महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने विभागाच्या अखत्यारीतील एक शासकीय वाहन विकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक अधिकृत निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. विभागातील एमएच-01, सीपी-1530 या क्रमांकाची स्कोडा रॅपीड गाडी 'जशी आहे तशा स्थितीत' तत्त्वावर विकली जाणार आहे. या लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी विभागाने सविस्तर प्रक्रिया आणि नियम व अटी जाहीर केल्या आहेत. या वाहनाची तपासणी करण्यासाठी ते नवीन प्रशासकीय भवन आवारात उपलब्ध करून देण्यात आले आहे.
नक्की वाचा: केसांची वाढ भराभर कशामुळे होईल,आवळा की अॅलोव्हेरा? घनदाट आणि लांबसडक केसांसाठी काय वापरावे
स्कोडा रॅपीड गाडीसाठीच्या लिलावात भाग कसा घ्यायचा?
या लिलावात भाग घेण्यासाठी, निविदाधारकांना प्रथम 37,000 रुपये इतकी इसाऱ्याची रक्कम (EMD) भरणे बंधनकारक आहे. ही रक्कम मंत्रालयातील नवीन प्रशासकीय भवनाच्या 15 व्या मजल्यावर असलेल्या पर्यावरण विभागाच्या रोखशाखेत जमा करावी लागेल. रक्कम जमा केल्यानंतर मिळालेली पावती निविदा अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे, अन्यथा निविदा ग्राह्य धरली जाणार नाही.
नक्की वाचा: बँक नॉमिनेशन नियमांत मोठा बदल, सगळी कटकट संपणार
लिलावात स्कोडा रॅपीड गाडीसाठीची मूळ किंमत किती ?
या वाहनासाठी लिलावाची सुरुवातीची किंमत (Auction Start Price) 3,73,589 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आह. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर, 2025 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे. निविदा मोहोरबंद पाकिटात सादर करायच्या असून, त्या 31 ऑक्टोबर, 2025 रोजी दुपारी 3:00 वाजता उघडण्यात येतील. यशस्वी निविदाधारकास वाहनाच्या रकमेवर लागू होणारा वस्तू व सेवा कर (GST) भरावा लागेल. तसेच, वाहनाच्या हस्तांतरणाची सर्व प्रक्रिया (RTO Transfer) स्वखर्चाने करावी लागेल. लिलाव यशस्वी झाल्याचे कळल्यापासून एका आठवड्याच्या आत संपूर्ण रक्कम भरून वाहनाचा ताबा घेणे आवश्यक आहे असे शासनाने जारी केलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.