महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी सध्या प्रमुख नेत्यांमध्ये जोर-बैठका सुरु आहेत. भारतीय जनता पक्षाकडे सगळी महत्वाची खाती राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
न्यायाधीश धनंजय निकम याचा अटकपूर्व जामीन फेटाळला
साताऱ्याचे लाचखोर न्यायाधीश धनंजय निकम याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती
अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या ब्रिजेश सिंग यांच्याकडून पदभार स्विकारतील.
अभिनेता अल्लू अर्जुनला जामीन मंजूर
अभिनेता अल्लू अर्जुन याला तेलंगणा उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्या आधी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र त्यांने जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. तिथे त्याला जामीन मंजूर करण्यात आला.
अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
तेलुगु सुपरस्टार अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पा 2 चित्रपटाच्या शोदरम्यान झालेल्या चेंगरा-चेंगरी प्रकरणातून ही कारवाई करण्यात आली आहे. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
तेलुगु सुपरस्टार अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पा 2 चित्रपटाच्या शोदरम्यान झालेल्या चेंगरा-चेंगरी प्रकरणातून ही कारवाई करण्यात आली आहे. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 15 डिसेंबरला होणार
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा शनिवारच्या ऐवजी रविवार 15 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती 'NDTV मराठी' ला सूत्रांनी दिली आहे. हा विस्तार मुंबईच्या ऐवजी नागपूरमध्ये होणार आहे. 16 डिसेंबर रोजी नागपूरमध्येच विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन होणार आहे.
Ajit Pawar Meet PM Modi: अजित पवारांनी सहकुटुंब घेतली PM मोदींची भेट
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अजित पवार यांच्यासह खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवारही उपस्थित होते. अजित पवार यांनी या सहकुटुंब भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Jalgaon Bus Accident: जळगावमध्ये बसचा भीषण अपघात, 28 प्रवासी जखमी
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातल्या दोनगाव जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बस थेट विद्युत खांबाला धडकून झालेल्या अपघातात 28 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट नाल्यात कोसळण्यापूर्वीच विद्युत खांबाला धडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवून रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे.
Allu Arjun Arrest: सर्वात मोठी बातमी! अभिनेता अल्लू अर्जुनला अटक
दाक्षिणात्य अभिनेता अल्लु अर्जुनला अटक करण्यात आली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पा 2 चित्रपटाच्या शोदरम्यान झालेल्या चेंगरा-चेंगरी प्रकरणातून ही कारवाई करण्यात आली आहे. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
NEET PG Exam Timetable: नीट पीजी' परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
नीट पीजी' परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) पुढील वर्षी होणाऱ्या नीट पीवी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले
15 जून 2025 रोजी ही परीक्षा होणार आहे
एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप पूर्ण करण्याची अनिवार्य तारीख 31 जुलै 2025 निश्चित करण्यात आली आहे
तर यंदा नीट पीजी च्या जागांमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
2025 मध्ये नीट पीजी च्या 2000 जागा वाढून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आता 75 हजार जागा असणार आहेत
Santosh Deshmukh Death: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण CBIकडे वर्ग
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पोलिसाच्या तपासावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि अनेक लोकप्रतिनिधी या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करावा अशी मागणी केली होती आणि त्यानुसार अखेर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग झाला आहे.याप्रकरणी केज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे निलंबन झालेले आहे.तर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या निलंबनाचा अहवाल बीडचे पोलीस अधीक्षक यांनी पाठवलेला आहे...
BJP Adhiveshan Shirdi: शिर्डीमध्ये भाजपचे प्रदेश अधिवेशन भरणार; अमित शहांसह 10 हजार पदाधिकारी उपस्थित राहणार
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भाजपची महाराष्ट्रातील युवकांना साथ! शिर्डीमध्ये प्रदेश अधिवेशन
१२ जानेवारी रोजी शिर्डीत भाजपचं प्रदेश अधिवेशन होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची महत्वाची घोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी यांची प्रमुख उपस्थिती असून मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार सोहळाही यावेळी पार पडणार आहे. १० हजार भाजप पदाधिकारी, तरूण कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होणार असून विवेकानंद जयंतीनिमित्त येत्या काळात तरूणाईला भाजपकडे आकर्षित करण्यासाठी अभियान राबवले जाईल.
Pune Student Protest: तीन आमदारांना मंत्रीपदे नको.. पुण्यामध्ये विद्यार्थी संघटनेचे आंदोलन
राज्यातील या आमदारांना मंत्रीपदे नको म्हणत पुण्यात विद्यार्थी संघटनांच आंदोलन
आमदार संजय राठोड ,अब्दुल सत्तार ,तानाजी सावंत आणि नीतेश राणे या आमदारांना मंत्रीपदे देवू नका आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची मागणी
राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस, भीम आर्मी स्टुडन्ट फेडरेशन आणि पूरोगामी विद्यार्थी संघटनांच पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन
आमदार संजय राठोड ,अब्दुल सत्तार ,तानाजी सावंत भ्रष्टाचारी असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
म्हणुन या तिन्ही आमदारांना मंत्रिमंडळात संधी न देण्याची मागणी
Vandre Sea Link Accident: वांद्रे - वरळी सी लिंकवर भीषण अपघात; 5 गाड्यांची धडक
BREAKING
वांद्रे - वरळी सी लिंक वर भिषण अपघात
पाच गाड्या एकमेकांना ठोकल्या
वांद्रे वरून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर अपघात
अपघातात काही जण जखमी, गाड्यांचे मोठे नुकसान
घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल
Chiplun News: वंचित आघाडीच्या 150 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
परवानगी नसतानाही काढलेल्या मोर्चाप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या 150 जणांवर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात सध्या मनाई आदेश लागू केला आहे. शिवाय चिपळूण प्रांताधिकाऱ्यांनीही मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यानंतरही वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढला. त्यामुळे वंचितचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा यशवंत जाधव, गीता विकास जाधव, अॅड. सर्वजित बनसोडे, संतोष सुभाष पवार, नितीन जाधव, प्रतीक प्रताप गमरे, सुषमा शिवराम गमरे, सुनील जाधव, बबन यशवंत गमरे यांच्यासह १५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या नेत्यांची मंत्रिपदासाठी फिल्डिंग
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी मंत्र्याकडून मंत्री पदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लॉबिंग सुरू
अजित पवार यांना भेटण्याठी माजी मंत्री हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील देवगिरी निवासस्थानी पोहोचले
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील देवगिरी निवासस्थानी पोहोचले आहेत
माजी मंत्री धर्मराव बाबा अत्राम अजित पवारांची भेट घेऊन देवगिरी निवासस्थानातून बाहेर पडले
तर प्रतापराव चिखलीकर देवगिरीकर दाखल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिमंडळ विस्तारात ८ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे
आपलं मंत्रिपद सुरक्षित करण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून लॉबिंग सुरू
Pune Crime: येरवडा कारागृहातून आरोपीचे पलायन
येरवडा कारागृहातून आरोपीचं पलायन
खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलला आरोपी येरवडा कारागृहातून पळाला
अनिल मेघदास पटेनिया असं कारागृहातून पळालेल्या आरोपीचे नाव
गेली सात वर्षापासून तो येरवडा खुल्या कारागृहात भोगत होता शिक्षा
पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
Beed Firing: बीडमध्ये पुन्हा गोळीबार, तरुणावर प्राणघातक हल्ला
बीडच्या बार्शी नाका परिसरातील प्रकाश आंबेडकर नगर भागात रात्री गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या भांडणाच्या रागातून घरात घुसून हा गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात विश्वास डोंगरे हा युवक जखमी झाला असून त्यालां पुढील उपचरासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.आता जखमीचा जाब घेण्यासाठी पेठ बीड पोलिसांचे पथक देखील छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले आहे. ही घटना रात्री उशिरा पावणेदोन च्या सुमारास झाली.दरम्यान बीडमध्ये या गोळीबारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.
Cabinet Expansion: भाजप- राष्ट्रवादीची मंत्रिमंडळ विस्तार यादी ठरली
भाजपा आणि एनसीपीने मंत्रीमंडळ विस्तार यादी अंतिम केली.
एकनाथ शिंदे याकडून अंतिम या्दीवर अद्याप चर्चा सुरू असल्याची माहिती
महायुतीत शिंदे यांच्याकडून अद्याप अंतिम नाव विस्तार यासाठी
दिलेली नाही यावरून विस्तारला ब्रेक लागणार का याची चर्चा
एकनाथ शिंदे आज दुपार पर्यंत मंत्रीमंडळ विस्तार कोणाची वर्णी लावायची याची यादी देणार असल्याची माहिती - सूत्र
एकनाथ शिंदे यांच्यावर पार्टी अंतर्गत इच्छुकांची स्पर्धा, शिंदे यांना करावी लागणार तारे वरची कसरत.
जून्या मंत्री पदावर राहिलेल्या अनेकांना डावलून नव्याने संधी द्यायची मोठ आव्हान शिंदे यांच्या समोर
tasgaon Crime: तासगावमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला, कोयत्याने सपासप वार
तासगाव तालुक्यातील वायफळे गावात 5 जणांवर पूर्ववैमनस्यातून तलवार आणि कोयत्याने खुनी हल्ला. वायफळे गावातील स्टँड चौकात झाला हल्ला.
10 ते 15 जणांच्या टोळीकडून हल्ला झाल्याची माहिती. तासगाव पोलीस घटनास्थळी दाखल
Cabinet Expansion: 'मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी द्या..' भाजप हायकमांडच्या सूचना
प्रस्थापित शिवाय नवीन तरूण संधी देण्याच्या भाजपा पक्ष श्रेष्ठ सूचना
भाजपा मंत्री मंडळ विस्तारात नवीन चेहरे असणार
जून्या चेहरातील अनेकांना वगळण्यात येणार ? - सूत्र
नवीन तरूण चेहरे प्रादेशिक विभाग निहाय
संधी मिळणार
नवीन संधी देताना काहींना थेट कॅबिनेट तर काहींना राज्यमंत्री केले जाणार
Dharashiv Crime: घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार, धाराशिव पोलिसात गुन्हा दाखल
घरात घुसून दरवाजा बंद करून ठार मारण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. एका गावातील ४० वर्षीय महिलेवर घरी एकटी असताना एका गावातील तरुणाने पिकअपमध्ये येऊन घरात घुसला. घराचा दरवाजा बंद करून तिला आरडा ओरड केला, तर ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावरून पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवला आहे.
Palghar News: वसई विरार नालासोपारा परिसरात राजरोसपणे हुक्का पार्लर सुरू
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दिवसेंदिवस अंमली पदार्थांच्या तस्करीच्या घटना समोर येत आहेत. मात्र दुसरीकडे नालासोपाऱ्यातील आचोळे पोलीस हद्दीतील एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असून त्या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण वर्ग नशेत झिंगताना दिसून येत आहेत. नालासोपारा पुर्वेतील रॉयल पॅलेस फेमिली रेस्टोरंट अँड बारच्या वर हा हुक्का पार्लर राजरोसपणे चालत आहे. एकीकडे हुक्का पार्लर वर बंदी असताना कुणाच्या आशीर्वादानेच हे सुरू आहे असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. त्यामुळे आता या हुक्का पार्लरवर पोलीस प्रशासन करवाई करते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Accident News: ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू
आलापल्ली ते आष्टी महामार्गावरील अपघात म्हणजे काही नवीन नाही आतापर्यंत कित्येक लोकांचे प्राण या महामार्गावर गेलेले आहेत तसेच का रात्रीचा सुमारास अपघात घडला. सुरजगड वरून भरून जाणाऱ्या लोकांनी त्याचा ट्रकने एका दुचाकीस्वरास धडक दिली त्या धडकेत दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला मृतकाचे नाव रिजवान शेख असून या अपघाताने काही काळ वाहतूक खोळंबली होती
Accident News: ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू
आलापल्ली ते आष्टी महामार्गावरील अपघात म्हणजे काही नवीन नाही आतापर्यंत कित्येक लोकांचे प्राण या महामार्गावर गेलेले आहेत तसेच का रात्रीचा सुमारास अपघात घडला. सुरजगड वरून भरून जाणाऱ्या लोकांनी त्याचा ट्रकने एका दुचाकीस्वरास धडक दिली त्या धडकेत दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला मृतकाचे नाव रिजवान शेख असून या अपघाताने काही काळ वाहतूक खोळंबली होती
Hingoli Band: परभणीतील संविधानाच्या विटंबनाच्या निषेधार्थ हिंगोली भीम अनुयायांकडून शांततेत बंद
परभणीतील संविधानाच्या विटंबनाच्या निषेधार्थ हिंगोली भीम अनुयायांकडून शांततेत बंद
परभणीतील घटनेचा विविध ठिकाणी निषेध, सेनगाव कळमनुरी कनेरगाव नाका या ठिकाणी कडकडीत बंद..
हिंस्त्र प्राण्यांचे जिल्ह्यात ठीक ठिकाणी लहान जनावरांवर हल्ले, शेतकऱ्यांच्या मते बिबट्या तर वनविभाग म्हणतय हिंस्र प्राणी.. शेतकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण..
जिल्ह्यात सिकलसेलच्या रुग्णांची संख्या वाढली, जिल्ह्यात 109 सिकलसेल ग्रस्त रुग्ण..
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 20 बालकांवर महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया होणार..