Maharashtra FYJC Online Admission: सोमवारी राज्यातील ऑनलाईन प्रवेश पद्धतीने अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून विशेषतः विज्ञान विषयातील कट ऑफ ची टक्केवारी वाढल्याने विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली आहे. महाराष्ट्रात सर्वत्रच विज्ञानाच्या नामांकित महाविद्यालये आणि ज्युनिअर कॉलेजेस मध्ये प्रवेशाकरिता आवश्यक न्यूनतम टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे चांगले गुण असून सुद्धा कित्येक विद्यार्थ्यांची नावे 28 जून रोजी सायंकाळी 5 वाजता जारी करण्यात आलेल्या पहिल्या यादीत आलेली नसल्याचा अनुभव यावर्षी देखील आला आहे. त्यामुळे, पर्याय दिलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल किंवा नाही, याची चिंता वाढली आहे.
LPG Price: सिलेंडरच्या दरात आजपासून कपात, चेक कर नवीन दर
प्रवेश प्रक्रियेत जाती निहाय आरक्षण, आर्थिक दुर्बल गट आणि दिव्यांगांचे आरक्षण आदी बाबींचा विचार करण्यात येत असून अशा प्रत्येक आरक्षित जागेसाठी देखील सर्वाधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जात असल्याने तीव्र प्रतिस्पर्धेमुळे कित्येक विद्यार्थ्यांचे नाव यादीत नाही. याशिवाय, विषयांची निवड करताना असलेल्या पर्यायांचा विचार देखील केला जात आहे.
सर्व मिळून गुणांची टक्केवारी चांगली असली तरी निवडलेल्या फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स अर्थात पीसीएम ग्रुप किंवा बायफोकल मध्ये गुण किती हा कळीचा प्रश्न ठरतो आहे. यात कमी गुण असल्यास यादीत बेहत्तर गुण असलेल्यांना प्राधान्य मिळाल्याचे बघायला मिळत आहे, असे अधिकारी सूत्रांनी सांगितले. पहिल्या यादीत नाव न आल्याने विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली असून पुढच्या यादीत तरी नाव येईल की नाही आणि निवडलेल्या महाविद्यालयांत प्रवेश मिळेल किंवा नाही हा अधिकांश विद्यार्थ्यांपुढे महत्वाचा प्रश्न आहे.
(नक्की वाचा- 1st July 2025 Changes : आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेल्वे भाडेवाढ, 1 जुलैपासून होतायत 13 मोठे बदल)
दरम्यान, यावर्षी, दहावीचा निकाल लागल्यानंतर देखील बऱ्याच उशिरा अकरावी प्रवेशाची प्रक्रिया अखेर राज्यभरात सुरू झाली असून पहिल्या यादी प्रमाणे 7 जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश सुनिश्चित करायचा आहे. त्यानंतर, दुसऱ्या फेरी साठी 9 जुलै रोजी रिक्त जागा प्रदर्शित केल्या जातील.