DCM Ajit Pawar Plane Crashed: राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईमधून बारामतीमध्ये उतरताना अजित पवार यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. विमानामध्ये काही जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांची सभा होणार होती. या सभेसाठी जात असतानाच ही मोठी दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अजित पवार यांच्या विमानाला अपघात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत लँडिंग दरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांच्या चार प्रचार सभा पार पडणार आहेत. अजित पवार यांचं विमान बारामती एअरपोर्टवर लँडिंग होत होतं त्याचवेळी त्याला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यात काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत.
विमानाच्या लँडिंग वेळी हा अपघात झालेला आहे. त्या ठिकाणी आता पोलिस आणि इतर कार्यकर्ते देखील पोचलेले आहेत. नेमका हा अपघात कशामुळे झाला आहे आणि कोण जखमी झालेत याची माहिती थोड्यावेळाने बाहेर येईल. या अपघाताचे धक्कादायक व्हिडिओही आता समोर येत आहेत. ज्यामध्ये विमान जळाल्याचे दिसत आहे.