महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक खात्यांवरुन रस्सीखेच सुरु आहे. अशातच महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये हा अंतिम फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे.
प्रार्थना स्थळांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश
प्रार्थना स्थळांबाबतचा कुठलाही नवा खटला दाखल करु नये असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. शिवाय कुठलाही अंतरीम तसच फायनल निर्णय देऊ नये. तसेच कुठल्याही धार्मिक स्थळाच्या सर्वेचा आदेश देऊ नये असेही म्हटले आहे.
ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार नाही - जयंत पाटील
ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात न जाण्याचा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने घेतला आहे. याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. ज्या उमेदवारांना वैयक्तीक पणे कोर्टात जायचे आहे त्यांच्यासाठी मार्ग मोकळा असेल असंही त्यांनी सांगितलं.
4 आणि 5 जानेवारी रोजी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मुंबईत बैठक
पुढील महापालिका आणि पक्ष संघटनेची रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची बैठक होणार आहे. सर्व पदाधिकारी आमदार आणि खासदार बैठकीला उपस्थित राहणार आहेत. शरद पवार बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.
Hingoli Accident: हिंगोलीत भयंकर अपघात! माय-लेकीचा करुण अंत
हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील कळमनुरी शहराजवळ भरधाव कारचा अपघात झाल्याची घटना घडलीय, या अपघातात सहा महिन्याच्या मुलीसह आईचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडलीय, तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले असुन जखमीना हिंगोली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे,या अपघातात गाडीचा पूर्णपणे चेंदा मेंदा झाला आहे.
Ajit Pawar Meet Amit Shah: अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला
Delhi News: दिल्लीत महत्वाची घडामोड, ठाकरे गटाचे खासदार PM मोदींच्या भेटीला
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे राज्यात भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवले जाणार असल्याची चर्चा आहे. अशातच दिल्लीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.
Solapur Airport Rename: सोलापूर विमानतळाला श्री स्वामी समर्थांचे नाव द्या: राष्ट्रवादीची मागणी
-सोलापूर विमानतळाला श्री स्वामी समर्थ यांचं नाव देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी.
सोलापुरातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून मुंबई येथे भेट घेत केली मागणी..
- सोलापूर विमानतळावरून 23 डिसेंबर रोजी विमान सेवा सुरू होणार
- राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव महेश कुलकर्णी यांनी सोलापूर विमानतळाला श्री स्वामी समर्थ यांचं नाव देण्याची केली मागणी..
- मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर जाऊन महेश कुलकर्णी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांचा केला सत्कार..
- महेश कुलकर्णी यांनी अजित पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देत केली मागणी
NIA ची देशभरात कारवाई
NIA ने संपूर्ण देशभरात ही कारवाई केली असून महाराष्ट्रामध्ये तीन ठिकाणी कारवाई केल्याचे उघड झाले आहे. ही कारवाई नेमकी कोणत्या प्रकरणी करण्यात आली आहे , याचा तपशील उद्याप उपलब्ध होऊ शकलेला नाही.
छत्रपती संभाजीनगर शहरात NIA ची कारवाई
छत्रपती संभाजीनरसह राज्यातील तीन ठिकाणी NIA नं कारवाई केली आहे. शहरातील बीड बायपास भागात असलेल्या मदरशातून NIA च्या पथकाने 22 वर्षांच्या तरुणाला ताब्यात घेतलं. संभाजीनगरसह अमरावती, भिवंडीमध्येही NIA नं एकाचवेळी कारवाई केलीय. तीन्ही ठिकाणी प्रत्येकी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
बीडला बदनाम करू नका: धनंजय मुंडे
Dhananjay Munde News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे फास्टट्रॅक कोर्टामध्ये मध्ये चालवाव अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे संतोष देशमुख यांची हत्या दुर्दैवी असल्याचे देखील धनंजय मुंडे म्हणा तर विरोधक हे बीडचा बिहार झालाय असं बोलता येत महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच असे गुन्हे आणि घटना घडतात त्यामुळे बीडला बदनाम करू नये असं देखील धनंजय मुंडे म्हणालेत.
Devendra Fadnavis: मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा नाही, फॉर्म्युलाही ठरला: CM देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र महत्त्वाचे राज्य आहे. या राज्याला गतीशील ठेवणं गरजेचं आहे. केंद्र सरकार पूर्ण सहकार्य द्यायला तयार आहे. पक्षातील सर्वच नेत्यांची सदिच्छा भेट घेतली. मोदी जी आमच्यासाठी पीतृतुल्य आहेत. पालकाच्या भूमिकेत मोदीजी आहेत. अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केली आहे.
मंत्रीमंडळ विस्ताराचा कोणताही तिढा नाही. अजित पवार त्यांच्या कामानिमित्त आले आहेत. माझी आणि अजित पवारांची भेट झाली नाही. आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील तो निर्णय आमचे संसदीय बोर्ड घेते.
प्रत्येक विभागातून कोण मंत्री असतील अशी नावं काढली जातील. वरिष्ठ त्यावर निर्णय घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Solapur Fire News: सोलापूरात प्लास्टिक कारखान्याला आग
सोलापुरात प्लास्टिक कारखान्याला लागली आग
सोलापूरच्या नई जिंदगी परिसरात असलेल्या प्लास्टिकचे तीन कारखाने जळून खाक
प्लास्टिक कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान
सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी नाही
अग्निशामक दलाकडून दहा गाड्यांची पाणी फवारणी करून आग विझवण्यात आली
पहाटे तीनच्या सुमारास लागली होती आग, आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ठ नाही
Sanjay Raut Meet Sharad Pawar: संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Devendra Fadnavis Meet PM Narendra Modi: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस PM मोदींच्या भेटीला
राज्यामध्ये महायुतीने बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले आहेत. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. यावेळी ुमुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट दिली.
Ajit Pawar Meet Amit Shah: उपमुख्यमंत्री अजित पवार अमित शाहांच्या भेटीला
राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. खाते वाटपासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.
Parbhani Violence: परभणी येथील संविधानाच्या विटंबनेच्या निषेधार्थ हिंगोली बंद
परभणीत घडलेल्या घटनेचे पडसाद आता हिंगोलीत सुद्धा उमटायला सुरुवात झाली आहे. आंबेडकरवादी अनुयायांकडून हिंगोली शहर बंद करण्याचा आवाहन करण्यात आलं होतं. आणि या आवाहनाला हिंगोलीतील व्यापाऱ्यानी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हिंगोली पोलिसांकडून देखील ठिकठिकाणी पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची होणार भेट
उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची थोड्याच वेळात घेणार भेट, खातेवाटपावर होणार चर्चा
Maharashtra Politics: चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलारांना मंत्रिपदाचे वेध
भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांना मंत्री पदाचे वेध?
आगामी काळातील स्थानिक स्वराज संस्था निवडणूक पण दोघांना मंत्री पदात जास्त रस ?
बावनकुळे आणि शेलार यांचे मंत्री पद मिळावे यासाठी लाॅबिगं - सूत्र
शेलार आणि बावनकुळे मंत्री झाले तर दोन्ही पदावर नवनियु्कती केली जाणार
भाजपा प्रदेश अध्यक्ष ओबीसी की मराठा करायचा यावर भाजपा पक्ष श्रेष्ठीचे मंथन
रावसाहेब दानवे, संजय कुटे, गिरीश महाजन, राम शिंदे यांची नाव भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदासाठी चर्चेत
Ajit Pawar On Sharad Pawar Meeting: 'ही कौटुंबिक भेट, साहेबांना शुभेच्छा दिल्या...' अजित पवार
'साहेबांचा आज वाढदिवस होता. उद्या काकींचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. चहा-पानी झाले. मंत्रिमंडळ बैठकीबाबत चर्चा झाली. ही कौटुंबिक भेट होती. विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली. राजकारणापलिकडेही काही संबंध असतात. मी घरचाच आहे, मी कुठे बाहेरचा आहे का? असा सवालही अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
Kurla Bus Accident: कुर्ला बस अपघात प्रकरणाचा अहवाल अद्यापही प्रतिक्षेत
कुर्ला बस अपघात प्रकरणाचा अहवाल अद्यापही प्रतिक्षेत
- कुर्ला बस अपघात प्रकरणावर ५ सदस्यीय समिती नेमण्यात आलीय
- ही समिती घटनेची माहिती आणि तपास करुन अहवाल सादर करेल
- सध्या बेस्ट बस चालक पोलिसांच्या ताब्यात आहे
- घटनेला ३ दिवस उलटल्यानंतरही अहवालाची प्रतिक्षा
- पुढील १० दिवसांत अहवाल सादर केला जाण्याची शक्यता
Ajit Pawar Meet Sharad Pawar: दिल्लीत मोठी घडामोड, अजित पवार शरद पवारांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस. शरद पवार हे आज दिल्लीमध्ये असून उपमुख्यमंत्री अजित पवारही दिल्लीत आहेत. अशातच शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार हे त्यांच्या भेटीला गेले आहेत. खासदार सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे हे नेतेही यावेळी उपस्थित होते.
Sharad Pawar Birthday: शरद पवारांचा दिल्लीत वाढदिवस, राज्यभरातील नेते दाखल
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एनसीपी पक्षाचे कार्यकर्ते दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी पोहोचले आहेत. शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर शुभेच्छाचे मोठे पोस्टरही लागले आहेत. योगायोग की अजित पवारही दिल्लीतच आहेत. अजित पवार काका शरद पवारांची भेट घेऊन शुभेच्छा देणार का याकडे लक्ष आहे.
jayant Patil On Sharad Pawar Birthday: शरद पवारांच्या भेटीसाठी जयंत पाटील दिल्लीला जाणार
Ajit Pawar On Sharad Pawar Birthday: शरद पवारांचा वाढदिवस! अजित पवारांनी दिल्या खास शुभेच्छा
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
Sharad Pawar Birthday: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस, राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, देशाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषीमंत्री, पद्मविभूषण शरद पवार यांचा आज वाढदिवस. शरद पवार यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून, कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज शरद पवार हे दिल्लीमध्ये असल्याने अनेक नेते त्यांची भेट घेऊन शुभेच्छा देण्याची शक्यता आहे.
Badlapur News: बदलापुरात कंपनीतून रासायनिक वायूची गळती, नागरिकांना त्रास
बदलापूर पूर्वेच्या एमआयडीसी भागातील टीनको या रासायनिक कंपनीने मोठ्या प्रमाणात रासायनिक वायू हवेत सोडल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला. या कंपनीत केमिकलची बॅच सुरू असताना त्यातून मोठ्या प्रमाणात वायू बाहेर सोडला आणि एक ते दीड किलोमीटरच्या परिसरात पसरला. या रासायनिक वायुमुळे नागरिकांना मोठा त्रास झाला.
दरम्यान, पोलिसांनी कंपनीच्या ठिकाणी येऊन एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. रोजच बदलापूर एमआयडीसी मधील केमिकल कंपन्या अशाप्रकारे राजरोसपणे वायू सोडतात. त्यामुळे इथल्या नागरिकांना त्याचा त्रास होतो. अशाप्रकारे वायू प्रदूषण करून मानवी आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या या कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ काय कारवाई करते? हे पाहावं लागणार आहे.
Wardha Fire: वर्धा रेल्वे स्थानकावर आग लागल्याने खळबळ
वर्धा रेल्वे स्थानकावर आग लागल्याने खळबळ
रेल्वे स्थानकाच्या प्रवेश द्वाराजवळ लागली आग
अग्निशमन दलाच्या वाहनाने आगीवर मिळविले नियंत्रण
आगीचा रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही
नेमकी आग कशाने लागली याची कारणमीमांसा शोधणे सुरू
भिवंडी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून मुख्यालयात उशिरा येणाऱ्यांवर कारवाई
भिवंडी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा प्रशासक आयुक्त अजय वैद्य यांनी घेतला आहे महानगरपालिका मुख्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी हे आपल्या कर्तव्यावर उशिरा येत असल्याने अनेकदा तक्रार आल्याने प्रशासकीय आयुक्त अजय वैद्य यांनी मुख्यालयाच्या गेट बाहेर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे सकाळी दहा वाजता कामावर हजर असण्याचे आदेश असताना सुद्धा अनेक कर्मचारी व अधिकारी हे उशिरा आकरानंतर येत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून आल्या होत्या याच पार्श्वभूमीवर आयुक्त यांनी कर्मचाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे जवळपास 50 हून अधिक अधिकारी व कर्मचारी यांचा या ठिकाणी समावेश असल्याने या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
Live Updates: बांगलादेशमधील अत्याचाराविरोधात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यसासमोर मोर्चा सुरु
बांग्लादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यसासमोर मोर्चा सुरु.
मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात पुरुष व महिलांचा समावेश
जात पात कि करो बिदाई हिंदू हिंदू भाई भाई असे फलक मोर्चा मध्ये झळकावले
हिंदूंना वाचवा व बांग्लादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेदार्थ मोर्चाचे आयोजन
CM फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (11 डिसेंबर) रात्री उशीरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली.
CM देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी (11 डिसेंबर) दिल्लीत दाखल
महायुतीच्या नेत्यांची आज बैठक?
महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईमध्ये बैठक होण्याची शक्यता