Baramati News: सुनेत्रा पवारांची विक्रमी विजयाकडे वाटचाल! नोटाला तब्बल 'इतकी' मते; बिचुकले, मुंडेंचे काय झाले?

पाचव्या फेरीअखेर ही संख्या ४५,०१० वर पोहोचली आणि सहाव्या फेरीनंतर सुनेत्रा पवारांनी ५४ हजारांचा टप्पा ओलांडून विरोधकांना नामोहरम केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Baramati Assembly Bypoll Election Result:  बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होत असून, सुनेत्रा पवार यांनी मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे. सहा फेऱ्या पूर्ण झाल्या असून सुनेत्रा पवार तब्बल ५४,५०४ मतांनी आघाडीवर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

बारामतीत सुनेत्रा पवारांची विजयाकडे वाटचाल 

​आज सकाळी आठ वाजता बारामती एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीला प्रारंभ झाला. प्रशासनाने याठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. सुरुवातीला पोस्टल बॅलेटद्वारे मतदान मोजले गेले आणि त्यानंतर ईव्हीएम मधील मतांची मोजणी सुरू झाली. तिसऱ्या फेरीअखेर सुनेत्रा पवारांना २६,७७३ मते मिळाली होती. त्यानंतर ही आघाडी वाढतच गेली. पाचव्या फेरीअखेर ही संख्या ४५,०१० वर पोहोचली आणि सहाव्या फेरीनंतर सुनेत्रा पवारांनी ५४ हजारांचा टप्पा ओलांडून विरोधकांना नामोहरम केले आहे.

Advertisement

​रिंगणात असलेल्या २३ उमेदवारांपैकी मुख्य लढत सुनेत्रा पवार आणि उर्वरित उमेदवारांमध्ये होती. मात्र, निकालाचे कल पाहता ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे दिसते. मतमोजणी केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली असून गुलालाची उधळण केली जात आहे. बारामतीकरांनी आपल्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करत सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे या आकडेवारीवरून अधोरेखित होत आहे.

Baramati- Rahuri Election Result LIVE: सुनेत्रा पवारांची मोठी आघाडी, अक्षय कर्डिलेंचीही मुसंडी, वाचा अपडेट्स

पहिली फेरी 

  • सुनेत्रा पवार : 8868
  • अभिजीत बिचुकले : 7
  • करुणा मुंडे : 10
  • चंद्रकांत वाघमोडे : 5
  • नोटा : 28

दुसरी फेरी अखेर मते

  • सुनेत्रा पवार : 16543
  • अभिजीत बिचुकले : 15
  • करुणा मुंडे : 18
  • चंद्रकांत वाघमोडे : 5
  • नोटा : 48


तिसरी फेरी अखेर मते

  • सुनेत्रा पवार : 26773
  • अभिजीत बिचुकले : 19
  • करुणा मुंडे : 33
  • चंद्रकांत वाघमोडे : 9
  • नोटा : 88

Tamil Nadu: तमिळनाडूत विजय यांची 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री! सत्तासंघर्षात TVK ची जोरदार मुसंडी