Maharashtra SSC Board Exam Online Result Process: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची कमालीची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, मंडळाने निकाल पाहण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी मुख्य संकेतस्थळासह पर्यायी वेबसाईटचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
SSC Result: दहावीचा निकाल 92.09 टक्के! यंदाही मुलींची बाजी; कोणता विभाग अव्वल? वाचा ठळक वैशिष्ट्ये
दहावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार? | Result Website List
https://sscresult.mahahsscboard.in/
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
https://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
https://results.navneet.com
निकाल कसा पाहाल?
निकाल पाहण्यासाठी 'mahresult.nic.in' या पोर्टलवर जा.
तिथे तुम्हाला आईच्या नावाचे पहिले नाव आणि तुमचा रोल नंबर विचारला जाईल.
ही माहिती भरल्यानंतर लगेचच तुम्हाला विषयानुसार मिळालेले गुण पाहता येतील.
यंदा केवळ वेबसाईटवर अवलंबून न राहता 'डिजीलॉकर'चा वापर करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे, जेणेकरून भविष्यातील प्रवेशासाठी गुणपत्रिका सुरक्षित राहील.
SMSद्वारे कसा पाहाल निकाल?
जर वेबसाईट लोड होण्यास वेळ लागत असेल, तर घाबरून न जाता 'sscresult.mkcl.org' किंवा 'results.targetpublications.org' या पर्यायी लिंकचा वापर करावा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एसएमएस सुविधा वरदान ठरणार असून, ५७७६६ वर मेसेज पाठवून अवघ्या काही वेळात निकाल मोबाईलवर प्राप्त होईल.
Mumbai News: मुंबईत BMC अधिकाऱ्यावर विनयभंगाचा आरोप; आझाद मैदान पोलीस ठाण्यात FIR दाखल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world