Raj Thackeray: 'कोण तू रे कोण तू...', शिवाजी पार्कवर गाजली राज ठाकरेंची सुंदर कविता

बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना उद्देशून लिहलेलं आहे.. ते म्हणतात की कोण आहेस तू? असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहलेली सुंदर कविता वाचली. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई:  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनासह मराठी भाषा दिनी दिग्गजांचे काव्यवाचनही रंगणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे,  ज्येष्ठ गायिका आशा भोसले, जावेद अख्तर, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, आशुतोष गोवारीकर, अभिजित जोशी, शर्वरी वाघ नागराज मंजुळे, विजय दर्डा, भरत दाभोळकर, गिरीश कुबेर, पराग करंदीकर, महेश मांजरेकर, लक्ष्मण उतेकर, आदी दिग्गज मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित असून सर्व जण आपल्या कार्यक्रमाची कविता वाचणार आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या धमाकेदार भाषणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. मी आज भाषण करणार नाही कारण माझे भाषण गुढीपाढव्याला आहेच. आज मराठी भाषा गौरव दिन. सरकारने जाहीर केला होता पण सरकारच्याही लक्षात नव्हतं की हा दिन साजरा करावा. इथे सर्वजण मराठी कविता म्हणणार आहेत.

भाषा ही खूप महत्त्वाची आहे, कविता महत्त्वाच्या आहेत. येणाऱ्या पिढ्यांनी वाचायला हवं. आपल्या कविंनी काय काय लिहलेलं आहे, ते पाहायला हवं.  आज मी जे काव्य म्हणणार आहे ते तुम्ही ऐकलेल नसेल.. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना उद्देशून लिहलेलं आहे.. ते म्हणतात की कोण आहेस तू? असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहलेली सुंदर कविता वाचली. 

नक्की वाचा - Pune Shivshahi Crime : पीडितेच्या शरीराचे लचके तोडत राहिला; पहाटे नेमकं काय घडलं? तरुणीच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक खुलासा

Advertisement

कोण तू रे कोण तू?

कालिकेचे खड तू? की इंदिरेचे पद्म तू?
जानकीचे अश्रु तू? की उकळता लाव्हाच तू?
खांडवातिल आग तू? की तांडवातिल त्वेष तू?
वाल्मिकीचा श्लोक तू? की मंत्र गायत्रीच तू?
भगिरथाचा पुत्र तू? की रघुकुलाचे छत्र तू?


मोहिनीची युक्ती तू? की नंदिनीची शक्ती तू?
अर्जुनाचा नेम तू? की गोकुळीचे प्रेम तू?
कौटिलाची आण तू? की राघवाचा बाण तू?
वैदिकाचा घोष तू? की नितीचा उद्घोष तू?
शारदेचा शब्द तू? की हिमगिरी निःशब्द तू?
की सतीचे वाण तू? वा मृत्यूला आव्हान तू?
शंकराचा नेत्र तू? की भैरवाचे अस्त्र तू?

Advertisement

की ध्वजाचा रंग तूं ? वा बुद्धिचा श्रीरंग तू?
कर्मयोगी ज्ञान तूं? की ज्ञानियांचे ध्यान तू?
चंडिकेचा क्रोध तू? की गौतमाचा बोध तू?
तापसीचा वेष तू ? की अग्निचा आवेश तू?
मयसभेतिल शिल्प तू? नवसृष्टिचा संकल्प तू?
द्रौपदीची हाक तू? प्रलंकराचा धाक तू?
गीतेतला संदेश तू अन् क्रांतिचा आदेश तू?
संस्कृतीचा मान तू अन् आमुचा अभिमान तू
कोण तूं रे कोण तूं.......कोण तू रे कोण तू?

Topics mentioned in this article