SOP For Stop Kidnapping newborn babies in Government Hospitals: शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये बालक व अर्भकांची सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. रुग्णालयातील गर्दी, विविध विभागांचे कामकाज तसेच रुग्ण व नातेवाईकांची ये-जा लक्षात घेता अर्भक किंवा बालक अपहरणाची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा आशा घटना देखील समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांमध्ये नवजात बालकांचे अपहरण-चोरी रोखण्यासाठी, त्री रोग व प्रसूती शास्त्राच्या अधिनस्त कक्षाकरिता रुग्णालयीन कार्यप्रणाली तयार करून शासन मान्यतेस्तव संचालनालयाने शासनास प्रस्ताव सादर केला होता.
Panvel News: 'माफ करा, दुसरा पर्याय नव्हता..' चिठ्ठी लिहून नवजात बाळाला फुटपाथवर सोडलं, आरोपींना अटक
त्यानुसार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांमध्ये नवजात बालकांचे अपहरण-चोरी रोखण्यासाठी कार्यप्रणाली राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. अखेर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत एक एसोपी तयार करण्यात आली असून, त्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
शासन परिपत्रक
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांमध्ये नवजात बालकांचे अपहरण-चोरी रोखण्यासाठी, या शासन परिपत्रकासोबत संलग्न असलेल्या रुग्णालयीन कार्यप्रणाली तात्काळ अंमलात आणण्यात यावे असे आदेशात म्हटले आहे.
तो ही 'नकोसा', रात्रीच्या अंधारात नवजात बाळाचा रडण्याचा आवाज अन्...; पुण्यातील भीतीदायक वास्तव
अशी असणार नवीन कार्यपद्धती?
1) रुग्णालयातील प्रसूतीपूर्व तपासणी कक्ष, प्रसूती कक्ष, शस्त्रक्रियागृह, प्रसूती पश्चात कक्ष, शिशु अतिदक्षता कक्ष, डिस्चार्ज प्रक्रिया आदी सर्व टप्प्यांमध्ये नवजात बालकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यप्रणाली (SOP) मध्ये नमूद सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे.
2) रुग्णालयीन पातळीवर "कोड पिंक" यंत्रणा सक्रिय ठेवून त्वरित व समन्वयित कारवाई सुनिश्चित करावी.
3) संचालनालयाच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयातील अधिष्ठाता-वैद्यकीय अधीक्षक यांनी संस्थेच्या सुरक्षेचा दर महिन्याला आढावा घ्यावा व त्रैमासिक आढावा अहवाल संचालनालयास सादर करावा.
4) सर्व अधिनस्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांनी सदर कार्यप्रणाली तात्काळ अंमलात आणावी व संबंधित सर्व कर्मचारी, सुरक्षा रक्षक, नर्सिंग व वैद्यकीय कर्मचारी यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जावे.
5) नवजात बालकांच्या सुरक्षेसाठी या कार्यप्रणालीच्या अंमलबजावणीसंबंधी होणारा खर्च संबंधित संस्थांना अर्थसंकल्पित केलेल्या निधीतून भागविण्यात यावा.
6) सदर शासन परिपत्रकाद्वारे निश्चित करण्यात आलेल्या कार्यप्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालय, मुंबई यांच्यावर राहील..