ऑक्शनमध्ये गाडी घेण्याची सुवर्णसंधी! लिलावाची तारीख, गाड्यांची संख्या आणि सगळा तपशील जाणून घ्या

26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड इथे हा लिलाव ठेवण्यात येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
फोटो-प्रातिनिधीक
पुणे:

मोटार वाहन कर न भरलेल्या  व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या 10 वाहनांचा जाहीर ई-लिलाव करण्यात येणार आहे.  26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड इथे हा लिलाव ठेवण्यात येणार आहे.  ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी उपलब्ध असून वाहन मालक, चालक व वित्तदात्यांनी याची नोंद घ्यावी, असे संबंधित अधिकारी आणि पिंपरी-चिंचवडच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

ई-लिलाव सहभागी होण्याकरीता 16 ते 19 डिसेंबर या कालावधीत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. लिलावाचे अटी व नियम 9 डिसेंबर रोजी पासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी  प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथील नोटीस बोर्डावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध राहील. तसेच सदरची वाहने पाहण्याकरीता 9 ते 24 डिसेंबर या कालावधीत प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड येथे उपलब्ध असणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.  ‘वाहने जशी आहे तशी' या तत्वावर जाहिर ई-लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. 

वाहनांची यादी www.eauction.gov.in या संकेतस्थळावर, प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय पुणे शहर, हवेली, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, आंबेगाव  या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येणार आहे. कोणतेही कारण न देता जाहीर लिलाव रद्द करण्याची अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, पिंपरी-चिंचवड  यांनी  स्वत:कडे राखून ठेवले असल्याचेही कळवण्यात आले आहे. 
 

Topics mentioned in this article