- तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजय यांच्या TVK पक्षाने प्रस्थापित राजकीय गणिते मोडीत काढली आहेत
- सुरुवातीच्या मतमोजणीत TVK पक्षाने ७८ हून अधिक जागांवर आघाडी घेत राज्यातील राजकारणात नवा पर्व सुरू केला आहे
- सत्ताधारी DMK आणि AIADMK यांच्यात सुरुवातीला चुरस होती, मात्र DMK तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे
Tamil Nadu Assembly Election Results 2026: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आज अनपेक्षित आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. दक्षिणेतील सुपरस्टार थलपती विजय यांच्या 'तमिझागा वेत्री कळघम' (TVK) या पक्षाने पहिल्याच निवडणुकीत प्रस्थापित राजकीय गणिते मोडीत काढली आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये TVK ने मोठी आघाडी घेतली असून, राज्याच्या राजकारणात एका नव्या पर्वाची चाहूल लागली आहे. तामिळनाडूत हा मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे.
DMK तिसऱ्या क्रमांकावर
मतमोजणीच्या सुरुवातीला सत्ताधारी DMK आणि AIADMK यांच्यात चुरस दिसत होती. मात्र, काही तासांतच विजय यांच्या पक्षाने 78 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ताज्या आकडेवारीनुसार, TVK आणि AIADMK यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळत असून मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचा DMK पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याचे चित्र आहे. TVK ला एक्झिट पोलने वर्तवलेला 98 ते 120 जागांचा अंदाज खरा ठरताना सध्या तरी दिसत आहे.
नक्की वाचा - Assembly election Result LIVE 2026: तामिळनाडूत डीएमके तर केरळमध्ये काँग्रेस आघाडीवर
विक्रमी मतदानाचा कल
तमिळनाडूत यंदा 5.73 कोटींहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, राज्यात तब्बल 84.69 टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. तमिळनाडूच्या निवडणूक इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वोच्च टक्केवारी असून, या वाढलेल्या मतदानाचा थेट फायदा विजय यांच्या पक्षाला झाल्याचे प्राथमिक कल सांगत आहेत.
तमिळनाडूच्या राजकारणात आज खऱ्या अर्थाने 'सिनेमॅटिक' ट्विस्ट पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध अभिनेते विजय यांनी राजकारणात मारलेली एन्ट्री 'ब्लॉकबस्टर' ठरली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालात TVK पक्षाने प्रस्थापित आघाड्यांना जोरदार धक्का दिला असून बहुमताच्या दिशेने कूच केली आहे. सकाळच्या सत्रात AIADMK ने काही काळ आघाडी मिळवून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही वेळातच विजय यांच्या TVK ने पुन्हा मुसंडी मारली. सध्या TVK आणि AIADMK यांच्यात 'कांटे की टक्कर' सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world