब

ऐन मध्यरात्री स्वारगेट बस स्थानकातील वीज गायब

डेपो काळोखात, महिला प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

स्वारगेट डेपो प्रशासनाचे डोळे कधी उघडणार?

पुण्याच्या स्वारगेट डेपोत अजुनही दिव्याखाली अंधार

स्वारगेट डेपोतील काळ्या कुट्ट अंधारात एसटी प्रवाशांचे हाल

काल मध्यरात्री बसस्थानकातील वीज झाली होती गायब

स्वारगेट बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच असा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जातोय

Mar 12, 2025 09:32 (IST)

Bhandara News: पाणीपुरी महागात पडली, तीस जण रुग्णालयात दाखल

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सुकळी (दे.) येथे एका समारंभात  पाणीपुरीतुन तब्बल तीस लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले. परिणामी, येथील महिला, पुरुष व लहान बालकांना उलटीचा त्रास सुरू झाला. विषबाधा झालेल्या रुग्णांना प्रथम बेटाळा व देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींना आंधळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलीये.

Mar 12, 2025 08:26 (IST)

Maharashtra Politics: वर्ध्यात विधानपरिषद निवडणुकीचे वातावरण तापले, 2 नावांची चर्चा

वर्ध्यात विधानपरिषद निवडणुकीचे वातावरण तापले

जिल्ह्यातून दादाराव केचे व सुधीर दिवे या दोन नावांची चर्चा

आमदार दादाराव केचे यांचे नाव विधानपरिषदेसाठी जवळपास निश्चित

तर सुधीर दिवे यांच्या नावाच्या शिफारशी साठी शिष्टमंडळाने घेतली नितीन गडकरी यांनी भेट

विधानसभा निवडणुकीत अमित शहा यांनी दादाराव केचे यांना अश्वशीत केले होते,पण दादाराव केचे यांच्यावरकाही आरोप झाल्याने दादाराव केचे यांनी संन्यास जाहीर केला होता.

आता दादाराव केचे की सुधीर दिवे कोणाला संधी मिळणार हे पाहणे गरजेचे

Mar 12, 2025 08:25 (IST)

Pune News: स्विमींग पूलमध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू , पुण्यातील घटना

पुण्यातील धायरी भागात स्विमींग पूलमध्ये पडून  चिमुकल्याचा मृत्यू 

धायरी भागातील पार्क व्हिव सोसायटी मधील घटना 

सोसायटीमध्ये  मित्रांसोबत खेळताना स्विमींग पूल मध्ये पडून ६  वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू 

निनाद गोसावी (वय ६ वर्ष) अस मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव

काल संध्याकाळी आठ वाजता घडली घटना 

हा चिमुकला सोसायटीच्या आत मध्ये अनेक वेळ खेळत होता, मात्र बराच वेळ झाल्यानंतर चिमुकला घरी परतला नसल्यामुळे चिमुकल्याची शोधा शोध सुरू झाली आणि तब्बल दोन तासानंतर तो चिमुकला स्विमिंग पूल मध्ये अवस्थेत आढळला

Mar 12, 2025 07:48 (IST)

Holi News: जळगाव शहरातील 14 उपद्रवींवर 3 दिवसांसाठी हद्दपारची कारवाई

धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील 14 उपद्रवींवर 3 दिवसांसाठी हद्दपारची कारवाई 

महापालिकेत अनुकंप तत्वावर 20 जणांचा सेवेत समावेश 

पाचोरा जवळील परधाडे रेल्वे अपघातातील 5 मयतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत 

बौद्ध धर्माचे उपासक भंते एन. सुगतवंस यांचे निर्वाण, अंत्यसंस्कारासाठी श्रीलंकेचा देशभरातून बौद्ध उपासकांची उपस्थिती 

जिल्हा पोलीस दलाकडे महापालिकेची 8 कोटी पेक्षा जास्त वृक्ष करायची थकबाकी , पोलीस विभागाकडून वृक्ष करावर आक्षेप 

चाळीसगाव छत्रपती संभाजी नगर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी 

एरंडोल तालुक्यातील 1480 शेतकरी ठिबक अनुदानापासून वंचित

Mar 12, 2025 07:47 (IST)

Pune News: पुणे शहराचा पाणी पुरवठा अजूनही विस्कळितच

पुणे शहराचा पाणी पुरवठा अजूनही विस्कळितच

शहरातील विविध भागात अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण 

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले 

शहरातली एरंडवणे, कर्वेनगर, डीपी रस्ता पटवर्धन बाग, विधी महाविद्यालय रस्ता, पौड फाटा, भांडारकर रस्ता, जनवाडी, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, शिवाजीनगर, धायरी, धायरी फाटा, गुरुवार पेठ, रविवार पेठ यासह अन्य पेठा, या भागात पाणी पुरवठा कमी होत आहे

नागरिकांच्या तक्रारी मात्र पालिकेचे दुर्लक्ष

Mar 12, 2025 07:44 (IST)

Hingoli Accident: हिंगोलीत भीषण अपघात, मनसे जिल्हाध्यक्षाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली - औंढा राज्य मार्गावरील लिंबाळा मक्ता भागात रात्रीच्या सुमारास कार आणि पीकअपचा भीषण अपघात झालाय, या भीषण अपघातात कार मधून प्रवास करणाऱ्या मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य घुगे यांचा जागीच मृत्यू झाला आहे,  तर एक जण गंभीर जखमी झाला आहे, हा अपघात इतका  भीषण होता की कारचे इंजिन कार मधून बाहेर पडलेय, तर या अपघातातील जखमीना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले आहे....

Mar 12, 2025 07:10 (IST)

Live Update : पालघर महसूल विभागाच्या भरारी पथकातील आणखी दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

खडी वाहतूक करणाऱ्या ट्रक अडवून मालकांकडून दोन लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भरारी पथकावर काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती.  यावेळी भरारी पथकातील दोन पोलिस कर्मचारी आणि एक खासगी इसमाला ACB ने अटक केली होती,  तर भरारी पथकाचे प्रमुख असलेले शुल्क निरीक्षक मारोती सूर्यवंशी आणि अव्वल कारकून मिथुन चौधरी हे  घटनास्थळावरून पसार झाले होते. मात्र या लाचखोरी प्रकरणाच्या तपासात मारोती सूर्यवंशी आणि मिथुन चौधरी या दोन्ही अधिकाऱ्यांचा सहभाग उघड झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल केला आहे. 

Mar 12, 2025 07:09 (IST)

Live Update : चांदवडच्या विद्यार्थ्यांनी बनवली हायब्रीड कार..

नाशिकच्या चांदवड येथील SNJB पॉलिटेकनिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोलर व इलेक्ट्रिकवर चालणारी अफलातून हायब्रिड कार तयार केली आहे. यासाठी त्यांनी आपलीच जुनी कार वापरली आहे. खराब झालेले  पार्ट बदलून मोटर बॅटरी आणि रूफवर सोलरची सिस्टम बसवली आहे. विद्यार्थ्यांनी बनविलेली या अफलातून कारची प्राध्यापकांनीही ट्रायल घेतली. शेतकरी कुटुंबातील ओम निंबाळकर, ओमकार कोकणे, वेदांत दांडेकर, शुभम थापाले या विद्यार्थ्यांनी या अनोख्या कारची निर्मिती केलीय.