Maharashtra Board MSBSHSE SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र दहावीचा (इयत्ता 10वी) निकाल समोर आला असून राज्यातील 94.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. यंदा 16,10, 908 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,98,553 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल 1.71 टक्क्यांनी कमी झाला आहे. विशेष म्हणजे यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 98.82% असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 90.78% आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.14 टक्के असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 92.31 टक्के आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 3.83 ने जास्त आहे.
नक्की वाचा - SSC Result Maharashtra Board Today Live Updates : राज्यात यंदा दहावीचा निकाल 94.10 टक्के
10 वी मार्च-एप्रिल 2022 - 96.94
10 वी मार्च 2023 - 93.83
10 वी मार्च 2024 - 95.81
10 वी फेब्रु.-मार्च 2025 - 94.10
कॉपीमुक्त अभियानावर भर...
राज्यात यंदा जोरदार कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले होते. कॉपी मुक्त सप्ताह देखील राज्यात राबवण्यात आला होता. राज्यात एकूण 5130 परीक्षा केंद्र होते. एकूण 37 केंद्रावर घडले होते कॉपी सारखे गैरप्रकार या सर्व केंद्राचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले आहेत.