Mall Safety: .....तर राज्यातील मॉल्सची वीज आणि सुरक्षा बंद करणार, राज्य सरकारची मोठी घोषणा

Mall Safety Issue: राज्यातील सर्व मॉल्सच्या मालकांना राज्य सरकारनं गंभीर इशारा दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:

Mall Safety Issue: आजकाल कोणत्याही खरेदीसाठी मॉलमध्ये जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. एकाच छताखाली खाणे, खरेदी, मनोरजंनासह बऱ्याच गोष्टींचा आनंद मॉलमध्ये एकाच छताखाली घेता येतात. त्यामुळे मॉलमध्ये जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. विशेषत: राज्यातील महानगरामध्ये मॉल संस्कृती वाढलीय. रोज हजारो जण एकाचवेळी मॉलमध्ये एकत्र असतात. सुट्टीच्या दिवशी किंवा सण आणि उत्सवाच्या प्रसंगी ही गर्दी जास्त असते. त्यामुळे मॉलची सुरक्षा का महत्त्वाचा प्रश्न बनलाय. विशेषत: राज्यातल्या काही मॉलमध्ये लागलेल्या आगीनंतर हा विषय अधिक गंभीर बनला आहे. या महत्त्वाच्या विषयावर राज्य सरकारनं विधानरपरिषदेत मोठी घोषणा केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

 मॉल्सची वीज आणि सुरक्षा तोडणार!

मुंबईतील लिंक स्क्वेअर मॉल (29 एप्रिल 2025) आणि ड्रीम मॉलमध्ये वारंवार लागणाऱ्या आगींच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने फायर ऑडिटसंदर्भात कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व मॉल्सचे 90 दिवसांत फायर ऑडिट पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित महापालिकांना दिले जातील. तसेच जे मॉल अग्निसुरक्षेचे निकष पूर्ण करणार नाहीत त्यांची वीज आणि पाणी जोडणी तोडण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती विधानपरिषदेत उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Advertisement

विधान परिषदेचे सदस्य कृपाल तुमाने यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना  सामंत बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य अभिजित वंजारी, मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

Advertisement

(नक्की वाचा: Pratap Sarnaik: परिवहन मंत्र्यांनी Rapido बुक केली, राईड येताच रंगेहाथ पकडले )

या प्रश्नाचं उत्तर देताना सामंत म्हणाले की, मुंबई महापालिकेने याबाबत आधीच कारवाई सुरू केली असून, ड्रीम मॉल सध्या बंद आहे. फायर सेफ्टीसंदर्भात यापुढे कोणताही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही आणि राज्यातील सर्व वर्ग ‘ब', ‘क', ‘ड' महापालिकांनी मॉल्सच्या अग्निसुरक्षा अनुपालन तपासावेत. आवश्यकता असल्यास महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीव संरक्षण अधिनियम 2006 मधील तरतुदींनुसार कडक कारवाई केली जाईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. 
 

Advertisement
Topics mentioned in this article