Maharashtra Board MSBSHSE SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र दहावीचा (इयत्ता 10वी) निकाल आज, मंगळवार 13 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना आपले निकाल शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरुपात पाहता येणार आहे. यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. यंदाच्या परीक्षेत 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये मुलांची संख्या 8,64,120 आणि विद्यार्थिनींची संख्या 7,47,471 इतकी आहे. याशिवाय 19 तृतीयपंथी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.
Live Update : राज्यातील ७९२४ शाळांचा निकाल १०० टक्के
राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.२२ टक्के
तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ९०.७८
राज्यातील ७९२४ शाळांचा निकाल १०० टक्के
तर दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर विभाग ज्यामध्ये ९६.८७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
तिसऱ्या क्रमांकावर मुंबई विभाग ९५.८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण तर पुणे विभाग चौथ्या क्रमांकावर ज्यामध्ये ९४.८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
Live Update : एका विद्यार्थ्याच्या डोक्याला टॉर्च लावून तर दोघांना बसवलं एसी खोलीत
यंदा दहावीच्या परीक्षेदरम्यान एका विद्यार्थ्याला डोक्याला टॉर्च लावून तर दोन विद्यार्थ्यांना एसी खोलीत बसवण्यात आलं होतं. कारण त्यांच्या अंगाला खाज येत होती आणि खाजवलं तर रक्त येत होतं. पहिला विद्यार्थी पुण्याचा आहे उरलेले दोघे मुंबई विभागातील आहे.
Live Update : राज्यात एकूण २११ विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
राज्यात एकूण २११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
पुण्यातील १३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
एकूण २११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
नागपूर ३
संभाजी नगर ४०
मुंबई ८
कोल्हापूर १२
अमरावती ११
नाशिक २
लातूर ११३
कोकण ९
Live Update : राज्यातील 285 विद्यार्थ्यांना मिळाले 35 टक्के गुण
राज्यातील एकूण 285 विद्यार्थी काठावर पास
Live Update : राज्यातील 285 विद्यार्थ्यांना मिळाले 35 टक्के गुण
पुणे ५९
नागपूर ६३
संभाजी नगर २८
मुंबई ६७
कोल्हापूर १३
अमरावती २८
नाशिक ९
लातूर १८
कोकण ०
Live Update : राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वात जास्त निकाल 99.32 टक्के
पुणे
राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वात जास्त निकाल ९९.३२ टक्के
तर गडचिरोली जिल्ह्याचा सर्वात कमी निकाल ८२.६७ टक्के
तर पुणे जिल्ह्याचा निकाल ९७.२६ टक्के
Live Update :राज्यातील एकूण 49 शाळांचा निकाल ० टक्के
राज्यातील एकूण ४९ शाळांचा निकाल ० टक्के
४९ शाळांमध्ये ० टक्के निकाल
पुणे ७ शाळा
नागपूर ८ शाळा
संभाजी नगर ९ शाळा
मुंबई ५ शाळा
कोल्हापूर १ शाळा
अमरावती ४ शाळा
नाशिक ४ शाळा
लातूर १० शाळा
कोकण १ शाळा
Live Update : खासगी आणि पुनर्परिक्षार्थी मिळून राज्यात दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 93.04
यंदाच्या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नियमित, खाजगी व पुनर्परिक्षार्थी मिळून एकूण १६,१०,९०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,९८,५५३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,८७,३९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.०४ आहे.
Live Update : नागपूर विभागाचा सर्वात कमी तर कोकण विभाग अव्वल...
सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९८.८२ %) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (९०.७८%) आहे.
Live Update : राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 94.10
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४६,५७९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,५५,४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.१० आहे.
SSC Result Maharashtra Board Today Live Updates : राज्यात यंदा दहावीचा निकाल 94. 10 टक्के
SSC Result Maharashtra Board Today Live Updates : राज्यात यंदा दहावीचा निकाल 94. 10 टक्के
Live Update : यंदा परीक्षाकाळात २७१ भरारी पथकं कार्यान्वित
यंदा परीक्षाकाळात २७१ भरारी पथकं कार्यान्वित होती.. या पथकांकडून विविध केंद्रांना भेटी दिल्या जात होत्या..
Live Update : राज्यातील ७०१ केंद्रावरील सर्व यंत्रणा बदलण्यात आल्या...
कॉपी केसेस आढळले अशा सर्व केंद्रावरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक यंत्रणा आदी बदल करण्यात आले होते. राज्यातील ७०१ केंद्रावरील सर्व यंत्रणा बदलण्यात आल्या होत्या.
दहावीच्या ३७ केंद्रावर कॉपी केसेस यंदा घडल्याचं समोर आलं. या केंद्राची मान्यता कायमचा रद्द करण्याचा निर्णय ( तपासणी अंती) घेण्यात येईल.
Live Update : राज्यभरात कॉपीमुक्त अभियानासाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले
मुख्यमंत्र्यांच्या १०० कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत सरकारी निर्देशानुसार, राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले. यासाठी २० जानेवारी ते २६ जानेवारी रोजी कार्यक्रम राबवण्यात आला.
११ फेब्रुवारी २०२५ रोजी शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षासंदर्भात व्हिडिओ कॉन्सफरन्सिंगद्वारे कॉपीमुक्त अभियानासंदर्भात सर्वांना सूचित करण्यात आले होते.
Live Update : विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेचा तणाव येऊ नये यासाठी समुपदेकाची नियुक्ती
विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेचा तणाव येऊ नये यासाठी समुपदेकाची नियुक्ती करण्यात आली होती.
Live Update : शिक्षण मंडळाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात..
शिक्षण मंडळाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात..
Live Update : दहावी निकालासंदर्भातील शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद थोड्याच वेळात
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पत्रकार परिषदेला थोड्याच वेळात होणार सुरुवात
Live Update : कुठे पाहाल दहावीचा निकाल?
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात दहावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित गुण संकेतस्थळांवर पाहता येतील. तसेच या माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. यात शाळांना एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध व्हावी म्हणून https://mahahsscboard.in (in school login) हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे.
Live Update : दहावीचा निकाल Live
Live Update : गेल्यावर्षीच्या तुलनेत दहावीचा निकाल यंदा लवकर
गेल्या वर्षी 27 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदाचा निकाल 13 मे रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची बातमी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.
Live Update : 16 लाख विद्यार्थ्यांच्या आज दहावीचा निकाल
यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. यंदाच्या परीक्षेत 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये मुलांची संख्या 8,64,120 आणि विद्यार्थिनींची संख्या 7,47,471 इतकी आहे. याशिवाय 19 तृतीयपंथी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.