जाहिरात

Pune Shivshahi Crime : पीडितेच्या शरीराचे लचके तोडत राहिला; पहाटे नेमकं काय घडलं? तरुणीच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक खुलासा

अद्यापही आरोपीला पकडण्यात आलेलं नाही. आरोपीची माहिती देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून एक लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

Pune Shivshahi Crime : पीडितेच्या शरीराचे लचके तोडत राहिला; पहाटे नेमकं काय घडलं? तरुणीच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक खुलासा

पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवरील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाला. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याची ओळख पटली असून त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी सहा पथकं तैनात करण्यात आली आहे.  

स्वारगेट बस स्टँडवर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडलीय. 26 वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती. आरोपीने तरुणीला बसची चुकीची माहिती देऊन बसमध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. दत्तात्रय गाडे असं फरार आरोपीचं नाव असून त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान पीडित तरुणीचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वैद्यकीय अहवालातून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ससून रुग्णालयाकडून पोलिसांना वैद्यकीय अहवाल सोपविण्यात आला आहे. आरोपीने दोनदा पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. 

Pune Swargate Crime : पुण्यातील बड्या नेत्याचा कार्यकर्ता? पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपीचं भयंकर रुप समोर

नक्की वाचा - Pune Swargate Crime : पुण्यातील बड्या नेत्याचा कार्यकर्ता? पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपीचं भयंकर रुप समोर

गेल्या महिन्यातच पुणे पोलिसांना दिलं होतं पत्र 
पुणे पोलिसांना स्वारगेट आगाराने मागील महिन्यातच एक पत्र दिलं होतं. या पत्रातून स्वारगेट बस डेपोला पोलीस सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली होती. स्वारगेट बस डेपोच्या सुरक्षिततेच्या बाबतीत अनेक गोष्टी बस स्थानक प्रशासनाकडून पोलिसांना सांगण्यात आल्या होत्या. मात्र पुरेसे कर्मचारी नसल्याची तोंडी माहिती स्वारगेट आगाराला सांगण्यात आलं होतं. स्वारगेट बस स्थानकात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने डेपो प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी करण्यात आली होती. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: