जाहिरात

Pune Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाआधी पुणेकरांसाठी Good News! अजित पवारांकडून मोठ्या घोषणा

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गणेशोत्सवाआधी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. पुण्यामध्ये ते माध्यमांशी बोलत होते. 

Pune Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाआधी पुणेकरांसाठी Good News! अजित पवारांकडून मोठ्या घोषणा

अविनाश पवार, पुणे: राज्यात गणेशोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मुंबई पुण्यासह राज्यात गणपती उत्सवाची लगबग सुरु झाली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गणेशोत्सवाआधी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. पुण्यामध्ये ते माध्यमांशी बोलत होते. 

काय म्हणालेत अजित पवार?

गणेशोत्सव महायुतीच्या राज्य महोत्सव म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिक उत्साहात यंदा गणेशोत्सव होईल, राज्यातील सगळी यंत्रणा झोकून काम करणार आहे. गणेशोत्सव काळात  सकाळी ६ ते रात्री २ मेट्रो सुरू राहील, शेवटच्या दिवशी सगळा दिवस चालू राहील. मेट्रोच्या फेऱ्याही वाढवता येतील..मानाचे गणपती पाहण्यासाठी कुठल्या स्टेशनला कुठे चढावे आणि उतरावे याबाबत सुद्धा नियोजन करणार आहोत. 

Ro Ro Ferry : कोकणातील गणेशभक्तांना बाप्पा पावणार! बोटीनं सुसाट गाव गाठता येणार.. वाचा सर्व माहिती

तसेच "दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त सहभागी होतात, राज्याने सुद्धा आता राज्य महोत्सव दर्जा दिला आहे. मला काही गणेश मंडळांचे कार्यकर्ते भेटले. आम्हाला विसर्जनासाठी सकाळी ७ वाजता निघू द्या अशी मागणी केली.  त्या सगळ्या मंडळाशी बोलून मतभेद राहणार नाही, मानाचे गणपती यांचा मान ठेऊन जेवढं सकाळी काढता येईल तेवढा करू. किती ढोल ताशा पथक संख्या हवी, मानाचे गणपती यांच्यासोबत सकारात्मक चर्चा होत आहे. काल सुद्धा मंडळानी सामान्जाशी भूमिका घेतली आहे," असही उपमुख्यमंत्री म्हणाले. 

"पुणे ग्रँड चॅलेंज टूरमध्ये दोन्ही पालिका, जिल्हा परिषद, अनेक वेगवेगळ्या यंत्रणा यांचे काम होणार आहे तसेच आज लोगो तयार केला आहे. पुरंदर विमानतळ बाबत राज्य सरकार ने हा विमानतळ करण्याचे निर्णय घेतला आहे. काही गावांमध्ये १२८५ एकर जमीन भूसंपादन सहमती पत्र सादर करण्याकरिता सूचना देऊन अंमलबजावणी सुरू करतील. काही लोकांचा विरोध आहे चर्चेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू," असंही अजिुत पवार यांनी स्पष्ट केल आहे. 

Ganpati Festival: गणेशोत्सवासाठी BMC सज्ज: ऑनलाइन परवानगी, पर्यावरणपूरक उत्सवावर भर आणि कठोर नियम लागू

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com