Ravindra Chavan: रविंद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्याने काँग्रेसचा संताप! माफीची मागणी; लातूरमध्ये निदर्शने

'भाजपवाल्यांनो याद राखा, करारा जवाब मिलेगा, असे ट्वीट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

विष्णु बुरगे, लातूर: 

Ravindra Chavan Controversy Latur:  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूरचे लोकनेते,  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. लोकांचा उत्साह पाहता लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं ते म्हणाले. या विधानानंतर काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे तसेच लातूरकरही आक्रमक झाले आहेत. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा संताप..

"स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कोणी निर्माण नाही झाला. अनेक जण इच्छा बाळगून आलेत आणि स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. आज त्यांच्याबद्दल हे सत्तेचा माज असलेले भाजप नेते लातूरात येऊन बरळून जातात की साहेबांच्या आठवणी पुसल्या गेल्यात. त्यांना काय समजणार विलासराव देशमुख साहेबांचं लातूरशी असलेलं नातं. लातूरच्या कर्तुत्वसंपन्न सुपुत्राचा अपमान लातूरकर कधीही सहन करणार नाही, भाजपवाल्यांनो याद राखा, करारा जवाब मिलेगा, असे ट्वीट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. 

Raj Kundra: राज कुंद्रा पु्न्हा अडचणीत; 150 कोटींच्या बिटकॉइन घोटाळ्यात कोर्टाचे समन्स

त्याचबरोबर "स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब म्हणजे काँग्रेस विचाराच्या सभ्य राजकारणाचे मुकुटमणी. सत्ता, पद आणि अधिकार असूनही त्यांनी कधीही माणुसकी, सभ्यता आणि संयम सोडला नाही. जनमानसांच्या हृदयात अढळ स्थान मिळवलेले स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी पुसून टाकण्याची भाषा म्हणजे भाजपच्या वैचारिक दिवाळखोरीची स्पष्टता आहे," अशी घणाघाती टीका काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. 

लातूरमध्ये आज निदर्शने...

रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे लातूरमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. “राग आणि द्वेष आमच्या मनात आहे, चालली जीभ आणि लावली टाळला” असे वक्तव्य करत त्यांनी त्वरित माफी मागावी, अशी मागणी लातूर काँग्रेसकडून करण्यात आली आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ उद्या निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती लातूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांनी दिली आहे. 

अमित देशमुखांकडून निषेध..

दरम्यान, रवींद्र चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य दुर्दैव आहे.. लातूरची ही संस्कृती नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही त्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होत आहे.. रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या कालच्या वक्तव्यानंतर आणि देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आणि चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यात चा निषेध केला ही लातूरची आणि महाराष्ट्राची संस्कृती नाही असं म्हणत अमित देशमुख यांनी रवींद्र चव्हाण यांना उत्तर दिले आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : Sunil Shetty : सुनील शेट्टीनं 40 कोटींची ऑफर का नाकारली? कारण वाचून 'अण्णा'बद्दलचा आदर 10 पटीनं वाढेल )